Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
    आरोग्य

    Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 19, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    गरज, अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, GoodHealth, BasicNeed, BasicHumanNeed, मूलभूतगरज, निरामय, आरोग्य, निरामयआरोग्य
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रविंद्र परांजपे

    आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की, मानवाच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत. आता ‘निरामय आरोग्य’ या वाढत्या गरजेची त्यात भर पडलेली आहे. आपले आरोग्य निरामय रहायला हवे, असे प्रत्येकालाच वाटत असते. वास्तविक, निरामय आरोग्य ही आपली उपलब्धी नसून आपली मूलभूत गरज आहे. हे वास्तव लक्षात घेऊन आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील रहायला हवे. आता आपण निरामय आरोग्य या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ जाणून घेऊ या.

    शरीराची कोणतीही तक्रार नसणे किंवा आजारी नसणे म्हणजे चांगले आरोग्य असे आपण सर्वसाधारणपणे मानतो. वास्तविक, आयुर्वेदाने स्वस्थ आरोग्याची समर्पक शब्दांत व्याख्या केली आहे. या व्याख्येनुसार, स्वस्थ आरोग्याची सोप्या भाषेत सहज समजतील अशी वैशिष्ट्ये म्हणजे – जेवणाच्या वेळेस कडकडून भूक लागणे, अन्न व्यवस्थित पचणे, मलक्रिया व्यवस्थित असून नैसर्गिकरीत्या कार्य करणे म्हणजे मलविसर्जनानंतर पोट हलके वाटणे, रात्री शांत आणि गाढ झोप लागणे, शरीरात कोणतेही दुखणे अथवा कुठलाही विकार नसणे आणि मन प्रसन्न तसेच आनंदी असणे.

    थोडक्यात, निरामय आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोल असलेली स्वस्थ आणि रोगमुक्त अवस्था होय. सोप्या भाषेत, ‘शरीराने आणि मनाने स्वस्थ’ अशी अवस्था म्हणजे आरोग्य होय. ‘निरामय’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ निरोगी असा आहे. निरामय म्हणजे सात्त्विक आणि सकारात्मक असेही म्हणता येईल.

    हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान

    निसर्गातील पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आणि आत्मा म्हणजे मन यांचा एकत्र उचित योग झाला म्हणजे त्याला शरीर म्हणतात. शारीरिक आरोग्य म्हणजे शरीराचे आरोग्य आणि मानसिक आरोग्य म्हणजे मनाचे आरोग्य या ‘आरोग्य’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. थोडक्यात, आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य एकमेकांशी गुंफलेले आहे.

    हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या

    मन आणि शरीर अभिन्न असून यांच्यातील परस्परसंबंध लक्षात घेऊन त्यांच्या स्वास्थ्यासाठी आपण यथायोग्य प्रयत्न केल्यास निरामय आरोग्य प्राप्ती आणि संवर्धन निश्चित होईल आणि परिणामी आपले जीवन खचितच अधिक सक्षम, सफल आणि समृद्ध म्हणजेच निरामय होईल.

    क्रमश:

    (लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून त्यांनी निरामय आरोग्य संकल्पना घेऊन योगाभ्यास, आहार-विहार आणि मानसिक आरोग्य या विषयांवर माहितीपूर्ण मार्गदर्शक  पुस्तके लिहिली आहेत. पुस्तकांसाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करता येईल.)

    मोबाइल – 9850856774

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य

    No Comments

    1. Aditi Kulkarni on July 20, 2025 10:02 pm

      khup sundar article…👌👌👌

      Reply
      • रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on August 2, 2025 8:27 am

        धन्यवाद

        Reply
    2. रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on August 2, 2025 8:28 am

      धन्यवाद

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    By रविंद्र परांजपेMarch 14, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले.…

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn