Author: Team Avaantar

अनिता बाळकृष्ण वैरागडे इंग्रजी उच्चाराप्रमाणे योगा म्हणून ओळखला जाणारा योगाभ्यास किंवा योग मुळात भारतातील प्रकार आहे. योग किंवा योगा करणे हा आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. योग म्हणजे केवळ व्यायाम नाही तर, योग आपल्याला दैनंदिन ताण-तणावातून मुक्त करण्यासाठी प्रेरित करते. योगचे असे अनेक फायदे आहेत. योगमुळे शरीर लवचिक बनतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते. नियमित योग केल्याने आपले अंतर्मन शुद्ध होते… योगमुळे आपल्यात भरपूर प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, त्याचबरोबर स्वतःमध्ये कौशल्य विकसित होण्यास मदत होते. योग ही परिपूर्णतेची जननी आहे. धकाधकीच्या आयुष्यात कायम ताणतणावांना सामोरे जावे लागते. म्हणूनच, लहान वयातच उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास, हृदयविकाराच्या झटक्याचा धोका निर्माण होतो.…

Read More

लीना जोशी परुळेकर आतापर्यंत आपण आपली त्वचा कशी असते आणि तिच्यावर कुठल्या गोष्टींचे परिणाम होतात ते पाहिले. आता आपण त्वचेची काळजी कशी घ्यावी, ते पाहू. त्वचेची काळजी घेताना आपण कायम एक महत्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे सातत्य. कधीतरी त्वचेची काळजी घेतली तर त्वचा तेवढ्या पुरतीच टवटवीत दिसेल. पण जर रोजच्या रोज काळजी घेतली तर, ती कुठल्याही ऋतूत, दिवसाच्या कुठल्याही प्रहरी टवटवीतच दिसेल. त्वचेची काळजी घेताना आपण दिवसा CTMS आणि रात्री CTN हा Plan follow करणार आहोत. यात C म्हणजे Cleansing आणि T म्हणजे Toning. दिवसा यात M म्हणजे Moisturizing आणि S म्हणजे Sunscrean. रात्री CTN Plan आहे. यात N…

Read More

मनोज जोशी सिनेउद्योग हा अनेकांचा चरितार्थ चालविणारा महत्त्वाचा उद्योग आहे. याची खासियत अशी की, या उद्योगातील निर्मितीमध्ये विविध उद्योगांचे प्रतिबिंबही पाहायला मिळते. काही गाणी तर या उद्योगांना अधोरेखित करणारी आहेत. मागील लेखांमध्ये आपण अशा मराठी गाण्यांचा आढावा घेतला होता. यावेळी आपण हिंदी गाणी पाहूयात. वास्तवात रोजगार, उद्योगाची पहिली पायरी म्हणजे, बेरोजगारी. यावरही काही गाणी आहेत, जी लोकप्रियही झाली आहेत. सर्वात आधी उल्लेख करावा लागेल तो, विनोद खन्ना याच्या ‘मेरे अपने’ चित्रपटातील ’हालचाल ठीकठाक हैं…’ या गाण्याचा. नंतर सलमान खान अभिनीत ‘जागृती’ सिनेमातील ’हम सारे बेकार…’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. मग बूट पॉलिशने सुरुवात होते. ‘बूट पॉलिश’ चित्रपटातील ‘ठहर जरा ओ…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… एक ऑडिशन आणि त्यावेळची ही आठवण! एका हिंदी सीरियलच्या ऑडिशनसाठी मला कॉल आला. “लग्नाचा सीक्वेन्स आहे… छान साडी, ज्वेलरी, गजरे आणि मेकअप करून या…”, असं मला सांगण्यात आलं. मी त्यांना ‘ओके’ म्हटलं आणि छान तयार होऊन ऑडिशनला गेले. ‘इनऑर्बिट मॉल’च्या (Inorbit Mall) पाठीमागे एका बिल्डिंगमध्ये त्यांचं ऑफिस होतं. ऑडिशन मस्त झाली. ऑफिसमधून बाहेर पडून खाली उतरले, तो चांगलाच अंधार झाला होता. आतासारखी तिथे डेव्हलपमेन्ट झाली नव्हती. संध्याकाळी 6-7 वाजता ऑफिसेस सुटली की, त्यानंतर रस्त्यावरील वर्दळही हळूहळू कमी होत असे. गाड्या, रिक्षा, माणसं… फारच तुरळक होती. मी खाली ऑटोची वाट पाहात होते…

Read More

सुरेश महाबळ आज गुरू पौर्णिमा… मला अनेक गुरुजनांचा सहवास आणि सेवा करण्याची संधी मिळाली. अशाच एका महान गुरूंची आठवण मी आज सांगणार आहे. शैक्षणिक तफावत असून सुद्धा माझ्या वाचनाची आवड लक्षात घेऊन अनेक विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी पण माझी पाठ थोपटून माझ्याकडून अनेक पुस्तके स्वतःच्या संदर्भासाठी वापरली. हे गुरू म्हणजे प्रा. म. मो. केळकर. अत्यंत स्वच्छ वर्तन, उंची जेमतेम पाच फूट, वर्ण गोरा, केस मागे फिरविलेले – त्यामुळे कपाळ मोठे दिसायचे. निळे डोळे समोरच्याचा वेध घेणारे. अंगावर कायम आवडता पेहराव म्हणजे झब्बा आणि पायजमा… ते एम. जे. कॉलेज, जळगाव येथे संस्कृत विभागाचे प्रमुख होते. जळगाव, धुळे,…

Read More

अजित गोगटे पत्रकारितेमधील अनीतिमूल्ये कशाप्रकारे डोके वर काढत असतात, त्याचा बराच अनुभव घेतला आहे. पत्रकारितेच्या नोकरीच्या सुरुवातीस म्हणजे सन 1978-79मध्ये मी त्यावेळच्या भारतातील एकमेव सरकारी वृत्तसंस्थेत नोकरीला होतो, तेव्हाचा हा प्रसंग. मूळचे रशियन असलेले `व्होडका` हे विदेशी मद्य त्या काळात भारतात आजच्यासारखे सर्रासपणे मिळत नसे. त्यामुळे पट्टीच्या पिणार्‍यांना व्होडकाबद्दल आकर्षण आणि कुतूहल असे. त्यावेळच्या सोवियत संघाची एक विमानवाहू युद्धनौका मैत्रीपूर्ण सदिच्छा भेटीसाठी मुंबईच्या नौदल गोदीत आली होती. तेव्हा भारत पूर्णपणे सोवियत संघाच्या कंपूत होता. त्या युद्धनौकेच्या कमांडिंग ऑफिसरने मुंबईतील पत्रकारांना युद्धनौकेला भेट देण्यासाठी निमंत्रित केले. ही भेट दुपारच्या वेळी होती आणि त्यात युद्धनौकेवर जेवणही होते. जेवणाच्या आधी कमांडिंग ऑफिसरच्या वार्तालापानंतर…

Read More

आराधना जोशी मुंबई आणि परिसरात राहणाऱ्यांना लोकल ट्रेन किती महत्त्वाची आहे, हे सांगण्याची गरज नाही. सकाळ आणि संध्याकाळच्या लोकल या अनेकांचे एक कटुंबच बनले आहे. पण स्मार्टफोनने यात बिब्बा घातला आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वेगवेगळ्या कारणांनी मुंबईतल्या लोकल ट्रेनचा प्रवास मी करतेय. गेल्या काही वर्षांपासून त्यात नियमितता नसली तरी, पूर्णपणे खंडही पडलेला नाही. त्यामुळे लोकल प्रवास आणि त्यातले किस्से यांचा प्रचंड साठा माझ्याकडे जमलेला आहे. पण आजचा लेख यावर आधारलेला नाही. तो आहे मोबाइल फोन संस्कृतीवर. आता प्रश्न असा आहे की, लोकलचा आणि मोबाइल फोनचा काय संबंध? खूप लहानपणापासून लोकलमधून जो प्रवास मी केलेला…

Read More

डॉ. किशोर महाबळ “सर, आम्ही शाळेत असल्यापासून अनुभव घेत आलो आहोत की, कोणताही शिक्षक किंवा शिक्षिका सामान्यतः विद्यार्थ्यांवर टीका करण्याची एकही संधी वाया घालवत नाही. याउलट, गेली काही वर्षे आम्ही बघतोय की, तुम्ही शिक्षक असलात तरी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा विद्यार्थ्यांचे कौतुक करत आहात. वारंवार हे घडत आहे. हे कसं?” एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्राध्यापकांना विचारले. प्राध्यापकांनी उत्तर दिले, “याला दोन कारणे आहेत. खूप पूर्वी, मी एक अवतरण वाचले होते ज्यात म्हटले होते, “हजारो प्रतिभा तुमच्या नजरेस पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत” (“A thousand talents await recognition). दुसरे कारण म्हणजे, मला महान कलाकार, शास्त्रज्ञ, समाजसुधारक, विद्वान, तत्वज्ञ आणि लेखकांची चरित्र तसेच…

Read More

मनोज जोशी नियमित आयुष्यात तुमचं प्रोफेशन कुठे ना कुठे तरी डोकावतंच. साधारणपणे 25-30 वर्षांपूर्वी विजय पाटकर दिग्दर्शित ‘हलकं फुलकं’ नाटक रंगभूमीवर आलं होतं. त्यावेळी ते खूप लोकप्रियही झालं होतं. या नाटकात विजय कदम, रसिका जोशी आणि नंदू गाडगीळ हे तीनच कलावंत होते. त्यापैकी नंदू गाडगीळ हा सूत्रधार. तर, विजय कदम यांनी या नाटकात सहा तर, रसिका जोशी यांनी पाच वेगवेगळी पात्रं रंगवली होती. दुर्दैवानं, आज हे दोन्ही कलावंत हयात नाही. सांगायचा मुद्दा हा की, या नाटकात रसिका यांनी केशकर्तनालयच्या मालकाच्या पत्नीची भूमिका केली होती. त्यात त्यांचा एक संवाद होता, ‘गप्पा काय दाढीच्या साबणाच्या फेसासारख्या असतात, जेवढ्या फेसाव्यात तेवढा फेस येतो…’…

Read More

डॉ. प्रिया गुमास्ते ‘अरे, किती आइसक्रीम खातोयस? थंडीत बाधेल की…’, आयुर्वेदाची माहिती असणारी आजी आपल्या नातवाला एक प्रकारे ऋतुचर्या समजावत होती. कधी काय खाणे योग्य, काय अयोग्य याची चर्चा बर्‍याच घरांमध्ये होत असते. ऋतुमानानुसार कसे वागावे, काय खावे जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि आपण आजारी पडणार नाही, याचे सखोल मार्गदर्शन आयुर्वेदात केले आहे. ऋतुचर्या म्हणजे काय? ऋतौ ऋतौ आचरणीय: विधि: ऋतुचर्या इति अभिधीयते। वेगवेगळ्या ऋतुनुसार आपल्या आहारविहारात केलेले बदल म्हणजे ऋतुचर्या. यामुळे शरीरातील दोष (वात, पित्त, कफ) संतुलित राहतात आणि आरोग्य चांगले राहते. पण ऋतू म्हणजे काय? आणि कोणता ऋतू सुरू आहे, हे कसे ओळखायचे? मासैर्द्विसङ्ख्यैर्माघाद्यै: क्रमात् षडृतव: स्मृता:। शिशिरोऽथ…

Read More