Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अध्यात्म»Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 16, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Nine, नववा अध्याय, अध्याय नववा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं । म्हणोनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों ॥16॥ मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघवियाचि क्षीराब्धीची करूनि वाटी । उपमन्यूपुढें धूर्जटी । ठेविली जैसी ॥17॥  ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें । बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें ॥18॥ तैसी ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो । ते भगवद्‍गीता वोविये गावों । ऐसें केलें ॥19॥ जे बोलणियाचां रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता । परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥20॥ होती देहबुद्धि एकसरी । आनंदभांडारा केली वोवरी । मन गीतार्थसागरीं । जळशयन जालें ॥21॥ तैसें एकैक देवांचें करणें । अपार बोलों केवीं मी जाणें । तऱ्ही अनुवादलों धीटपणें । तें उपसाहिजो जी ॥22॥ आतां आपुलेनि कृपाप्रसादें । मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें । पूर्वखंड विनोदें । वाखाणिलें ॥23॥ प्रथमीं अर्जुनाचा विषादु । दुजीं बोलिला योगु विशदु । परि सांख्यबुद्धीसि भेदु । दाऊनियां ॥24॥ तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें । तेंचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें । पंचमीं गव्हरिलें । योगतत्त्व ॥25॥ तेंचि षष्ठामाजीं प्रगट । आसनालागोनि स्पष्ट । जीवात्मभाव एकवाट । होती जेणें ॥26॥ तैसीचि जे योगस्थिति । आणि योगभ्रष्टां जे गति । ते आघवीचि उपपत्ती । सांगितली ॥27॥ तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं । भजति जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चाऱ्ही ॥28॥ पाठीं सप्तमींची प्रश्नसिद्धी । बोलोनि प्रयाणसिद्धी । एवं ते सकळवाक्यअवधि । अष्टमाध्यायीं ॥29॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    अर्थ

    नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अहो स्वामी, चांगल्या प्रेमाने ‘ज्ञानेश्वर आमचा आहे’ या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिले, त्यामुळे कृष्णार्जुनसंवादरूपी गंगा-यमुनेचा संगमाच्या प्रयागावर मी वड झालो. ॥16॥ मागे ‘दूध दे’ अशी विनंती केल्यावरून सर्वच क्षीरसमुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली, ॥17॥ किंवा वैकुंठाधीश प्रभूने रुसलेला जो ध्रुव, त्याची अढळपदाचा खाऊ देऊन कौतुकाने समजूत घातली. ॥18॥ त्याप्रमाणे गीता, जी ब्रह्मविद्येचा राजा आहे आणि सर्व शास्त्रांचे विश्रांतीस्थान आहे, ती भगवद्गीता मी प्राकृत ओवीछंदात गावी, असे श्रीगुरूने केले. ॥19॥ (हे पाहा) शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितके भटकले असता, त्या वाचारूप वृक्षास विचाररूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही; परंतु वाचाच विचारांचा कल्पवृक्ष केली. ॥20॥ माझ्या बुद्धीने जे देहाशी एकसारखे तादात्म्य केले होते, त्या माझ्या बुद्धीला (देहतादात्म्यापासून सोडून) आनंदरूपी खाजिन्याची खोली केली आणि माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसमुद्रात महाविष्णू झाले. ॥21॥ त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या एक एक लीला आहेत. त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करण्याचे मला कसे कळेल? असे असूनही बेडरपणाने मी जो काही अनुवाद केला, तो महाराज, सहन करा. ॥22॥ एवढा वेळ आपल्या कृपेच्या प्रसादाने मी भगवद्गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवीच्या छंदात वर्णन केला. ॥23॥ पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला, दुसर्‍यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला, परंतु ज्ञानयोग आणि बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे, तो दाखवून सांगितला. ॥24॥ तिसर्‍यात केवळ कर्मयोग सांगितला. तोच कर्मयोग चौथ्यात ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यात गूढ रीतीने अष्टांगयोग सांगितला. ॥25॥ ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते, तेच योगाचे तत्व आसनापासून प्रारंभ करून (तो समाधीपर्यंत) स्पष्ट तर्‍हेने (सहाव्यात) उघड केले. ॥26॥ त्याचप्रमाणे योगसिद्ध झालेल्याची स्थिती आणि योगाने आचरण करीत असता मधेच मरण आलेल्यास जी गती प्राप्त होते, तो सर्व विचार (सहाव्या) अध्यायात सांगितला. ॥27॥ त्यानंतर सातव्यात आरंभी (कार्य-कारण अशा दोन प्रकारांनी) प्रकृतीचे रूप सांगून, भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त आहेत, त्यांचे वर्णन केले. ॥28॥ नंतर सातव्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या सात वाक्यांसबंधी (आठव्याच्या आरंभी) अर्जुनाने विचारलेल्या सात प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाणसिद्धीचा प्रकार सांगितला; अशा रीतीने सर्व सात प्रश्नांची उत्तरे देऊन आठव्या अध्यायात ते प्रश्न संपविले. ॥29॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    By Team AvaantarMarch 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें…

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026

    Dnyaneshwari : जन्मलिया दिवसदिवसें, हों लागे काळाचियाचि ऐसें…

    March 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn