Author: रविंद्र परांजपे

मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास याबाबत जाणून घेणार आहोत. प्राणायाम ही अष्टांग योगातील चवथी पायरी आहे. आता आपण प्राणायाम या संज्ञेबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. प्राणायाम म्हणजे काय? प्राणायाम हा संस्कृत शब्द आहे. प्राण + आयाम = प्राणायाम प्राण म्हणजे चेतना अथवा शक्ती अथवा ऊर्जा होय. सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक शक्ती म्हणजे प्राणशक्ती होय. आयाम म्हणजे नियंत्रण करणे. प्राणायाम म्हणजे प्राणशक्तीवर नियंत्रण. श्वसनपद्धती नियंत्रण करण्याची कला म्हणजे प्राणायाम होय. प्राणायामाची आवश्यकता आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करण्याचे प्राणायाम हे अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त साधन आहे.…

Read More

मागील लेखात आपण योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. श्वसन अभ्यास दैनंदिन योगाभ्यासात श्वसन अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वास्तविक, दैनंदिन योगाभ्यास करताना ओंकार आणि गुरुवंदना झाल्यानंतर श्वसनमार्गशुद्धी केली जाते. यामुळे आपला योगाभ्यास सहज, सुकर आणि अधिक लाभदायक होतो. आता आपण श्वसन म्हणजे काय, हे जाणून घेऊयात. श्वसन म्हणजे काय? सोप्या भाषेत श्वसन म्हणजे श्वासोच्छ्वास म्हणजेच श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही क्रिया होय. योगाच्या भाषेत या क्रियांना अनुक्रमे पूरक आणि रेचक असे म्हणतात. श्वसन क्रिया अगदी सहज आणि नैसर्गिक असून…

Read More

मागील लेखात आपण ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. योगाभ्यासातील प्रार्थना दैनंदिन योगाभ्यासात पुढील प्रार्थनांचा समावेश केला जातो : प्रार्थना म्हणण्यापूर्वी शरीर-मनाची तयारी आवश्यक आहे. प्रार्थनेची पूर्वतयारी पद्मासन, अर्धपद्मासन अथवा सहजासनात बसावे. हातांची ज्ञानमुद्रा अथवा ध्यानमुद्रा करावी. डोळे अलगद मिटून पाठीचा कणा ताठ ठेवावा. संथ श्वसन करावे. आपण आता प्रार्थनेविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. आरंभीची प्रार्थना योगाभ्यासातील आरंभ त्रिवार ओंकाराने केला जातो, हे आपण मागील लेखात पाहिले. त्रिवार ओंकार केल्यावर गुरुवंदना केली जाते. गुरुवंदना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः । गुरू साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे…

Read More

आरोग्य सदरातील विविध लेखांद्वारे आपण मनाचे आरोग्य आणि मानसिक ताणतणाव याबाबत जाणून घेतले. आपल्याला निरामय शारीरिक आणि मानसिक आरोग्य हवे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या मानसिकतेत आमूलाग्र बदल करायला हवेत, हे वास्तव देखील आपण जाणून घेतले. या लेखात तथा पुढील काही लेखांमधून आपण निरामय मानसिक आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी विविध उपाययोजनांबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. वास्तविक पाहता, आपण निरामय आरोग्याच्या वाटचालीची सुरुवात निसर्गसुसंगत दिनचर्येबद्दल मागील लेखांमधून सविस्तर माहिती घेऊन अगोदरच केलेली आहे. आता आपण योगाभ्यासातून निरामय आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी सविस्तर माहिती घेऊयात. योगाचा अर्थ हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास योगाचा उद्देश अतिचंचल मनाला नियंत्रणाने एकाग्र करणे आणि…

Read More