Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»Ayurveda : आदान काल आणि विसर्ग काल
    आरोग्य

    Ayurveda : आदान काल आणि विसर्ग काल

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 19, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    आणि, जीवनशैली, अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Uttarayan, Dakshinayan, lifestyle, Ayurveda, आदानकाल, विसर्गकाल, उत्तरायण, दक्षिणायन
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. प्रिया गुमास्ते

    मागील भागात आपण आयुर्वेद (Ayurveda) ऋतुचर्या म्हणजे काय, हे समजून घेतले. आता ऋतूंनुसार आपण आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करायचे आणि ते का करायचे, ते पाहू.

    सूर्याच्या स्थितीनुसार वर्षाचे दोन भाग (काल) केले जातात. आदान काल (उत्तरायण) आणि विसर्ग काल (दक्षिणायन). आदान म्हणजे शोषणे किंवा काढून घेणे आणि विसर्ग म्हणजे देणे.

    आदान काळ

    आदान काळ म्हणजे सूर्याचा उत्तरायण काळ. सूर्य जेव्हा उत्तर दिशेकडे सरकतो. आदान काळात, शिशिर (Winter), वसंत (Spring) आणि ग्रीष्म (Summer) या तीन ऋतूंचा समावेश होतो.

    तत्र रविर्भाभिरादानो जगतः स्नेहं वायवस्तीवृक्षाश्चोपशोषयन्तः शिशिरवसन्तग्रीष्मेषुक्रमं रौक्ष्यमुत्पादयन्तो रुक्षां रसांस्तिकषायकटंशचाभिवर्धयन्तो नृणां दौर्बल्यमावहन्ति ||6||

    अर्थ : आदानकालात सूर्य त्याच्या उष्ण किरणांसह वातावरणातील आर्द्रता शोषून घेतो. अति कोरड्या वाऱ्यामुळे, त्याच्या शोषक गुणामुळे शिशिर, वसंत आणि ग्रीष्म ऋतूंमध्ये हळूहळू कोरडेपणा येतो, ज्यामुळे अनुक्रमे तिक्त, कषय आणि कटू रस यांचे प्राबल्य वाढते आणि या तिन्ही ऋतूंमध्ये मानवांमध्ये हळूहळू अशक्तपणा वाढतो.

    हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान

    या काळात, सूर्याची उष्णता आणि वारा अधिक शक्तिशाली होतात, ज्यामुळे वातावरणातील आणि शरीरातील जलांश कमी होतो आणि उष्णता वाढते.

    विसर्ग काळ

    या काळात वर्षा (पावसाळा), शरद आणि हेमंत या तीन ऋतूंचा समावेश होतो. विसर्ग काळ हा सूर्याचा दक्षिणायनाचा काळ. सूर्याचे दक्षिण दिशेस सरकणे सुरू होते. भारत हा उत्तर गोलार्धात (Northenden hemisphere) असल्यामुळे दक्षिणेकडे सरकणाऱ्या सूर्याचा प्रभाव कमी होतो. पावसामुळे वातावरणातील तसेच शरीरातील द्रव अंश वाढतो आणि स्निग्धता बल वाढते, विसर्ग कालामध्ये वर्षा ऋतूत अल्प, शरद ऋतूत मध्यम, हेमंत ऋतूत उत्तम बलवृद्धी होते.

    दोष आणि ऋतूचा संबंध

    आयुर्वेदानुसार माणसाचे शरीर हे वात, पित्त आणि कफ या तीन दोषांचे बनलेले आहे. या दोषांचा समतोल राखणे म्हणजेच निरोगी राहणे. म्हणून कोणत्या काळात कोणता दोष वाढतो, हे समजून त्यानुसार आहारामध्ये फरक करणे गरजेचे असते.

    • उन्हाळ्यात वात दोष जमा होतो आणि पावसाळ्यात तो वाढतो.
    • पित्त दोष पावसाळ्यात जमा होतो आणि शरद ऋतूमध्ये वाढतो.
    • कफ दोष हिवाळ्यात जमा होतो आणि वसंत ऋतूमध्ये वाढतो.

    ऋतुचर्येचे पालन करण्याचे फायदे

    आयुर्वेदात हे दोन काळ आणि त्यांच्याशी संबंधित ऋतू समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते बदलत्या बाह्य वातावरणाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो, याबद्दल माहिती देतात आणि ती मिळाल्यामुळे वर्षभर आपल्या आहार आणि विहारात  योग्य तो बदल करण्यास मदत होते. ऋतूंनुसार आपण आपल्या जीवनशैलीत बदल करतो, तेव्हा आपल्या शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा किंवा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच सध्या वाढीस असणार्‍या मधुमेह (diabetes), हृदयविकार इत्यादी lifestyle diseases ला आळा घालायला मदत होईल.

    हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या

    क्रमश:

    (आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सलटन्ट)

    (Mobile : 9819340378)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    By रविंद्र परांजपेMarch 14, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले.…

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn