Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अध्यात्म»Dnyaneshwari : एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें, आवडे कीर कळलें ऐसें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें, आवडे कीर कळलें ऐसें…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 12, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Nine, नववा अध्याय, अध्याय नववा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय नववा

    आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें । जे माझां ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥133॥ अथवा भूतें ना माझां ठायीं । आणि भूतांमाजि मी नाहीं । या खुणा तूं कहीं । चुकों नको ॥134॥ हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड । आतां इंद्रियां देउनि कवाड । हृदयीं भोगीं ॥135॥ हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारेपण पार्था । न संपडे गा सर्वथा । जेविं भुसीं कणु ॥136॥ एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळलें ऐसें । परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे ॥137॥ जे जाळ जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें । परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांगे ॥138॥ तैसें बोलवरि वाचाबळें । वायांचि झकविजती प्रतीतीचे डोळे । मग साचोकारें बोधावेळे । आथि ना होईजे ॥139॥

    अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥11॥

    किंबहुना भवा बिहा या । आणि साचें चाड आथि जरी मियां । तरी तुम्हीं गा उपपत्ती इया । जतन कीजे ॥140॥ एऱ्हवीं वेधली दिठी कवळें । ते चांदणियातें म्हणे पिवळें । तेविं माझां स्वरुपीं निर्मळे । देखाल दोष ॥141॥ नातरी ज्वरें विटाळलें मुख । तें दुधातें म्हणे कडू विख । तेविं अमानुषा मानुष । मानाल मातें ॥142॥ म्हणऊनि पुढती तूं धनंजया । झणें विसंबसी या अभिप्राया । जे इया स्थूलदृष्टी वायां । जाइजेल गा ॥143॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी, समुद्र भरतें अपार दाटी…

    अर्थ

    आता या विचाराच्या प्रकाशाने तू माझ्या (स्वरूपाला) ऐश्वर्ययोगाला चांगले न्याहाळून पाहा. (ते असे की,) माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत, पण मी प्राण्यांमध्ये नाही. ॥133॥ अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि भूतांमध्ये मी नाही, हे वर्म तू कधीही विसरू नकोस. ॥134॥ ही आमची सर्वस्वी लपवून ठेवलेली गोष्ट आहे; परंतु तुला उघड करून सांगितली आहे. आता इंद्रियांची द्वारे बंद करून (सर्व इंद्रियवृत्ती अंतर्मुख करून) तू या गुह्य (गुप्त) विचारांच्या अंत:करणात अनुभव घे. ॥135॥ अर्जुना, हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही, तोपर्यंत ज्याप्रमाणे कोंड्यात दाणा शोधला असता सापडणार नाही, त्याप्रमाणे माझी खरी स्वरूपस्थिती मुळीच अनुभवास येणार नाही. ॥136॥ एरवी तर्काच्या बळाने (माझी स्वरूपस्थिती) खरोखर कळल्यासारखी वाटते. (पण ते खरे नाही, ते कसे तर पुढील उदाहरणाने सांगतात.) परंतु मृगजळाच्या ओलाव्याने जमीन भिजते काय? ॥137॥ जेव्हा जाळे पाण्यात पसरले, तेव्हा त्यात चंद्रबिंब सापडल्यासारखे दिसते; परंतु ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तेव्हा चंद्रबिंब कोठे असते, सांग बरे? ॥138॥ त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपल्या प्रतिपादनाने (स्वत:च्या) अनुभवाचे डोळे उगीच झाकण्यास लावतात (आपण आपल्याला फसवितात). मग खर्‍या बोधाची वेळ (बोधाच्या परीक्षेची वेळ) आली म्हणजे बोध असतही नाही आणि होतही नाही. ॥139॥

    माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूर्ख (सर्व) भूतांचा ईश्वर असलेल्या, (पण सांप्रत) मानवदेह धारण करणार्‍या (मला मनुष्यच समजून, मनुष्यधर्म माझ्यावर आरोपित करून) माझी अवहेलना करतात. ॥11॥

    फार काय सांगावे? जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूपप्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी खरी इच्छा असेल तर, आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा. ॥140॥ नाहीतर (ज्याप्रमाणे) काविळीने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते, त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पाहाल. ॥141॥ अथवा तापाने दूषित झालेले तोंड दुधाला कडू विष म्हणते, त्याप्रमाणे मनुष्य नसलेल्या मला मनुष्य असे मानाल. ॥142॥ म्हणून अर्जुना, पुन्हा तुला एकवार बजावतो की, तू कदाचित सांगितलेल्या (स्वरूपज्ञानाच्या) अभिप्रायाला विसरशील, तर विसरू नकोस. कारण या स्थूल दृष्टीने मला पाहू म्हटले तर, ते पाहणे व्यर्थ होईल. ॥143॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : दीपु ठेविला परिवरीं, कवणातें नियमी ना निवारी…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    By Team AvaantarMarch 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें…

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn