Author: डॉ. प्रिया गुमास्ते

“आजी, तुला माहिती आहे, आम्ही स्कूलमध्ये उद्या mats घेऊन जाणार आहोत… आम्ही योगा करणार आहोत…” समीर उत्साहात म्हणाला. “योगा नाही रे, योग म्हणावे,” आजीने समीरला समजावले. “योग नाही गं, मी योगा बद्दल सांगतोय. These are the kind of exercises that we do on mats. ते तुला माहीत नसेल,” समीर स्वतःचे म्हणणे सोडायला तयार नव्हता. “अरे बाळा, हे योग माझ्यापेक्षाही खूप खूप जुने आहे आणि हे exercises फक्त त्याचा एक भाग आहेत,” आजी समीरला म्हणाली… “ये सांगते तुला.” योग शब्द हा संस्कृत शब्द ‘यजु’पासून आला आहे. ज्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्र करणे आहे. जरी हा शब्द विविध अर्थांमध्ये वापरला जाऊ शकतो, तरी…

Read More

मागील भागात आपण दिनचर्येबाबत माहिती करून घेताना सकाळी उठल्यापासून स्नानापर्यंत काय करावे, हे पाहिले. आता उर्वरीत दिवसाची योग्य आखणी समजून घेऊ. स्नान – शरीर शुद्धीकरण अभ्यंग आणि उद्वर्तन झाल्यावर स्नान करावे. दीपन वृष्ययुष्यं स्नानं ऊर्जाबलप्रदम् | कण्डूमश्रमस्वेदतन्द्राहपापमजित् || स्नानामुळे पचन सुधारते, ते कामोत्तेजक म्हणून कार्य करते, आयुष्य वाढवते. उत्साह आणि शक्ती वाढवते. शरीरावर जमलेली घाण काढून टाकण्यास मदत करते, त्वचेला येणारी खाज दूर करते. स्नानासाठी वापरण्याचे पाणी कसे असावे? उष्णाम्बुना अधकायस्य परिषेके बलावहः तेनैवतूत्तमांगस्य बलहृत्केशचक्षुषाम् || कोमट पाणी अंगावर ओतल्याने शक्ती मिळते, पण डोक्यावरही तसेच कोमट पाणी वापरल्यास केस आणि डोळ्यांची शक्ती कमी होते. स्नान शरीर शुद्धीसाठी आवश्यक आहेच, पण काही…

Read More

मागील काही भागांत आपण वेगवेगळ्या ऋतू आणि त्यातील आपले योग्य राहणीमान याची माहिती घेतली. त्याचबरोबर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे आपले आचरण कसे असावे, याबाबत ऋषिमुनींनी सखोल मार्गदर्शन केले आहे. यालाच ‘दिनचर्या’ असे म्हणतात.  प्रातरुत्थन म्हणजे सकाळी उठणे ब्राह्मे मुहूर्त उत्तिष्ठेत्स्वस्थो रक्षार्थमायुषः ||तत्र सर्वार्थ शांत्यार्थम् स्मरेच्च मधुसूदनम्”||  निरोगी व्यक्तीने आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी ब्राह्म मुहूर्तावर उठावे, असे अष्टांग हृदय नावाच्या ग्रंथात सांगितले आहे. रात्रेश्चतुर्दशो मुहूत्तो ब्राह्मो मुहूर्त:।।  रात्रीचा 14वा मुहूर्त म्हणजेच शेवटचा प्रहर. 1 मुहूर्त = 48 मिनिटे. ब्रह्म मुहूर्त सूर्योदयाच्या अगदी दोन मुहूर्त आधी सुरू होतो; म्हणजेच तो सूर्योदयाच्या 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होतो आणि त्याच्या 48 मिनिटे आधी संपतो. आपल्याला माहिती आहे…

Read More

आपल्या ऋतुचर्या मालिकेतील सहावा आणि शेवटचा ऋतू म्हणजे हेमंत वा हिवाळा. हा वर्षातील सर्वात आल्हाददायक काळ आहे. महिने : भारतात हिवाळ्याची सुरुवात हेमंत ऋतूच्या प्रारंभापासून होते आणि जानेवारीमध्ये होणाऱ्या हिवाळी संक्रांतीने संपते. हिंदू कॅलेंडर लक्षात घेता, मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यांत हेमंत ऋतू येतो,  ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ते ऑक्टोबरच्या मध्यापासून ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत हाऋतू असतो.  ऋतू वर्णन शीतेअग्र्यं, वृष्तिघर्मेअल्पंबलं, मध्यंतुशेषयो: ||  हवेत हळूहळू पण लक्षणीय गारवा येत असल्याने, हेमंत ऋतू थंड सकाळ आणि संध्याकाळी उशिरा थंडगार वातावरण घेऊन येतो. यजुर्वेदात ‘दवाचा ऋतू’ म्हणून उल्लेख केलेला हा काळ. सूर्याचे शक्तिशाली किरण कमी होऊ लागतात आणि दिवस थोडे उबदार असताना राखाडी रंगाचे ढग येतात.…

Read More