Author: Team Avaantar

मंदार अनंत पाटील माझ्या आणि पल्लवीच्या मनात तसेच आयुष्यात कायमचा ठसा सोडून गेलेला आमचा लिओ. मी प्राणीप्रेमी असलो तरी मांजर पाळायचा योग कधीच आला नव्हता. पण पल्लवीच्या माहेरी मनू नावाची मांजर होती आणि तिच्या कितीतरी आठवणी पल्लवी नेहमी सांगायची. मी एकदा सहजच जेम्स बोवेन लिखित ‘A street cat named Bob’ नावाचे सुंदर पुस्तक वाचले आणि इतका भारावून गेलो की, सरळ जाऊन लिओला घेऊनच आलो. लिओला घरी आणले तो दिवस आषाढी एकादशीचा होता आणि आमचा विठोबा आमच्या घरी अवतरला. जिंजर म्हणजे तपकिरी रंगाचे अतिशय लोभसवाणे रुप लाभलेला आणि हाताच्या ओंजळीत मावेल इतका छोटा होता लिओ. घरी आल्यावर अगदी सगळं घर पालथं…

Read More

मनोज जोशी कोंबडी आधी की अंड आधी? या प्रश्नाप्रमाणेच टीव्ही चित्रपट या माध्यमांचा जनमानसावर परिणाम होतो, की समाजात घडणा-या घटना लहान-मोठ्या पडद्यावर दाखविल्या जातात? हा देखील ठोस उत्तर नसलेला प्रश्न आहे. अलीकडे काही गुन्हे टीव्हीवरील गुन्हेगारीवर आधारित मालिका पाहून घडल्याचेही समोर आले आहे. तर दुसरीकडे, प्रेमापोटी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरवर चित्रपट तयार होत आहे. पबजी गेम खेळतान सचिन मीणाशी तिचे सूत जुळले आणि ती आपल्या चार मुलांना घेऊन ती नेपाळमार्गे भारतात आल्याचे सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी अभिनेते विजू खोटे यांच्याशी गप्पा मारताना, सहज हा विषय छेडलला होता. पण त्यांनी याबाबत चांगलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, चित्रपटाचा जनमानसावर निश्चितच…

Read More

मंदार अनंत पाटील ब्रुस हा लॅब्रेडॉर जातीचा अतिशय लाघवी, खट्याळ आणि माझ्यावर विलक्षण प्रेम करणारा कुत्रा होता. माझा लहानपणापासूनचा मित्र अमेय महाजनचा तो श्वान. 2017 साली पाच वर्षांनी मी भारतात आलो असताना एके दिवशी सहजच सकाळी सोसायटीबाहेरच पहिली भेट झाली. ब्रुस त्यावेळी जेमतेम चार महिन्यांचा असेल. पण अतिशय मस्तीखोर आणि खट्याळ होता. बघता क्षणीच आम्ही एकमेकांचे घट्ट दोस्त झालो. नंतर नंतर माझे वारंवार भारतात जाणे झाले. भारतातून लंडनला परत आल्यावर आणखी एक दणकट पण तितकाच लाघवी असा टायसन (रोटवीलर जातीचा) श्वान मला भेटला. तो माझ्या लंडनमधील सोसायटीतील टिबोर नावाच्या मुलाने दत्तक घेतलेला साडेतीन वर्षांचा पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेला श्वान. पहिल्या…

Read More

जी. भालचंद्र जवळपास सर्वांचाच बँकेशी संबंध येतो. कितीही ऑनलाइन व्यवहार झाले तरी, कुठे ना कुठे तरी बँक कर्मचाऱ्यांशी डोकं लावावंच लागतो. बँकांधील काही अनागोंदी कारभाराशी संबंधित ‘बँक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या करामती’ या सदरातील माझा दुसरा अनुभव आता कथन करीत आहे. हा अनुभव महाराष्ट्रीयन कुटुंबांना एकेकाळी जवळची वाटणाऱ्या एका राष्ट्रीयीकृत बँकेबाबतचा आहे. काही वर्षांपूर्वी माझी पत्नी आणि मी, आम्ही दोघांनी या बँकेच्या आमच्या घराजवळील शाखेत लॉकर उघडण्याचा निर्णय घेतला. लॉकर उघडण्यासाठी करावयाचे सर्व सोपास्कार आम्ही बँकेत पूर्ण केले. त्याचवेळी आम्ही बँकेला असे निर्देश दिले होते की, आमच्या लॉकरचे वर्षाचे भाडे आमच्या जॉइंट अकाऊंटमधून वळते करण्यात यावे. पहिली चार-पाच वर्षं लॉकर भाडे…

Read More

अर्चना कुलकर्णी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हा विषय मी अकरावी आणि बारावीला शिकवायचे. हा विषय चांगला असला तरी रटाळ आहे. तो विद्यार्थ्यांना समजायला हवा, आवडायला हवा म्हणून मी तो हसत खेळत, “टीचिंग -लर्निंग” पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करायची. हा महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, याबाबत माझा कटाक्ष असायचा. माझा विद्यार्थीवर्ग प्रॅक्टिकल्समध्ये कुशल, परंतु थिअरीमध्ये एक पाऊल मागे असायचा. त्यातून इंग्रजी माध्यमाचा मोठा अडसर होता, ‌त्यामुळे प्रत्येक तत्व मी प्रथम मराठीतून समर्पक उदाहरण देऊन समजावायचे, नंतर तेच इंग्रजीतून शिकवायचे‌; शिवाय  “टीचिंग लर्निंग” पद्धतीनुसार प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषय समजून सांगायचे. सांगण्याचा हेतू हा की, या पद्धतीने शिकवल्यावर विद्यार्थीवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळायचा. त्यांना रटाळ आणि कठीण…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! आज थोडा वेगळा विषय आहे. सेक्युलॅरिझम वगैरे नाही; पण मी जात, धर्म विशेष मानत नाही. मी जन्माने हिंदू आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान आहेच आहे. पण म्हणून मी दुसऱ्या धर्मांना कमी लेखणे किंवा अपमानास्पद वागवणे, या गोष्टी मला पटत नाहीत अन् आवडतही नाहीत. माणसाकडे माणूस म्हणून बघणे महत्त्वाचे नाही का? तर, आज एक आठवण सांगते… रमझानची! मी मढ येथून कधीच रात्री 11-11.30 वाजल्यानंतर ऑटोने एकटी घरी येत नाही. कितीही दमले असले तरी, बेस्ट झिंदाबाद. तोच प्रवास मला सेफ वाटतो. साधारणत: 10 वर्षांपूर्वी मी ‘बेइंतहा’ हिंदी सीरियलमध्ये काम करत होते. शूटच्या तारखा सलग नव्हत्या, मधे मधे…

Read More

मनोज जोशी सकाळीच नाशिकहून फोन आला, उमा वहिनी गेली. माझा मेहुणा महेश गोखलेची पत्नी. आयुष्यामध्ये ‘होत्याचे नव्हते,’ कसे एका क्षणात होते, याचे उदाहरण द्यायचे झाले तर, या महेशदादाचे देता येईल. दोघेही सरकारी नोकरीमध्ये. दोघेही मोठ्या पोस्टवर. पण साधारणपणे अडीच वर्षांपूर्वी उमा वहिनीला मेंदूमध्ये गाठ असल्याचे निदान झाले. पण नंतर ती कॅन्सरची असल्याचे समोर आल्यावर सगळेच हादरले. ऑपरेशन झाले. पण तिच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला. ती पटकन माणसे ओळखत नव्हती. कालांतराने तिला हळूहळू नातेवाइकांची ओळख पटायला लागली. त्यांच्याशी त्याच आपलेपणाने ती बोलू लागली. पण हे कुठपर्यंत? ते कोणालाच माहीत नव्हते. जळगाव, पुणे, कोल्हापूर असे करत-करत हे दाम्पत्य नाशिकलाच स्थायिक झाले होते. योगायोगाने…

Read More

मंदार अनंत पाटील सर्व प्राणी मित्रांमध्ये आणखी कायमचा लक्षात राहील तो माझा ब्रुस… लॅब्रेडॉर जातीचा अतिशय लाघवी, खट्याळ आणी माझ्यावर विलक्षण प्रेम करणारा माझा ब्रुस. खरे पाहता तो माझा लहानपणापासूनचा मित्र अमेय महाजनचा श्वान. 2017 साली पाच वर्षांनी मी भारतात आलो असताना एके दिवशी सहजच सकाळी सोसायटीबाहेरच पहिली भेट झाली. ब्रुस त्यावेळी जेमतेम चार महिन्यांचा असेल. पण अतिशय मस्तीखोर आणि खट्याळ होता. बघता क्षणीच आम्ही एकमेकांचे घट्ट दोस्त झालो. सुटटीचे पाच आठवडे होते, पण असा एकही दिवस गेला गेला नाही, जेव्हा मी आणि तो एकत्र नसू… मला तर त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको, असे व्हायचे. तो फक्त जेवायला आणि…

Read More

जी. भालचंद्र आज-काल आपल्यापैकी प्रत्येकाचा बँकेतील व्यवहारांशी संबंध येतो. आपल्यापैकी अनेकजण नेट बँकिंग, Appवर आधारित बँकिंग सेवा, यूपीआय पेमेंट इत्यादी सुविधांचा वापर करीत आहेत. तरीपण काही ना काही कारणासाठी आपल्याला बँकेच्या जवळील शाखेत जाण्याचा प्रसंग येतो. अशावेळी मला आलेल्या अनुभवाचे मजेदार किस्से मी सांगणार आहे. अनुभव एक हा अनुभव मला एका खासगी बँकेतील मुदत ठेव व्यवहाराबद्दल आलेला आहे. या बँकेत मी आणि माझ्या बायकोच्या नावाने मुदत ठेव करताना, अखेरच्या दिवसानंतर मुदत ठेव पुढील काही दिवसांसाठी परत रिन्यू करावी असा पर्याय दिला होता. जसा मुदत ठेवीचा अखेरचा दिवस जवळ येत होता तसं माझ्या लक्षात आलं की, ज्या  कालावधीसाठी मुदत ठेव मी ठेवली आहे, त्या कालावधीकरिता व्याजाचा…

Read More

मनोज जोशी कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकीजा’ चित्रपट हा हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड म्हटले तर, ते गैर ठरणार नाही. हा चित्रपट कमाल अमरोही यांच्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. त्यामुळे त्यांनी जे जे उत्तम (त्या काळी) होते, ते उभे केले होते. या चित्रपटाच्या सेटपासून संगीतापर्यंत सर्वच भव्यदिव्य होते. अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट बनला. ‘पाकीजा’ चित्रपट बनायला तब्बल 15 वर्षं  लागली. 17 जानेवारी 1957 रोजी या गाणी रेकॉर्ड करून कमाल अमरोही यांनी या चित्रपटाची सुरुवात केली होती. तर, प्रत्यक्षात हा चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित व्हायला 4 फेब्रुवारी 1972 ही तारीख उजाडली.  तत्पूर्वी, 3 फेब्रुवारी 1972 रोजी प्रसिद्ध मराठा मंदिरमध्ये याचा भव्य प्रीमियर…

Read More