Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 जुलै 2025, वार : बुधवार भारतीय सौर : 25 आषाढ शके 1947, तिथि : षष्ठी 21:01, नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 28:49 योग : शोभन 11:56, करण : गरज 09:52 सूर्य : मिथुन, चंद्र : मीन, सूर्योदय : 06:09, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आर्थिक अडचणी संपत असल्याचे संकेत मिळायला सुरुवात होईल. कामाच्या ठिकाणी होणारे बदल चांगल्यासाठी असतील. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. भाऊ-बहिणींचा सहवास मिळाल्याने…

Read More

चंद्रशेखर माधव एकदा रात्री साधारण साडेआठच्या सुमारास अचानक अरुणचा फोन आला. अरुण म्हणजे माझ्या ऑफिसमधला माझा सहकारी. मला म्हणाला “तुमच्या घराजवळ माझी गाडी बंद पडली आहे. जरा येता का?” मी त्याला लगेचच “आलोच,” असं म्हणून फोन ठेवला… मी घरीच होतो, त्यामुळे लगेचच तिथे पोहोचलो. बघितलं तर गाडीमध्ये अरुण, त्याचे दोन मोठे बंधू आणि आई पण होती. मी पोहोचताच अरुण खाली उतरला. गाडी दुरुस्त करण्यासंबंधी आम्हाला फार काही कळत होतं, असं नाही; पण तरीसुद्धा आम्ही दोघांनी मिळून थोडीशी खटपट केली. कुठे एखादी वायर वगैरे निघालेली दिसतेय का किंवा सैल झाली असेल का? असले प्रयत्न करून पाहिले. पण काही केल्या गाडी सुरू…

Read More

सुरेश महाबळ योगायोग हा प्रकार अनेकांच्या जीवनामध्ये येत असतो. असाच एक प्रकार माझ्यासोबत झाला आहे, तो पण देवस्थानाच्या ठिकाणी. यामुळे माझा तो सुखद धक्का होता. मोठी मुलगी हर्षा B.Tech. झाल्यानंतर लगेचच एका MNC कंपनी मधे रुजू झाली आणि अद्याप कार्यरत आहे. ते वर्ष होते 2009. या कंपनीचे महाराष्ट्र आणि इतर प्रांतांमध्ये स्वमालकीचे रिसॉर्ट आहेत. 2011 साली हर्षाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी 2012मध्ये तिने महाबळेश्वर-पाचगणी रिसॉर्टसाठी अर्ज केला आणि ऑफ सीझन असल्यामुळे तिला बुकिंगसुद्धा मिळाले. त्याप्रमाणे मला, पत्नी संगीता आणि दुसरी कन्या मानसी असे आम्हाला ठाण्यात दुसऱ्या भावाकडे जळगावहून यावयास सांगितले. हर्षाने टॅक्सी बुकिंग अधीच करून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 जुलै 2025, वार : मंगळवार भारतीय सौर : 24 आषाढ शके 1947, तिथि : पंचमी 22:39, नक्षत्र : शततारका 06:25, पू. भाद्रपदा 29:46 योग : सौभाग्य 14:11, करण : कौलव 11:21 सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ 23:57, सूर्योदय : 06:09, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – पालकांच्या आशीर्वादाने आज कामात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या वर्तनाचा आणि कृतींचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. एखादा नवीन व्यवसाय…

Read More

डॉ. किशोर महाबळ “सर, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला काही गोष्टी सुचवू का?” एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गशिक्षक असलेल्या तरुण प्राध्यापकांना विचारले. प्राध्यापकांनी अर्थातच होकारात्मक प्रतिसाद दिल्यावर तो विद्यार्थी पुढे म्हणाला, “सर, तुम्ही आजकालच्या आधुनिक कल्पना स्वीकारल्या आहेत, पण आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली नाही. मला वाटते की, साध्याशा दिसणाऱ्या शर्ट, पँटऐवजी तुम्ही रोज अतिशय आकर्षक फॅशनेबल, ब्रॅण्डेड कपडे वापरायला सुरूवात करायला हवी. टू व्हीलर वापरण्याऐवजी तुम्ही लवकरच एखादी चांगली कारही खरेदी केली पाहिजे. शक्य असल्यास कार चालवण्यासाठी एखादा चालकही ठेवा.” या सगळ्या सूचना ऐकून प्राध्यापकांना मजा वाटली; पण त्यामागची कारणं मात्र त्यांच्या लक्षात आली नाहीत. म्हणून काहीशा उत्सुकतेनं त्यांनी विचारलं, “तुझ्या…

Read More

शैलेश विजया सोमनाथ महाजन प्रत्येकाच्या मनात अनेकदा द्वंद्व सुरू असते. प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’ नाटकातील ’ “To be, or not to be, that is the question…’ असाच काहीसा प्रकार सुरू असतो. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे, सामाजिक स्तरावरही असेच द्वंद्व सुरू असते. राष्ट्र उभारणीसाठी विरोध कोणाचा? तर आपलाच! आपल्याच देशातल्या नागरिकांचा, का? अज्ञानापोटी की अतिज्ञानामुळे? अहंकारापोटी? स्वार्थापोटी? की प्रवृत्तीच वाईट आहे, म्हणून! काम करायला नको, सर्व गोष्टी फुकट पाहिजेत अशा कामचोर लोकांचा? माझी, आमची सत्ता जाईल म्हणून? सर्व कारभार बिनबोभाट व्हावा म्हणून? सहज दुसऱ्यांना फसवून आपला स्वार्थ साधता येतो, की येत नाही म्हणून? की दुसऱ्यांशी लागेबांधे आहेत, म्हणून?…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे इंग्रजी उच्चाराप्रमाणे योगा म्हणून ओळखला जाणारा योगाभ्यास किंवा योग मुळात भारतातील प्रकार आहे. योग किंवा योगा करणे हा आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. योग म्हणजे केवळ व्यायाम नाही तर, योग आपल्याला दैनंदिन ताण-तणावातून मुक्त करण्यासाठी प्रेरित करते. योगचे असे अनेक फायदे आहेत. योगमुळे शरीर लवचिक बनतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते. नियमित योग केल्याने आपले अंतर्मन शुद्ध होते… योगमुळे आपल्यात भरपूर प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, त्याचबरोबर स्वतःमध्ये कौशल्य विकसित होण्यास मदत होते. योग ही परिपूर्णतेची जननी आहे. धकाधकीच्या आयुष्यात कायम ताणतणावांना सामोरे जावे लागते. म्हणूनच, लहान वयातच उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास, हृदयविकाराच्या झटक्याचा धोका निर्माण होतो.…

Read More

लीना जोशी परुळेकर आतापर्यंत आपण आपली त्वचा कशी असते आणि तिच्यावर कुठल्या गोष्टींचे परिणाम होतात ते पाहिले. आता आपण त्वचेची काळजी कशी घ्यावी, ते पाहू. त्वचेची काळजी घेताना आपण कायम एक महत्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे सातत्य. कधीतरी त्वचेची काळजी घेतली तर त्वचा तेवढ्या पुरतीच टवटवीत दिसेल. पण जर रोजच्या रोज काळजी घेतली तर, ती कुठल्याही ऋतूत, दिवसाच्या कुठल्याही प्रहरी टवटवीतच दिसेल. त्वचेची काळजी घेताना आपण दिवसा CTMS आणि रात्री CTN हा Plan follow करणार आहोत. यात C म्हणजे Cleansing आणि T म्हणजे Toning. दिवसा यात M म्हणजे Moisturizing आणि S म्हणजे Sunscrean. रात्री CTN Plan आहे. यात N…

Read More

मनोज जोशी सिनेउद्योग हा अनेकांचा चरितार्थ चालविणारा महत्त्वाचा उद्योग आहे. याची खासियत अशी की, या उद्योगातील निर्मितीमध्ये विविध उद्योगांचे प्रतिबिंबही पाहायला मिळते. काही गाणी तर या उद्योगांना अधोरेखित करणारी आहेत. मागील लेखांमध्ये आपण अशा मराठी गाण्यांचा आढावा घेतला होता. यावेळी आपण हिंदी गाणी पाहूयात. वास्तवात रोजगार, उद्योगाची पहिली पायरी म्हणजे, बेरोजगारी. यावरही काही गाणी आहेत, जी लोकप्रियही झाली आहेत. सर्वात आधी उल्लेख करावा लागेल तो, विनोद खन्ना याच्या ‘मेरे अपने’ चित्रपटातील ’हालचाल ठीकठाक हैं…’ या गाण्याचा. नंतर सलमान खान अभिनीत ‘जागृती’ सिनेमातील ’हम सारे बेकार…’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. मग बूट पॉलिशने सुरुवात होते. ‘बूट पॉलिश’ चित्रपटातील ‘ठहर जरा ओ…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… एक ऑडिशन आणि त्यावेळची ही आठवण! एका हिंदी सीरियलच्या ऑडिशनसाठी मला कॉल आला. “लग्नाचा सीक्वेन्स आहे… छान साडी, ज्वेलरी, गजरे आणि मेकअप करून या…”, असं मला सांगण्यात आलं. मी त्यांना ‘ओके’ म्हटलं आणि छान तयार होऊन ऑडिशनला गेले. ‘इनऑर्बिट मॉल’च्या (Inorbit Mall) पाठीमागे एका बिल्डिंगमध्ये त्यांचं ऑफिस होतं. ऑडिशन मस्त झाली. ऑफिसमधून बाहेर पडून खाली उतरले, तो चांगलाच अंधार झाला होता. आतासारखी तिथे डेव्हलपमेन्ट झाली नव्हती. संध्याकाळी 6-7 वाजता ऑफिसेस सुटली की, त्यानंतर रस्त्यावरील वर्दळही हळूहळू कमी होत असे. गाड्या, रिक्षा, माणसं… फारच तुरळक होती. मी खाली ऑटोची वाट पाहात होते…

Read More