Author: Team Avaantar

सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) अनेकदा राजकीय पक्षांच्या वादात आपण एखाद्याची नार्को टेस्ट करावी, असा उल्लेख ऐकतो, वाचतो. याच पॉलीग्राफ आणि Narco Analysis Test बद्दल थोडी प्राथमिक माहिती आज पाहुया. आरोपी पकडल्यावर त्याच्याकडे पुरावे शोधण्याच्या चौकशीत पोलिसांच्या कुप्रसिद्ध थर्ड डिग्री मेथडला पर्याय म्हणून या टेस्ट योग्य ठरतात; मात्र कायद्यानेही या टेस्टना मर्यादा आहेत. यात मुख्य तीन प्रकारच्या टेस्ट असतात – Polygraph test Narco analysis Brain Electro Oscillatory Signature Profile यातील नार्को ॲनलिसीस टेस्ट ही वैद्यकीय देखरेखीखालीच पार पडते; कारण यात व्यक्तीच्या शरीरात सोडियम पेंटोथल नावाचे नार्कोटिक ड्रग टोचतात. या ड्रगचा मेंदूवर परिणाम झाला की, ती व्यक्ती…

Read More

आराधना जोशी इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करत असताना अनेक दिग्गज मंडळींना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. त्यातलंच एक नाव म्हणजे खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. 20 मे 2025 रोजी या शास्त्रज्ञ, लेखकाच्या निधनाची बातमी ऐकली आणि त्यांच्याशी साधलेल्या संवादाची घटना डोळ्यांसमोर उभी राहिली. 1999 साली अल्फा मराठी (आताचे झी मराठी) हे मराठीतले पहिले खासगी चॅनल सुरू झाले होते. निवडणुकांची धामधूम नुकतीच आटोपली होती आणि त्यामुळे बातम्यांसाठी आता इतर विषयांवर लक्ष द्यायला सुरुवात झाली. त्यातच मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील संकुलात डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची बातमी आली. कार्यक्रम खरंतर विज्ञानाशी निगडीत होता. त्यामुळे तो कव्हर करायला आपल्याला…

Read More

जी. भालचंद्र मागील काही दिवसांमध्ये माझ्या वाचनात दोन बातम्या आल्या. पहिली बातमी – एका सुप्रसिद्ध देवळातील पुजाऱ्याच्या मुलीचे लग्न पार पडले. त्या लग्नात वधूने अंगावरती घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे वजन इतके होते की, त्या वधूस लग्नाचे विधी पार पडताना चालणेसुद्धा अशक्य झाले होते. दुसरी बातमी – एका हिंदू देवस्थानात जनसंपर्क अधिकारी म्हणून एका परधर्मीय व्यक्तीची निवड करण्यात आली होती. पाच वर्षे नोकरी केल्यानंतर त्या व्यक्तीने ती नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर काही दक्ष नागरिकांनी त्या व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार केली. चौकशीमध्ये त्या व्यक्तीच्या घरी इतके सोन्याचे दागिने सापडले की. कुठल्यातरी शहरात सोन्याच्या दागिन्यांचे दुकानही उघडता आले असते. या दोन बातम्या प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर मांडल्या…

Read More

आराधना जोशी नुकताच जागतिक मातृदिन साजरा झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर मी एक फोटो शेअर केला होता. मी, माझी लेक, आई आणि आजी अशा चार पिढ्या त्या फोटोत दिसतात. अनेकांनी त्या फोटोला लाइक केले. त्यानिमित्ताने माझी शिरा आजीची (आईची आई) आठवण शेअर करते. विजया कृष्णाजी महाबळ म्हणजे माझी शिराआजी 17 मे 2017 रोजी अनंतात विलीन झाली आणि नऊ दशकांचा एक प्रदीर्घ प्रवास संपला. अवघ्या चार दिवसांवर तिचा वाढदिवस आला होता. या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे, आजी आणि आई यांचा वाढदिवस एकाच दिवशी तर दुसऱ्या दिवशी तिच्या नातीचा म्हणजे माझा वाढदिवस. त्यावरून ती नेहमी मला म्हणायची, ‘जरा काही तास आधी जन्माला यायचं की!’…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या जातकांसाठी येणारा आठवडा हा कार्यक्षेत्राशी निगडित विचारांनी सुरू होईल. जसा आठवडा पुढे सरकेल तशा काही चांगल्या घटना कानावर पडतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील तसेच धनलाभ होण्याचे देखील उत्तम योग आहे. घरात तणाव निर्माण झाल्यास परिस्थिती कशी निवळेल, यावर स्त्रियांनी जास्त लक्ष केंद्रित करावे. वृषभ वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्याच्या प्रारंभी काहीतरी नवीन शिकावे, अशी इच्छा उत्पन्न झाली तर, त्यावर अंमल करणे खूप फायद्याचे ठरेल. मनातील चिंतेचा आपल्या संभाषणावर काही परिणाम तर होत नाही ना, याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये घरातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाकडे अत्यंत बारकाईने पाहणे आणि त्यावर विचार…

Read More

उमा काळे आयुष्यात आपल्याला खूप काही शिकायला मिळतं… काही प्रसंगातून, काही अनुभवातून शिकायला मिळतं… तर, काही वेळा काही कारण नसतानाही आयुष्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. त्याला आपण नशीब म्हणतो आणि विषय सोडून देतो… खरंच, इतकं सोपं आहे का हे? मला नेहमी प्रश्न पडतो हा! हे सगळं आपल्या वाट्याला येतं, त्यामध्ये आपलेच लोक असतात. आपलं सुख सोडून ज्यांच्या सुखासाठी अधिक झटतो, तेच सर्वात आधी आपला विश्वासघात करतात. त्याचा परिणाम असा होतो की, बाहेरचे लोक या गोष्टींचा गैरफायदा घ्यायलाही मागे सरत नाही… त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आधी आपलं भविष्य सुरक्षित करा, मग खुशाल दुसऱ्यांच्या मदतीला धावून जा… या कलियुगात प्रामाणिकपणा तसेच नि:स्वार्थी, निस्सीम…

Read More

अर्चना कुलकर्णी ऑगस्ट महिन्यातला शेवटचा आठवडा होता. खूप पाऊस पडत होता… दुपारी तीन-साडेतीनची वेळ होती‌.. मी माझ्या कार्यालयात दुपारचा चहा घेत घेत, टेबलावरची पत्रे पाहत होते. त्याच वेळी टेलिफोन खणखणला. रिसिव्हर उचलून मी बोलू लागले, “हॅलो…!” “नमस्कार मॅडम…! मी, भाटे. समीर भाटेचा डॅडी बोलतोय. मॅडम, अकरावीचे क्लासेस सुटले का?” “हो, केव्हाच सुटले. का हो, काय झालं?” “समीर अजून आला नाही घरी म्हणून…!” “मित्राकडे गेला असेल. येईल लवकरच. काळजी नका करू. तो घरी आल्यावर मला कळवा मात्र.” मिस्टर भाटेंना धीर देऊन मी रिसिव्हर खाली ठेवला. समीर भाटे…! मी आठवू लागले, आणि आठवले. त्याचे असे झाले, साधारण जुलैचा दुसरा आठवडा होता तो. अकरावीच्या…

Read More

चंद्रशेखर माधव सुमारे 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे मी एमसीएम झालो ना त्या वेळची. एक कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती, प्रभात रोडला. तिथे माझा एका मित्र फॅकल्टी म्हणून नोकरीला होता. त्याच सुमारास मी पास-आऊट झालेलो असल्यामुळे आणि एकूणच सी लँग्वेज तसेच फॉक्स प्रोमध्ये माझं प्रभुत्व असल्यामुळे, मला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून बोलवण्यात आलं. हळूहळू मी तिथं रुळलो. तिथे नितीन नावाचा एक मॅनेजर होता. तोच ती इन्स्टिट्यूट पूर्णपणे सांभाळायचा. सांगताना मात्र इन्स्टिट्यूट माझी आहे, असं सांगायचा. इन्स्टिट्यूटचे तीन डायरेक्टर होते. त्यातले दोन अमेरिकेला असायचे, एक डायरेक्टर होता पुण्यातच! पण तो मनुष्य कधी फारसं लक्ष घालायचा नाही, म्हणजे अक्षरशः महिना-महिना इन्स्टिट्यूटमध्ये यायचा सुद्धा नाही.…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष राशी जोडीदाराला, भागीदाराला अथवा प्रतिस्पर्धी असल्यास त्याला योग्य तो मान द्या. हाताखालच्या माणसांना सांभाळा. छान, सुंदर रुचकर पदार्थ खायचा योग आहे, खाऊन तृप्त व्हा. लहान मुलांनी पालकांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घ्यावा. वृषभ रास सट्टा बाजार, शेअर मार्केट यांच्याकडे मन आकर्षित होत असले तरी, संयम बाळगा. कर्मचारी असल्यास कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष द्या. स्त्रियांनी तब्येतीला प्राधान्य देणे योग्य ठरेल. जोडीदाराने याबाबतीत स्त्रीला पूर्ण सहयोग करणे अपेक्षित आहे. मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा थोडा थकवणारा असू शकतो, पण कष्टाला मागे राहू नका. विवाहित स्त्रियांची माहेर आणि मुले यात थोडी रस्सीखेच…

Read More

मनोज जोशी कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, असे म्हटले जाते. पण मला दोनदा पायरी चढावी लागली. सर्व मामला चोरीचाच होता, पण हे दोन्ही अनुभव कायम लक्षात राहतील, असेच होते. एकदा वांद्रे कोर्ट तर, दुसऱ्यांदा वसई कोर्ट… एकदा घड्याळाची चोरी तर, दुसऱ्या वेळेस मोबाइल लंपास… लोकमतला असताना 2012-13 मध्ये माझा मोबाइल चोरीला गेला होता. त्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केल्यावर काही दिवसांत मला कोर्टाचे बोलावणे आले… केस उभी राहिली… एका दिवसांत निकाल लागला आणि फोन परत मिळाला. अर्थात, तो माझा नव्हता. पोलिसांकडे त्याच कंपनीचे मॉडेल उपलब्ध होते, तो मला दिला. भाग – 2 वसई कोर्टात माझ्या केसचा पुकारा होईपर्यंत कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत…

Read More