Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…
    ललित

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 15, 2026Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, शाळेतील मित्रमैत्रीण, कॉलेजचे मित्रमैत्रीण, जुन्या मित्रांची भेट, मैत्रिणीची अनपेक्षित भेट, मित्र मैत्रिणीचे उलटे चालणे, सुधीर छाया भेट, छायाच्या भेटीची प्रतीक्षा, कॉलेजच्या आठवणी, मैत्रिणीचा मोबाइल नंबर, 52 वर्षांनी मैत्रिणीची भेट,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुधीर करंदीकर

    शाळा, कॉलेज सोडून बरीच वर्षं सरतात… तेव्हाच्या बऱ्याच मित्र-मैत्रिणींचे आपल्याकडे मोबाइल नंबर नसतात. त्यामुळे कधी बोलणे नसते आणि भेटही नसते. त्यातल्या कुणाची अचानक 50 वर्षांनंतर अचानक भेट व्हावी, आणि नुसती नजरानजर होताच, त्यांनी एकमेकांना नावासकट ओळखावे, हे शक्यच नाही, असेच सगळे म्हणतील. कारण, चेहेऱ्यात बदल झालेला असतो, डोक्याचे केस पांढरे झालेले असतात, अनेकांना ‘मुलांना’ टक्कल पडलेले असते, आवाजात बदल झालेला असतो वगैरे वगैरे. पण जुन्या मैत्रीत काही खासियत असेल, तर मात्र अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होतात. यावरचा हा माझा अनुभव…


    नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता एकटाच फिरायला बाहेर पडलो. कोथरूडजवळ मृत्युंजय मंदिरासमोरून फुटपाथवरून जात होतो. अधून मधून इथे भेटणाऱ्या मैत्रिणी – मनवा आणि मेघना यांची आठवण झाली. त्या परदेशी गेल्या असल्यामुळे त्यांची भेट होणार नव्हतीच. चहाच्या टपरीजवळ आलो, चहावाल्याला हात केला आणि पुढे निघालो. समोरून एक मॅडम येत होत्या… यांना केव्हातरी खूप जवळून बघितलंय, असं जाणवलं. मॅडम ना पण तसंच वाटलं असावं, असे त्यांच्या चेहऱ्यावर भाव दिसले. एकमेकांकडे बघत बघत आम्ही एकमेकांना क्रॉस झालो. दोघं थोडं पुढे गेलो आणि दोघांनी एकदमच मागे वळून बघितलं. खूप जवळची ओळख आहे, असं दोघांनाही जाणवलं… आणि गंमत म्हणजे आम्ही दोघेही उलटं म्हणजे मागे मागे चालायला लागलो. चालत चालत शेजारी शेजारी आलो आणि हसत हसत आपोआपच एकमेकांशी हात मिळवणी झाली!

    दोघे एकदमच म्हणालो…

    मॅडम : अरे, सुधीर तू?!

    मी : अरे, छाया तू….?!

    (आम्हाला रस्त्यावर उलटं चालताना बघून जाणारे येणारे पण जरा थबकलेच… की हा काय प्रकार आहे?)

    दोघे एकदम : ग्रेट सरप्राईज. कॉलेज सोडल्यानंतर म्हणजे 50 वर्षांनंतर आज अचानक भेट.

    छाया : सुधीर, तुझा एकदम सेम स्मायलिंग फेस… नो चेंज…

    मी :  छाया तुझा पण तोच आनंदी चेहरा… नो चेंज!

    दोघेही : तेच उलटं चालणं…

    आणि  म्हणून तर एकदम ओळखू शकलो 50 नव्हे तर, 52 वर्षांनंतर!

    जुन्या आठवणी आणि  गप्पा सुरू होत्या, एवढ्यात बाजूला असलेल्या चहाच्या टपरीचे मालक आले आणि

    म्हणाले : दादा, चहा इथेच आणून देऊ की, दुकानात येऊन  घेणार?

    मस्त चहा झाला. 52 वर्षांत भेट तर नाहीच आणि एकमेकांचे मोबाइल नंबर माहीत नसल्यामुळे कधी फोनवर बोलणे पण नव्हते. भरपूर जुन्या जुन्या म्हणजे कॉलेजमध्ये पाच वर्षं बरोबर होतो, त्या वेळच्या गप्पा सुरू झाल्या. किती वेळ बोलत होतो, हे समजलंच नाही. चहावाले सांगायला आले, दादा ऊन वाढतंय, दुकानासमोर सावलीत खुर्चीवर बसून गप्पा मारा.

    हेही वाचा – फॅशनची हुडहुडी… वेळीच व्हा सावध!

    दोघंही भूतकाळातून वर्तमान काळात आलो. पुन्हा असंच भेटायचं ठरलं आणि इथेच भेटायचं ठरलं… बाय-बाय झालं आणि जुन्या आठवणींमध्ये रमत रमत आपापल्या मार्गाला लागलो…

    घरी गेल्यानंतर ही आगळी वेगळी भेट कॉलेजच्या ग्रुपवर सविस्तर टाकली आणि माझी पोस्ट वाचून एका कॉलेज मित्राचा मेसेज आला –

    तुझी आणि छायाची इतक्या वर्षांनंतर अचानकपणे भेट होणे, गप्पा होणे आणि ते पण रस्त्यावरती सहज फिरता फिरता… म्हणजे आश्चर्यच आहे! तू लिहिलेली घटना वाचता वाचता मी पण कॉलेज डेज मधल्या भूतकाळात गेलो. मला चांगलं आठवतंय, कुठलाही पिरियेड संपला, आणि पुढच्या पिरेडला वेळ असला, तर सगळी मुलं-मुली क्लासबाहेरच्या मोठ्या पॅसेजमध्ये गप्पा मारत उभे असायचे… काहीजण क्लास रूममध्ये वाचत असायचे. तू आणि छाया मात्र अशा वेळेस कायम पॅसेजमध्ये उलटे चालत चालत गप्पा मारत असायचे. मला आठवतं पूर्ण कॉलेजमध्ये उलटे चालत गप्पा मारणे, ही तुमची खासियत होती. आज पण तुम्ही दोघांनी उलटे चालून, आपण तेच आहोत, ही खात्री मात्र मस्त करून घेतली. नाहीतर कुणीही दोघांची बऱ्याच वर्षांनंतर अचानक भेट होते, तेव्हा त्यांचे बोलणे साधारण असे असते –

    तुम्ही सुधीर करंदीकर ना?  किंवा तुमचं नाव अमुक अमुक आहे ना? तुम्ही भोपाळच्या कॉलेजमध्ये होता ना? अशी सुरुवात होते… आणि तुमची 52 वर्षानंतर भेट झाली तेव्हा, डायरेक्ट ओळख पटल्यासारखेच, सुधीर तू… छाया तू ….  अशी सुरुवात झाली. ग्रेट, सिंपली ग्रेट! मी पण तिथे असतो तर मजा आली असती. बहुदा गप्पा मारता मारता संध्याकाळ झाली असती आणि चहावाल्याने पुढच्या चहाबरोबर ब्रेड पण दिला असता. 

    भेटत रहा, मजा करा, जुन्या आठवणी कळवत चला… बाय-बाय.

    दुसऱ्या दिवशी कॉलेज मित्रांच्या व्हॉट्सॲपवर ग्रुप मीटिंग कॉल आला – माझ्या आणि छायाच्या अचानक भेटीचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते आणि 52 वर्षांनंतर आम्ही एकमेकांना एका क्षणात ओळखले, यावर आधी कुणाचाच विश्वास बसत नव्हता. पण कॉलेजच्या आम्ही काय काय गप्पा मारल्या, ते सांगितल्यावर सगळ्यांची खात्री पटली. एक जण म्हणाला, मला जरा छायाचा मोबाइल नंबर दे.  फोन लावून बघतो ओळखते का मला पण! आणि जरा कॉलेजच्या  गप्पा मारू. मज्जा येईल…

    हेही वाचा – कानाला खडा… माझा व्हॅलेंटाइन डे!

    मी म्हटलं देतो देतो, आणि लक्षात आलं, काल गप्पांच्या ओघामध्ये, आपण छायाला ती पुण्यात कुठे राहते… पास आऊट झाल्यानंतर कुठे नोकरी केली… इथे घरी कोण कोण असतं… आणि मुख्य म्हणजे तिचा मोबाइल नंबर काय आहे… हे सगळेच विचारायला विसरलो होतो!

    मित्रांचा आधी विश्वास बसला नाही. पण नंतर त्यांना पटलं की, इतक्या वर्षांनंतर जुन्या गप्पांमध्ये रंगल्यानंतर असे होऊ शकते.

    आता असेच सकाळी फिरताना छाया कधी भेटते, तिच्याबरोबर रस्त्यावर उलटे कधी चालतो, याच्या मी  प्रतिक्षेत आहे. 

    भेट होणार हे नक्की… आणि ती पण मृत्युंजय मंदिराच्या समोरच हे पण शंभर टक्के पक्के!!

    मोबाइल – 9225631100


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    जाडेपणाबद्दल ओळखणारी रुंजी कॉलेजमध्ये गेली अन्…

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn