Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: माधवी जोशी माहुलकर
संजीव कुमार, शबाना आझमी, राकेश रोशन आणि सारीका यांच्या अभिनयाने नटलेला ‘देवता’ नावाचा सिनेमा आठवतोय? त्याच सिनेमातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या तलम आवाजातील नितांत सुंदर गाण ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होता, मौसम-ए-गुल को हँसाना भी हमारा काम होता…’ आहे न रेशमी वस्त्र ल्यायल्यासारखे गर्भरेशमी गाणे? हे गुलजार या मनस्वी संवेदनशील कवीचे पिवळ्या गुलमोहरासारखे सोनसळी शब्द आहेत आणि त्यावर आपल्या रेशमाच्या जरतारी तारांनी साज चढवला आहे, गुलजार इतक्याच हळव्या आणि नाजूक दिलाचे संगीतकार आर. डी. बर्मन यांनी. काय एकेक शब्द आहेत गुलजार यांचे! एखाद्या झाडाविषयी सुद्धा इतकं समरसून लिहावे? आणि त्यावर कोटीचा संगीताचा साज चढवावा तो आर.डी. यांनीच! तो…
दिवाळी, दसरा, होळी अशा प्रत्येक महत्त्वाच्या सणावारांना हमखास आईची आठवण येते. कोणालाच ऐकू न येणारी ही अज्ञात स्पंदनं हृदयात कुठेतरी जाणीव करून देत असतात… कधीच न विझणारी तिच्या विचारांची ज्योत मनात असते अन् ती जीवनातील अनेक चढ-उताराच्या प्रसंगी तुम्हाला मार्गदर्शन करत असते… जणू तुम्हाला सांगत असते की, “घाबरू नकोस! तू एकटी नाहीस… कारण माझा अंश तुझ्यात आहे! मी तुझ्यामध्येच आहे!” आई प्रत्येक क्षणाला आठवते… विशेषतः सणावारांच्या दिवसांत तर जास्तच! जीवनात रंग भरायला तीच शिकवते! तिने दिलेली एकूण एक शिकवण लहानपणापासून मनात अधोरेखित होते… रूचकर स्वयंपाक कसा करायचा? कोणता पदार्थ कुठल्या सणाला करायचा? घरातील सर्वांच्या आवडी-निवडी कशा लक्षात ठेवायच्या? कुळाचारांचे पूजाविधी…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
