Author: Team Avaantar

सीए रसिका महाबळ परिचय भारत सरकार दरवर्षी नागरिकांकडून प्रत्यक्ष कर (आयकर – Income Tax) स्वरुपात उत्पन्नाचा एक भाग गोळा करते, ज्याचा वापर सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी होतो. करदात्यांनी स्वतःहून आपली आर्थिक माहिती सरकारला सादर करावी, यासाठी ‘आयकर विवरणपत्र/ इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)’ हे माध्यम आहे. प्रथमच रिटर्न भरणाऱ्यांना प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची वाटू शकते, म्हणूनच हा लेख त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर आहे. आयकर विवरणपत्र/ इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) हा एक फॉर्म आहे, ज्याद्वारे आपण आपल्या वार्षिक उत्पन्नाची माहिती आयकर/ इन्कम टॅक्स विभागाला सादर करता. यात वेगवेगळ्या उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती, खर्च, सूट (exemptions), वजावट (deductions), कर आणि अधिभार…

Read More

डॉ. किशोर महाबळ परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या. शिक्षकांसाठी राखीव असलेल्या रूममध्ये बसून एक ज्येष्ठ शिक्षिका उत्तरपत्रिका तपासत होत्या. हे काम सुरू असताना अनेकदा उत्तरपत्रिकेत चूक आढळली की, त्यांच्या तोंडून ‘मूर्ख लेकाचा’ असा शब्द बाहेर पडायचा. प्रत्येक उत्तरपत्रिकेत अशा काहीना काही चुका असायच्याच. त्यामुळे ‘मूर्ख’ हा शब्द अनेकदा त्या खोलीत उमटत होता. जेव्हा जेव्हा या शिक्षिकेला चुकीची उत्तरे आढळायची, त्या प्रत्येकवेळी उत्तराचे जाहीर वाचन त्या खोलीत केले जात होते आणि शेवटी अर्थातच परवलीचा शब्द उमटत होता ‘मूर्ख लेकाचा’. इतर शिक्षक ही उत्तरे ऐकून मोठ्याने हसायचे. कधीकधी त्या शिक्षिका चुकीच्या उत्तरांजवळ ‘मूर्ख’ असा शेरादेखील लिहीत असे. हा सगळा प्रकार एक सर्वात तरुण…

Read More

डॉ. प्रिया गुमास्ते (आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सल्टंट) सध्याच्या काळात नॅचरल, हर्बल हे शब्द वरचेवर कानावर पडत असतात आणि आयुर्वेद म्हणजे हर्बल औषधी हाच समज बहुतांश लोकांमध्ये आहे. पण आयुर्वेद फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही. मग काय आहे हे आयुर्वेद? आपल्या भारतात सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी अत्यंत विद्वान ऋषींनी अभ्यासपूर्ण असे वेद लिहिले. वेद म्हणजे ज्ञान देणारे ग्रंथ. त्यामधील एक उपवेद म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद या शब्दाची फोड केली तर ती होते आयुषो वेदः| यातील आयु म्हणजे जीवन तर, वेद म्हणजे विज्ञान. थोडक्यात सांगायचे झाले तर, आयुष्याविषयी माहिती देणारा, जीवनाचे विज्ञान उलगडून देणारा ग्रंथ म्हणजे ‘आयुर्वेद’! हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम्। मानं च…

Read More

यश:श्री पूर्वीच्या काळी लता, किशोर, रफी, मन्ना डे, आशा, मुकेश, तलत अशा एकापेक्षा एक गायकांबरोबरच योग्य शब्द वापरणारे गीतकारही होते. त्यामुळे या गाण्यांचे गारुण आजही कायम आहे. आताही चांगली गाणी बनतात, पण त्यातही गुणगुणण्यासारखी किती आहेत? हा खरा प्रश्न आहे. कधी कधी तर केवळ शब्दछल असतो. अलीकडेच एक व्हिडीओ पाहण्यात आला होता. अनुपम खेर यांनी ऋषी कपूर यांच्या घेतलेल्या इंटरव्ह्यूची ही क्लिप आहे. एकाहून एक सरस हिट चित्रपट देणाऱ्या ऋषी कपूर यांना अनुपम खेर यांनी आजकालच्या नवीन गाण्याबद्दल विचारले असता, ते लगेच म्हणाले, ‘आताची गाणी कुठे आहेत, नुसता गोंगाट आहे. कोणीही उठते, गाणे म्हणते… गाणे लिहिते. माझा मुलगा रणबीर याचं…

Read More

लीना जोशी परुळेकर आपली त्वचा (Skin) आणि त्वचेची निगा याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. मग ती व्यक्ती कुठल्याही वयोगटातील असली तरी! आपली त्वचा कशी आहे? तिची काळजी कशी घ्यावी? असे असंख्य प्रश्न असतात. त्यामुळे सर्वप्रथम आपण आपल्या त्वचेची ओळख करून घेऊया. आपली त्वचा मुळात तीन स्तरांनी बनलेली असते. पहिल्या आणि सर्वात वरच्या स्तराचे नाव आहे – Epidermis. त्याच्या खालच्या आणि मधल्या स्तराचे नाव आहे – Dermis. त्याच्या खालच्या आणि सर्वात शेवटच्या स्तराचे नाव आहे – Hypodermis / subcutaneous Layer… हे माहीत असणे अशासाठी गरजेचे आहे, कारण आपण जी उत्पादने वापरतो ती त्वचेच्या कुठल्या स्तरापर्यंत पोहोचतात, हे कळण्यासाठी! आपण जी…

Read More

मनोज जोशी फेरीवाले आणि पाऊस यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘असून अडचण, नसून खोळंबा’! मे महिन्यात उत्तरोत्तर उन्हाची काहिली वाढू लागल्यावर आपण सारेच जून महिना सुरू होऊन ‘पाऊस कधी येणार?’ याची वाट पाहू लागतो. पण पावसाला सुरुवात होऊन दोन महिने झाल्यावर तिसऱ्या महिन्यातच ‘पाऊस कधी जाणार?’ असं होतं. कारण, एकतर रोज छत्री घेऊन जाणं हे एक ओझंच होऊन जातं, त्यात सर्वकडे चिखल आणि सणावारातील हौसेवर ‘पाणी’ पडू नये, असंच सर्वांना वाटत असतं. फेरीवाल्यांच्या बाबतीतही असंच काहीसं असतं. जेव्हा फेरीवालाविरोधी सूर लागतो, तेव्हा ते कसे रस्ता अडवून बसलेले असतात, जाताना-येताना अडचण…, इथपासून ते कशी अडवणूक करतात… इथपर्यंत सर्व विषय चघळले जातात.…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले… गोष्ट आहे एका ‘दिदी’ची एक सिनेमा आला होता, म्हणजे तो आला कधी अन् गेला कधी कोणाला कळलंच नाही. ‘आमरस’ त्याचं नाव होतं. माझी मोठी मुलगी नमीता तिथे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. तीन-चार दिवसांचं शूटिंग झालं आणि ती रीमा लागू (ज्यांना मी दिदी म्हणायचे) यांच्यासोबत काहीतरी बोलावं म्हणून हिम्मत करून पुढे गेली. तिनं दिदींना विचारलं की, ‘तुम्ही हर्षा गुप्तेला ओळखता का?’ त्या म्हणाल्या, ‘हो…’ आमचं लाजरं बुजरं त्यांना म्हणाली की, ‘ती माझी आई आहे.’ झालं…! आमच्या दिदी अशा ओरडल्या ना तिला! ‘कार्टे, अगं हे तू मला तीन-चार दिवसांनी सांगतेयस?’…

Read More

गायत्री वैशंपायन साधारणतः कुठल्याही लेखाची सुरुवात ही catchy, attractive अशा शीर्षकाने करतात, तरच पुढला लेख वाचला जाईल, ही शक्यता वाढते. पण आज ज्या जगात मी तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे, तिथे चमचमणारं, झगमगीत असं काहीच नव्हतं. म्हणूनच साधं शीर्षक ‘आमच्या मराठी शाळा’… माझी शाळा एक व्यक्ती असती तर कशी असती? फार make-up न करणारी, बडेजाव नसणारी, स्वच्छ नीटनेटकी रहाणारी, चटपटीत, आपला विषय शिकवण्यात तरबेज, ठामपणे मतं मांडणारी एखादी पन्नाशीची प्रौढा असावी, अशा रुपात शाळा माझ्यासमोर येते. कदाचित खूप शिक्षकांना (बाईंना) मी तसं पाहिल्यामुळे शाळेची अशी इमेज माझ्या मनात ठसली असेल. अर्थात, हे माझे अनुभव साधारण 80-90च्या दशकातील शहरी भागातील…

Read More

अजित गोगटे मागील दोन लेखांमध्ये मी माझा विनातिकीट लोकलचा प्रवास आणि त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. त्यानंतर माझे स्वत:चे अनुभव सांगितले. कल्याण येथे माझे वास्तव्य आणि नोकरी मुंबईत. सन 1978 ते सन 2020 अशी तब्बल 42 वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसएमटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. मध्यंतरीची सलग 12 वर्षे मी तिकीट किंवा मासिक / त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी आणि किती ठेवता येईल? रेल्वेला स्वत:च्या महसूलाची चिंता नाही, या माझ्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मी माझे…

Read More

चंद्रशेखर माधव सुमारे 20 वर्षांपूर्वीची गोष्ट. आमचा एक मित्र शनीभक्त होता. नेहमी शनिशिंगणापूरला जायचा. त्याच्यासोबत आम्हीही बरेचदा शुक्रवारी रात्री कारने निघायचं… शनिवारी पहाटे शनिशिंगणापूरला दर्शन घ्यायचं आणि सकाळी 11 वाजेपर्यंत पुण्यात परत यायचं… अशा अनेक ट्रिप केल्या. बरेचदा, आम्ही पाच मित्र कारने जायचो. असंच एका ट्रिपच्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. तेव्हा निखिलकडे मारुती एस्टीम होती. त्याच गाडीने आम्ही निघालो. साधारणपणे रात्री नऊ वाजता पुण्यातून निघालो. शिरूरच्या आसपास थांबून जेवण वगैरे केलं. त्यात सुमारे एक तास गेला असावा. साधारणपणे साडेअकराच्या सुमारास आम्ही नगरच्या घाटात पोहोचलो आणि घाट चढायला सुरुवात केली. यादरम्यान रात्री प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या, जळगावकडे वगैरे जाणाऱ्या, बऱ्याचशा बसेस,…

Read More