Author: Team Avaantar

आराधना जोशी नुकताच जागतिक मातृदिन साजरा झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर मी एक फोटो शेअर केला होता. मी, माझी लेक, आई आणि आजी अशा चार पिढ्या त्या फोटोत दिसतात. अनेकांनी त्या फोटोला लाइक केले. त्यानिमित्ताने माझी शिरा आजीची (आईची आई) आठवण शेअर करते. विजया कृष्णाजी महाबळ म्हणजे माझी शिराआजी 17 मे 2017 रोजी अनंतात विलीन झाली आणि नऊ दशकांचा एक प्रदीर्घ प्रवास संपला. अवघ्या चार दिवसांवर तिचा वाढदिवस आला होता. या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे, आजी आणि आई यांचा वाढदिवस एकाच दिवशी तर दुसऱ्या दिवशी तिच्या नातीचा म्हणजे माझा वाढदिवस. त्यावरून ती नेहमी मला म्हणायची, ‘जरा काही तास आधी जन्माला यायचं की!’…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या जातकांसाठी येणारा आठवडा हा कार्यक्षेत्राशी निगडित विचारांनी सुरू होईल. जसा आठवडा पुढे सरकेल तशा काही चांगल्या घटना कानावर पडतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील तसेच धनलाभ होण्याचे देखील उत्तम योग आहे. घरात तणाव निर्माण झाल्यास परिस्थिती कशी निवळेल, यावर स्त्रियांनी जास्त लक्ष केंद्रित करावे. वृषभ वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्याच्या प्रारंभी काहीतरी नवीन शिकावे, अशी इच्छा उत्पन्न झाली तर, त्यावर अंमल करणे खूप फायद्याचे ठरेल. मनातील चिंतेचा आपल्या संभाषणावर काही परिणाम तर होत नाही ना, याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये घरातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाकडे अत्यंत बारकाईने पाहणे आणि त्यावर विचार…

Read More

उमा काळे आयुष्यात आपल्याला खूप काही शिकायला मिळतं… काही प्रसंगातून, काही अनुभवातून शिकायला मिळतं… तर, काही वेळा काही कारण नसतानाही आयुष्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. त्याला आपण नशीब म्हणतो आणि विषय सोडून देतो… खरंच, इतकं सोपं आहे का हे? मला नेहमी प्रश्न पडतो हा! हे सगळं आपल्या वाट्याला येतं, त्यामध्ये आपलेच लोक असतात. आपलं सुख सोडून ज्यांच्या सुखासाठी अधिक झटतो, तेच सर्वात आधी आपला विश्वासघात करतात. त्याचा परिणाम असा होतो की, बाहेरचे लोक या गोष्टींचा गैरफायदा घ्यायलाही मागे सरत नाही… त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आधी आपलं भविष्य सुरक्षित करा, मग खुशाल दुसऱ्यांच्या मदतीला धावून जा… या कलियुगात प्रामाणिकपणा तसेच नि:स्वार्थी, निस्सीम…

Read More

सुप्रिया महाबळ अडचणीच्या वेळी कोण कधी धावून येईल, हे सांगता येत नाही. कधी कधी ओळख नसतानाही अचानक कोणाचा तरी मदतीचा हात पुढे येतो. काहीवेळेस अल्पशा ओळखीवरही समोरची व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते. जणूकाही त्यासाठीच ती नवी ओळख निर्माण झाली असावी! प्रत्येकवेळी आपल्यालाच कोणी भेटलं पाहिजे, असं नाही. या भूमिकेत अदलाबदल होऊ शकतो. कधीतरी अडचणीच्या प्रसंगी आपणही दुसऱ्यांचा आधार बनू शकतो. एकदा दिवाळीच्या सुट्टीत आम्ही दक्षिण भारताच्या सहलीला गेलो होतो. आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे, प्रवास घडताना वेगवेगळे अनुभव गाठीशी येतातच, शिवाय, त्यातून आपल्याला शहाणपण येतं. आमच्या या सहलीतही एक मजेशीर, आगळावेगळा अनुभव आला. दक्षिण भारताची सहल आटोपून परतीच्या प्रवासात होतो. मराठवाड्यातील उमरगा नामक…

Read More

अर्चना कुलकर्णी ऑगस्ट महिन्यातला शेवटचा आठवडा होता. खूप पाऊस पडत होता… दुपारी तीन-साडेतीनची वेळ होती‌.. मी माझ्या कार्यालयात दुपारचा चहा घेत घेत, टेबलावरची पत्रे पाहत होते. त्याच वेळी टेलिफोन खणखणला. रिसिव्हर उचलून मी बोलू लागले, “हॅलो…!” “नमस्कार मॅडम…! मी, भाटे. समीर भाटेचा डॅडी बोलतोय. मॅडम, अकरावीचे क्लासेस सुटले का?” “हो, केव्हाच सुटले. का हो, काय झालं?” “समीर अजून आला नाही घरी म्हणून…!” “मित्राकडे गेला असेल. येईल लवकरच. काळजी नका करू. तो घरी आल्यावर मला कळवा मात्र.” मिस्टर भाटेंना धीर देऊन मी रिसिव्हर खाली ठेवला. समीर भाटे…! मी आठवू लागले, आणि आठवले. त्याचे असे झाले, साधारण जुलैचा दुसरा आठवडा होता तो. अकरावीच्या…

Read More

चंद्रशेखर माधव सुमारे 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे मी एमसीएम झालो ना त्या वेळची. एक कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती, प्रभात रोडला. तिथे माझा एका मित्र फॅकल्टी म्हणून नोकरीला होता. त्याच सुमारास मी पास-आऊट झालेलो असल्यामुळे आणि एकूणच सी लँग्वेज तसेच फॉक्स प्रोमध्ये माझं प्रभुत्व असल्यामुळे, मला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून बोलवण्यात आलं. हळूहळू मी तिथं रुळलो. तिथे नितीन नावाचा एक मॅनेजर होता. तोच ती इन्स्टिट्यूट पूर्णपणे सांभाळायचा. सांगताना मात्र इन्स्टिट्यूट माझी आहे, असं सांगायचा. इन्स्टिट्यूटचे तीन डायरेक्टर होते. त्यातले दोन अमेरिकेला असायचे, एक डायरेक्टर होता पुण्यातच! पण तो मनुष्य कधी फारसं लक्ष घालायचा नाही, म्हणजे अक्षरशः महिना-महिना इन्स्टिट्यूटमध्ये यायचा सुद्धा नाही.…

Read More

मित्रमैत्रिणींनो, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! खरंतर, आपण कोणाला भेटलो, फोनवर बोलणं झालं की, निरोप घेताना किंवा देताना एक मॅनर्स म्हणून ‘टेक केअर’ (Take Care) म्हणायची पद्धत रूढ झालीय. काही मनापासून म्हणणारे आहेत, तर काही सवयीने म्हणणारे आहेत. माहीत नाही, पण कधी-कधी कोणाचं टेक केअर ऐकलं की मनापासून बरं वाटतं. कदाचित, ते कोणीतरी म्हणावं, अशी अपेक्षा काही कारणाने आपल्यामध्ये निर्माण झालेली असते. आता एखाद्या आजारी व्यक्तीला आपण भेटायला गेलो आणि त्या व्यक्तीला Take care म्हटलं म्हणून तो स्वत:ची काळजी घेणार का? तर नाही. हे दोन जादुई शब्द (magic words) आहेत, समोरच्या व्यक्तीला मानसिक उभारी देण्यासाठी! एखादी व्यक्ती अशीही असू शकते, जी म्हणेल,…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष राशी जोडीदाराला, भागीदाराला अथवा प्रतिस्पर्धी असल्यास त्याला योग्य तो मान द्या. हाताखालच्या माणसांना सांभाळा. छान, सुंदर रुचकर पदार्थ खायचा योग आहे, खाऊन तृप्त व्हा. लहान मुलांनी पालकांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घ्यावा. वृषभ रास सट्टा बाजार, शेअर मार्केट यांच्याकडे मन आकर्षित होत असले तरी, संयम बाळगा. कर्मचारी असल्यास कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष द्या. स्त्रियांनी तब्येतीला प्राधान्य देणे योग्य ठरेल. जोडीदाराने याबाबतीत स्त्रीला पूर्ण सहयोग करणे अपेक्षित आहे. मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा थोडा थकवणारा असू शकतो, पण कष्टाला मागे राहू नका. विवाहित स्त्रियांची माहेर आणि मुले यात थोडी रस्सीखेच…

Read More

मनोज जोशी कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, असे म्हटले जाते. पण मला दोनदा पायरी चढावी लागली. सर्व मामला चोरीचाच होता, पण हे दोन्ही अनुभव कायम लक्षात राहतील, असेच होते. एकदा वांद्रे कोर्ट तर, दुसऱ्यांदा वसई कोर्ट… एकदा घड्याळाची चोरी तर, दुसऱ्या वेळेस मोबाइल लंपास… लोकमतला असताना 2012-13 मध्ये माझा मोबाइल चोरीला गेला होता. त्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केल्यावर काही दिवसांत मला कोर्टाचे बोलावणे आले… केस उभी राहिली… एका दिवसांत निकाल लागला आणि फोन परत मिळाला. अर्थात, तो माझा नव्हता. पोलिसांकडे त्याच कंपनीचे मॉडेल उपलब्ध होते, तो मला दिला. भाग – 2 वसई कोर्टात माझ्या केसचा पुकारा होईपर्यंत कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत…

Read More

सुनीता मुकुंद श्री देवीची शक्तीपीठे 108 किंवा 51 असल्याचे मानले जाते. या 51पैकी भारतात 42, श्रीलंकेत एक, तिबेटमध्ये एक, बांगलादेशात चार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये एक, नेपाळ दोन आहेत. सतीचे निष्प्राण कलेवर (देह) घेऊन श्रीशंकर क्रोधायमान स्थितीत निघाले तेव्हा, त्यांचा राग शांत करण्यासाठी श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे तुकडे केले. ते अवयव ज्याठिकाणी पडले ती शक्तीपीठे झाली. मागील भागात आपण 25 शक्तिपीठांची माहिती घेतली होती. आता उर्वरित 26 शक्तिपीठे…. हेही वाचा – भारतातील शक्तिपीठे 26. उज्जयनी शक्तिपीठ : उज्जैन, क्षिप्रानदी तट, मध्य प्रदेश; उजवी कुशी. शक्ती – हरसिद्धी / मंगला / चंडिका, भैरव – मांगल्य / कपिलाम्बर 27. मणिवेदिका शक्तिपीठ : पुष्कर, राजस्थान;…

Read More