Author: Team Avaantar

अजित गोगटे `शीतावरून भाताची परीक्षा` या म्हणीनुसार काही पत्रकारांच्या अपवादात्मक वर्तनावरून सर्वच पत्रकारांच्या गैरवर्तनाचे गृहीतक काढणे योग्य आहे का? यावर ज्यामुळे मत-मतांतरे मांडली गेली त्या प्रसंगाविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा प्रसंग मी दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये नोकरीला असताना 1980च्या दशकाच्या पूर्वार्धात घडला. नक्की कुठे ते आठवत नाही. पण त्यावर्षीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर, बहुदा मध्य प्रदेशात कुठे तरी भरणार होते. संमेलनाच्या आयोजन समितीने संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेसोबत `लोकसत्ता`सह मुंबईतील वृत्तपत्रांना औपचारिक निमंत्रण पाठविले होते. सोबत एक पत्रही होते. त्यात संमेलनासाठी येणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाईल, या नेहमीच्या मजकूराखेरीज पुढील सूचनाही ठळकपणे लिहिलेली होती : “काही पत्रकार…

Read More

आराधना जोशी यंदा 9 जुलैला ई टीव्ही मराठीचा (Etv Marathi) 25वा वर्धापन दिन साजरा झाला. या ई टीव्हीच्या पहिल्या दिवसापासूनच्या प्रवासात मी रिपोर्टर म्हणून सहप्रवासी होते. ई टीव्ही मराठीच्या त्यावेळच्या मुंबई ब्युरो चीफ जयश्री मॅडमनी विश्वास दाखवून राजकीय बीटवर काम करण्याची संधी मला दिली होती. त्यामुळे अनेक राष्ट्रीय तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना भेटण्याची संधी मिळाली होती. आजची आठवण माजी उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्याशी निगडीत आहे. दिवस नेमका आठवत नाही, पण साल होतं 2000. ई टीव्ही मराठी चॅनल नुकतंच सुरू झालं होतं. माझ्या दिवसभरातल्या बातम्यांचं काम आटोपून मी ऑफिसला आले आणि जयश्री मॅडमनी मला बोलावून घेतलं. एक निमंत्रणपत्रिका माझ्यासमोर ठेवली…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 जुलै 2025, वार : बुधवार भारतीय सौर : 25 आषाढ शके 1947, तिथि : षष्ठी 21:01, नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 28:49 योग : शोभन 11:56, करण : गरज 09:52 सूर्य : मिथुन, चंद्र : मीन, सूर्योदय : 06:09, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आर्थिक अडचणी संपत असल्याचे संकेत मिळायला सुरुवात होईल. कामाच्या ठिकाणी होणारे बदल चांगल्यासाठी असतील. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. भाऊ-बहिणींचा सहवास मिळाल्याने…

Read More

चंद्रशेखर माधव एकदा रात्री साधारण साडेआठच्या सुमारास अचानक अरुणचा फोन आला. अरुण म्हणजे माझ्या ऑफिसमधला माझा सहकारी. मला म्हणाला “तुमच्या घराजवळ माझी गाडी बंद पडली आहे. जरा येता का?” मी त्याला लगेचच “आलोच,” असं म्हणून फोन ठेवला… मी घरीच होतो, त्यामुळे लगेचच तिथे पोहोचलो. बघितलं तर गाडीमध्ये अरुण, त्याचे दोन मोठे बंधू आणि आई पण होती. मी पोहोचताच अरुण खाली उतरला. गाडी दुरुस्त करण्यासंबंधी आम्हाला फार काही कळत होतं, असं नाही; पण तरीसुद्धा आम्ही दोघांनी मिळून थोडीशी खटपट केली. कुठे एखादी वायर वगैरे निघालेली दिसतेय का किंवा सैल झाली असेल का? असले प्रयत्न करून पाहिले. पण काही केल्या गाडी सुरू…

Read More

सुरेश महाबळ योगायोग हा प्रकार अनेकांच्या जीवनामध्ये येत असतो. असाच एक प्रकार माझ्यासोबत झाला आहे, तो पण देवस्थानाच्या ठिकाणी. यामुळे माझा तो सुखद धक्का होता. मोठी मुलगी हर्षा B.Tech. झाल्यानंतर लगेचच एका MNC कंपनी मधे रुजू झाली आणि अद्याप कार्यरत आहे. ते वर्ष होते 2009. या कंपनीचे महाराष्ट्र आणि इतर प्रांतांमध्ये स्वमालकीचे रिसॉर्ट आहेत. 2011 साली हर्षाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी 2012मध्ये तिने महाबळेश्वर-पाचगणी रिसॉर्टसाठी अर्ज केला आणि ऑफ सीझन असल्यामुळे तिला बुकिंगसुद्धा मिळाले. त्याप्रमाणे मला, पत्नी संगीता आणि दुसरी कन्या मानसी असे आम्हाला ठाण्यात दुसऱ्या भावाकडे जळगावहून यावयास सांगितले. हर्षाने टॅक्सी बुकिंग अधीच करून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 जुलै 2025, वार : मंगळवार भारतीय सौर : 24 आषाढ शके 1947, तिथि : पंचमी 22:39, नक्षत्र : शततारका 06:25, पू. भाद्रपदा 29:46 योग : सौभाग्य 14:11, करण : कौलव 11:21 सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ 23:57, सूर्योदय : 06:09, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – पालकांच्या आशीर्वादाने आज कामात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या वर्तनाचा आणि कृतींचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. एखादा नवीन व्यवसाय…

Read More

सुहास गोखले सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हटले जाते. चंद्र पृथ्वीभोवती 27.3 दिवसांत एक फेरी मारतो. त्यामुळे रोज तो आकाशात वेगवेगळ्या ताऱ्यांच्या मांडणीसमोरून जाताना दिसतो. हेच आयनिकवृत्ताचे 27 भाग चंद्राची घरे किंवा नक्षत्र म्हणून कल्पिलेले आहेत. आकाशस्थ नक्षत्रांसंदर्भातील लेखमालेचा हा सहावा भाग. विशाखा : काही नक्षत्रे त्यांच्या चांदणीच्या प्रखर तेजाने पटकन ओळखता येतात तर, काहींना मात्र शोधण्यासाठी थोडा त्रास होतो. विशाखा देखील असेच एक नक्षत्र आहे. या तारकांना प्रखर तेज नसले तरी, पुरेशा तेजामध्ये त्या अगदी काटेकोर मांडलेल्या आढळतात. स्वाती नक्षत्राच्या थोडे पुढे पूर्वेस पाहिल्यास आपणास दोन समान तेजाच्या तारका थोड्या अंतराने अगदी समान रेषेत आढळतात. तेच…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 जुलै 2025, वार : सोमवार भारतीय सौर : 23 आषाढ शके 1947, तिथि : चतुर्थी 23:59, नक्षत्र : धनिष्ठा 06:48 योग : आयुष्यान 16:13, करण : बव 12:33 सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ, सूर्योदय : 06:08, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 10.03 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाचा थकवा जाणवू शकतो. कार्यालयीन राजकारणापासून दूर रहा. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करायची असेल तर, आजचा दिवस शुभ…

Read More

डॉ. किशोर महाबळ “सर, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला काही गोष्टी सुचवू का?” एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गशिक्षक असलेल्या तरुण प्राध्यापकांना विचारले. प्राध्यापकांनी अर्थातच होकारात्मक प्रतिसाद दिल्यावर तो विद्यार्थी पुढे म्हणाला, “सर, तुम्ही आजकालच्या आधुनिक कल्पना स्वीकारल्या आहेत, पण आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली नाही. मला वाटते की, साध्याशा दिसणाऱ्या शर्ट, पँटऐवजी तुम्ही रोज अतिशय आकर्षक फॅशनेबल, ब्रॅण्डेड कपडे वापरायला सुरूवात करायला हवी. टू व्हीलर वापरण्याऐवजी तुम्ही लवकरच एखादी चांगली कारही खरेदी केली पाहिजे. शक्य असल्यास कार चालवण्यासाठी एखादा चालकही ठेवा.” या सगळ्या सूचना ऐकून प्राध्यापकांना मजा वाटली; पण त्यामागची कारणं मात्र त्यांच्या लक्षात आली नाहीत. म्हणून काहीशा उत्सुकतेनं त्यांनी विचारलं, “तुझ्या…

Read More

शैलेश विजया सोमनाथ महाजन प्रत्येकाच्या मनात अनेकदा द्वंद्व सुरू असते. प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’ नाटकातील ’ “To be, or not to be, that is the question…’ असाच काहीसा प्रकार सुरू असतो. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे, सामाजिक स्तरावरही असेच द्वंद्व सुरू असते. राष्ट्र उभारणीसाठी विरोध कोणाचा? तर आपलाच! आपल्याच देशातल्या नागरिकांचा, का? अज्ञानापोटी की अतिज्ञानामुळे? अहंकारापोटी? स्वार्थापोटी? की प्रवृत्तीच वाईट आहे, म्हणून! काम करायला नको, सर्व गोष्टी फुकट पाहिजेत अशा कामचोर लोकांचा? माझी, आमची सत्ता जाईल म्हणून? सर्व कारभार बिनबोभाट व्हावा म्हणून? सहज दुसऱ्यांना फसवून आपला स्वार्थ साधता येतो, की येत नाही म्हणून? की दुसऱ्यांशी लागेबांधे आहेत, म्हणून?…

Read More