Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सतीश बर्वे भाग – 3 पाहुण्यांच्या खोलीत राजेशची वाट बघत मी आणि सौरभ बसलो होतो. तिथे पोहोचल्यावर आमच्यासमोर एका शाळकरी मुलीने अदबीने पाण्याचे ग्लास आणून ठेवले आणि स्वतःची ओळख करून दिली. “नमस्कार मी ज्योत्स्ना. लांजेकरांची धाकटी मुलगी. बाबा येतीलच इतक्यात तुम्हाला भेटायला.” असं म्हणून समोरचा पडदा दूर सारून ती आतल्या खोलीत निघून गेली. त्या खोलीत लावलेली राजेशची पेंटिंग्ज मी बघत असताना अचानक पडद्याजवळ पावलं वाजली आणि तो एका बाजूला बांधला गेला. …आणि ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होते तो क्षण अगदी समीप आला. ज्योत्स्नाने राजेशला व्हील चेअरवर बसवून त्या खोलीत आणलं. त्याला त्या अवस्थेत बघून मी आणि सौरभ सोफ्यावरून…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा मग अर्जुनातें म्हणितलें । आम्ही आजि हें नवल देखिलें । जें तुवां येथ आदरिलें । माझारींचि ॥91॥ तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी । आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥92॥ जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें । तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥93॥ तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांते शोचूं पहासी । हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥94॥ तरी…
डॉ. सारिका जोगळेकर (होमिओपॅथिक तज्ज्ञ) ‘मन निरोगी तर तन निरोगी!’ शरीर आणि मनाचे अतूट नाते आज विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. मन आणि शरीर हा संवाद मुख्यतः मेंदूतील न्यूरॉन्स, हार्मोन्स आणि स्नायूसंस्था यांच्या माध्यमातून घडतो. मन शांत, सकारात्मक आणि आनंदी असते, तेव्हा शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते, हार्मोन्सचे संतुलन राखले जाते आणि ऊर्जा पातळी सुधारते. पण जेव्हा मन तणावग्रस्त, अस्वस्थ किंवा नकारात्मक भावनांनी भरलेले असते, तेव्हा शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो. त्यानंतर कालांतराने डायबिटीस, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल अशा आजारांचा प्रवास सुरू होतो. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव वाढत चालले आहेत. त्यामुळे मानसिक आजाराचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे. शरीरात एखादी वेदना झाली की, आपण…
रविंद्र परांजपे मागील लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणार्थ आरोग्यदायी संतुलित जीवनशैली अमलात आणणे नितांत आवश्यक आहे, हे वास्तव लक्षात घेतले. या लेखात आपण आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव याबाबत जाणून घेणार आहोत. पूर्वी फक्त वयस्कर लोकांना मनोविकार समस्या असायच्या. आता मात्र किशोरवयीन तसेच तरुण-प्रौढ या सर्वांनादेखील मानसिक ताणतणावांनी ग्रासलेले असल्याचे कटू वास्तव निदर्शनास येते. मानसिक ताणतणाव कोणालाच चुकलेला नाही. प्रत्येकालाच ताणतणावमुक्त जीवन जगावेसे वाटते. वयोमानानुसार वर्गीकरण आयुर्वेदात मनुष्याचे आयुर्मान 100 वर्षे धरून वयाच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत. बाल अवस्था : जन्मापासून 16 वर्षांचा कालावधी मध्य अवस्था : 17 ते 70 वर्षांचा कालावधी वृद्ध अवस्था : 70 वर्षांनंतर सुरुवात आपल्या जीवनशैलीत कालानुरूप बदल…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा संजय उवाच : एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतपः । न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं वभूव ह ॥9॥ ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुलितु । काय बोले ॥81॥ आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजें येथें । भरंवसेनि ॥82॥ ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन करूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥83॥ तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत…
लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण पारंपरिक घरगुती उपाय पाहिले. आता या लेखात आपण काही trending ingredients आणि trends बद्दल माहिती घेऊ. सध्याच्या उत्पादनांमध्ये एक ingredient जे खूप trending आहे,- ते म्हणजे ‘Hyaluronic Acid’ (हायल्यूरॉनिक ॲसिड) मुळात हे Acid आपल्या शरीरात तयार होते. हे डोळे, joints आणि त्वचेत आढळते. हे Acid शरीरात इतर उपयोगांच्या जोडीला त्वचेला – hydration देण्याचे काम सुद्धा करते. या acid मुळे त्वचेची flexibility आणि elasticity वाढायला मदत होते, ज्यामुळे त्वचा मऊ मुलायम राहून त्यावरील fine lines आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते. हे acid artificially बनवून त्याचा विविध उत्पादनांमध्ये उपयोग केला जातो. Hyaluronic Acid चे वैशिष्ट्य…
हर्षा गुप्ते शेंगा डाळ साहित्य भिजवलेली तूरडाळ – अर्धी वाटी शेंगदाणे – 3 टी-स्पून जीरं – अर्धा चमचा लसूण – 7-8 पाकळ्या कोथिंबिर – पाव वाटी मीठ, लाल तिखट, लिंबू, साजूक तूप – चवीनुसार फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, कढिपत्ता पुरवठा संख्या – दोघांसाठी कालावधी : साधारणपणे अर्धा तास (डाळ भिजायला वेळ लागतो.) कृती तूरडाळ उकडून नीट घोटून घ्यावी. शेंगदाणे, लसूण, जिरं खमंग भाजून घ्यावेत. थोड्यावेळाने वरून कोथिंबिर घालून पुन्हा परतून घ्यावे. शेवटी लाल तिखट घालून गॅस बंद करा आणि ते मिश्रण परतवा. कढई गरम असतेच आणि लाल तिखट जळत नाही. शेंगदाण्याचे मिश्रण पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. आता कढईमध्ये…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें ॥69॥ कीं मज पाहता उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥70॥ सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥71॥ हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवें विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥72॥ तैसिया पंडुकुमरा व्याकुळा ।…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… नव्याने नाटकात काम करायला लागले होते. एकतर, दोन नाटकं करत होते… एक ‘पर्याय’ आणि दुसरं होतं ‘सविता दामोदर परांजपे’. दोन्ही नाटकं तुफान चालत होती. त्यावेळी 17 वर्षांचं वय माझं… रस्त्यात लोक ओळखायचे. खूप मस्त वाटायचं. त्यातच ‘शोध’ नावाची सीरियल केली. अजूनच ओळख वाढत गेली. नाटकाच्या प्रयोगाच्या अगोदर किमान एक तास लवकर पोहोचायचं, ही मी स्वत:ला लावून ठेवलेली सवय होती. एकदा गिरगावातून दादरला आले. शिवाजी मंदिरला प्रयोग होता. ट्रेन तीन नंबर प्लॅटफॉर्मला आलेली. जिना चढणं आणि उतरणं याचा खूप कंटाळा आला होता. मग शॉर्टकट मारला. उजवीकडे अन् डावीकडे असं दोन्हीकडे बघितलं, ट्रेन…
वेद बर्वे अलीकडेच प्रदर्शित झालेला, ‘महावतार नरसिंह’ (Mahavatar Narsimha) हा चित्रपट, सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतो आहे. भक्त प्रल्हाद आणि नरसिंह अवताराची गोष्ट तर आपल्याला ज्ञात आहेच, मात्र बहुतांश जणांना या गोष्टीशी जोडलेल्या ‘शरभ’ अवताराविषयी फारशी कल्पना नसावी. हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी भगवान श्रीविष्णूंनी नरसिंह अवतार घेतला आणि भक्त प्रल्हादाची सहाय्यता घेतली, पण मग यामध्ये ‘शरभ’ अवताराची नेमकी काय भूमिका होती… नक्की कुणी आणि का हा अवतार घेतला, जाणून घेऊया या लेखातून. नरसिंह अवतार म्हणजे भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथा अवतार, जो त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी घेतला होता. भगवान विष्णूंनी नरसिंह म्हणजे अर्धा मानव आणि अर्धा सिंह असे रूप धारण…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
