Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
मनोज जोशी कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, असे म्हटले जाते. पण मला दोनदा पायरी चढावी लागली. सर्व मामला चोरीचाच होता, पण हे दोन्ही अनुभव कायम लक्षात राहतील, असेच होते. एकदा वांद्रे कोर्ट तर, दुसऱ्यांदा वसई कोर्ट… एकदा घड्याळाची चोरी तर, दुसऱ्या वेळेस मोबाइल लंपास… लोकमतला असताना 2012-13 मध्ये माझा मोबाइल चोरीला गेला होता. त्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केल्यावर काही दिवसांत मला कोर्टाचे बोलावणे आले… केस उभी राहिली… एका दिवसांत निकाल लागला आणि फोन परत मिळाला. अर्थात, तो माझा नव्हता. पोलिसांकडे त्याच कंपनीचे मॉडेल उपलब्ध होते, तो मला दिला. भाग – 2 वसई कोर्टात माझ्या केसचा पुकारा होईपर्यंत कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत…
सुनीता मुकुंद श्री देवीची शक्तीपीठे 108 किंवा 51 असल्याचे मानले जाते. या 51पैकी भारतात 42, श्रीलंकेत एक, तिबेटमध्ये एक, बांगलादेशात चार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये एक, नेपाळ दोन आहेत. सतीचे निष्प्राण कलेवर (देह) घेऊन श्रीशंकर क्रोधायमान स्थितीत निघाले तेव्हा, त्यांचा राग शांत करण्यासाठी श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे तुकडे केले. ते अवयव ज्याठिकाणी पडले ती शक्तीपीठे झाली. मागील भागात आपण 25 शक्तिपीठांची माहिती घेतली होती. आता उर्वरित 26 शक्तिपीठे…. हेही वाचा – भारतातील शक्तिपीठे 26. उज्जयनी शक्तिपीठ : उज्जैन, क्षिप्रानदी तट, मध्य प्रदेश; उजवी कुशी. शक्ती – हरसिद्धी / मंगला / चंडिका, भैरव – मांगल्य / कपिलाम्बर 27. मणिवेदिका शक्तिपीठ : पुष्कर, राजस्थान;…
आराधना जोशी प्रमोद महाजन यांच्या निधनाला यंदा 3 मे रोजी 19 वर्षे झाली. त्यांचा अकाली झालेला मृत्यू हा सगळ्यांनाच चटका लावून गेला. महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील जे हजरजबाबी नेते होते, त्यात विलासराव देशमुख आणि प्रमोद महाजन यांचं नाव अग्रस्थानी आहे. (दुर्दैवानं आता दोघेही हयात नाहीत.) प्रमोद महाजन यांचं एप्रिल 1997मधील लोकसभेतील भाषण मध्यंतरी व्हायरल झालं होतं. सर्वपक्षीय चीन दौऱ्यातील एक किस्सा त्यांनी सभागृहात सांगितला होता. “तिथे भारतातील लोकशाहीबद्दल उत्सुकता दिसली. तेव्हा मी लोकशाही काय असते ते समजावलं. मी त्यांना म्हणालो, मी प्रमोद महाजन आणि लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाचा खासदार आहे; आम्ही विरोधी बाकांवर आहोत. हे ऐकून चीनचे नागरिक हैराण झाले. त्यानंतर…
धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष राशी येता आठवडा हा संमिश्र राहील. संभाषणात अथवा बोलताना आपल्यामुळे कोणी दुखावणार नाही, याची काळजी घ्या. घरातल्या गोष्टींमध्ये मन उत्तम रमेल. परदेशगमनाचे योग येऊ शकतात. स्त्रियांनी आलेला पैसा राखून ठेवण्याकडे कल ठेवावा. मेष राशीच्या सर्वांनीच उष्णतेचे विकार होणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. वृषभ राशी या आठवड्यात छोट्या प्रवासाचे अनेक योग येऊ शकतात. आपले विचार शब्दांतून प्रभावीपणे व्यक्त करण्याचा उत्तम काळ. मित्र, भाऊ, बहीण यांच्या सुखदायी भेटी होण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. लहान मुलांसाठी अभ्यास आणि शिक्षणाचे आराखडे तयार करण्यासाठी उत्तम काळ ठरू शकतो. मिथुन राशी बोलणे आणि आहार याबाबतीत संयम…
सुनीता मुकुंद श्री देवीची शक्तीपीठे 108 किंवा 51 असल्याचे मानले जाते. या 51पैकी भारतात 42, श्रीलंकेत एक, तिबेटमध्ये एक, बांगलादेशात चार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये एक, नेपाळ दोन शक्तिपीठे आहेत. सतीचे निष्प्राण कलेवर (देह) घेऊन श्रीशंकर क्रोधायमान स्थितीत निघाले तेव्हा त्यांचा राग शांत करण्यासाठी श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे तुकडे केले. ते अवयव ज्याठिकाणी पडले ती शक्तीपीठे झाली. किरीट शक्तिपीठ – लालबाग, पश्चिम बंगाल; शीरोभूषण किरीट (जगन्नाथ पुरी, ओडिशा) शक्ती – विमला / भुवनेश्वरी, भैरव – कोट / संवर्त. कात्यायनी शक्तिपीठ – भुतेश्वर, वृंदावन, मथुरा; केसकलाप. शक्ती – कात्यायनी, भैरव – भूतेश करवीर शक्तिपीठ – कोल्हापूर, महाराष्ट्र. त्रिनेत्र. शक्ती – महिषासूरमर्दिनी, भैरव…
चंद्रशेखर माधव साधारण 1985-86 सालातली गोष्ट असावी. मी पाचवी किंवा सहावीत होतो. आम्ही, (आम्ही म्हणजे मी, आई-वडील आणि भाऊ) आसामच्या सहलीला गेलो होतो. आमचे काका सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर गुवाहाटीमध्येच स्थायिक झाले होते. आसाममध्ये तसेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे बरीचशी आहेत. एकूणच उत्तर-पूर्व (ईशान्य) भारताला निसर्गाची मोठी देणगी लाभलेली आहे. पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास करणार असल्यामुळे आम्ही दोघेही भाऊ खूप उत्साहात होतो. त्याकाळी पुण्याहून गुवाहाटीला थेट रेल्वे नव्हती. त्यामुळे इथून मुंबई, मुंबईहून गुवाहाटी आणि त्याच मार्गे परत असा एकूण प्रवास ठरला होता. आसाममध्ये गेल्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क, कामाख्या मंदिर, शिलाँग अशी ठिकाणे बघायचा प्लॅन आधीच ठरला होता. एकूण मिळून आमची…
मनोज जोशी दोन दिवसांपूर्वी युट्यूबवर शॉर्ट्स बघत असताना ‘कपिल शर्मा शो’मधील एक सीन दिसला. कपिल शर्माच्या समोर मौसमी चॅटर्जी आणि रीना रॉय बसल्या होत्या. एका पाठोपाठ एक असे प्रश्न कपिल विचारत होता आणि रीनाच्या आधी मौसमीच ते प्रश्न पटापट टोलावत होती. त्यात त्याने एक प्रश्न केला, असा कोणता हीरो होता की त्याला बघायला सर्वात जास्त गर्दी व्हायची. मौसमीने काका अर्थात राजेश खन्नाचं नाव घेतलं. तर, रीना लगेचच विनोद खन्ना म्हणाली… त्यावरून मला विनोद खन्ना गेला तो दिवस आठवला. 27 एप्रिल 2017… त्या दिवशी, ‘ती’बातमी अखेर खरी ठरली! महिन्याभरापूर्वी म्हणजेच मार्च 2017मध्ये विनोद खन्ना याच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या, पण अतिशय किरकोळ…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा आलेय तुमच्या भेटीला! वांद्रे येथे संध्याकाळी एक इव्हेंट होता. छान तयार होऊन निघाले होते. म्हटलं, चला कॅब बुक करुयात. पण बुकच होईना! त्यात ‘गुगळीण मावशी’ प्रवासाचा वेळही खूप दाखवत होती. मग उत्तम आणि जलद पर्याय निवडला. रिक्षा केली आणि कांदिवली स्टेशन गाठलं. लोकल ट्रेनमध्ये बसून वांद्र्याला गेले. ट्रेनमध्ये नेहमीचे एंटरटेन्मेन्ट… ‘अय्या तुम्ही’, ‘अमुक एका सीरियलमधलं तुमचं काम’, ‘तुमचा तो शो’, ‘तुमचं दिसणं’ आणि मग सेल्फी… यात वांद्रे कधी आलं ते कळलंच नाही. स्टेशनवरून रिक्षा केली आणि इव्हेंटचं ठिकाण गाठलं. दोन-तीन तास छान गेले. ओळखीची खूप माणसं भेटली. रीफ्रेश झाले आणि घरी यायला निघाले.…
अर्चना कुलकर्णी दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरमध्ये मी नोकरी केली. संस्थेच्या अकरा शाळा होत्या. आमचे स्वतंत्र तांत्रिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय 1994मध्ये सुरू झाले. सुरुवातीला संस्थेतील इतर शाळांच्या वाचनालयातून विद्यार्थी तसेच शिक्षकांना पुस्तके मिळत होती. 2005मध्ये मी मुख्याध्यापिका झाले. 2006पासून आमच्या विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वाचनालयाची सुविधा काही कारणाने बंद करावी लागली. तांत्रिक विद्यालयाचे विद्यार्थी तसेच कर्मचारी पुस्तकांपासून वंचित राहू लागले. तंत्र व उच्च शिक्षण विभागाच्या नियमांच्या चौकटीत तांत्रिक विद्यालयासाठी स्वतंत्र लायब्ररीयन पदाला मान्यता नव्हती. त्यामुळे वाचनालय आणि लायब्ररीयन हे दोन मोठे प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाले. कुठून तरी छोटीशी का होईना सुरुवात केली पाहिजे, हा विचार आमच्या विभावरी दामले आणि हर्षदा…
मंदार अनंत पाटील लंडनला एकदा मी आणि पल्लवी घरी कामावरून परत येत असताना आमची भेट टोनी नावाच्या जर्मन स्पिट्झ जातीच्या अतिशय बोलके डोळे, ठेंगणा बांधा, भरपूर केस आणि अंबाडा बांधावा अशी शेपटी… असे रुपडे असलेल्या श्वानाशी झाली. त्याची मालकीण जेनिटा पण भारतीयच आहे आणि कोरोना काळात एक सहचारी म्हणून हे श्वान आणले गेले. अतिशय हुशार आणि मस्तीखोर हा साधारण 22 महिन्यांचा नर श्वान… काही मिनिटांतच माझी आणि त्याची दोस्ती झाली. जेनिटाची रीतसर परवानगी घेऊन वेळ मिळेल तेव्हा टोनीला फिरवायची जबाबदारी घेतली आहे. आता तो माझा सध्याचा सखा आहे. लिओला जाऊन अवघे दोन-तीन महिने झाले आणि टिंकरबेल नावाची डच ससुली आमच्या…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
