Author: Team Avaantar

आनंद जोशी शाळेचा पहिला दिवस माझ्या कायम स्मरणात राहिला आहे! प्रत्येक वर्षी शाळेचा पहिला दिवस येत असे आणि शाळेत जाण्याची उत्सुकता मात्र कमी होत नसे! माझी शाळा मुंबईत मालाड पूर्वेला उत्कर्ष मंदिर होती. काळ साधारण 1980 ते 1985 मधला. 13 जून रोजी शाळा उघडत असे. पाऊस सुद्धा साधारण 13 जूनला येत असे. जीवनात सर्व बाबतीत ‘पर्याय’ कमी असल्यामुळे असेल, पण जीवन खूप सोपे आणि सुखाचे होते! मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही काका, मामांकडे किंवा गावाला आठ-दहा दिवस जाऊन राहत असू. तेव्हा फक्त ‘रिसॉर्ट’मध्ये जाऊन राहणे, हा एकमेव पर्याय नव्हता… मे महिन्याच्या सुट्टीत भरपूर आराम करून झाल्यावर मग शाळेचे वेध लागत असत!…

Read More

संजय श्रीराम जोग ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे 13 जून या इंग्रजांना त्याज्य अशा 13 तारखेला आमच्या वेळेस शाळा नेमेचि सुरू व्हायची. उन्हाळ्याने त्रासलेले मुंबईकर ज्या ओढीने आभाळाकडे डोळे लावतात, त्याच चातकाच्या ओढीने सुट्टीचे अजीर्ण झालेले विद्यार्थी 13 जूनची वाट पहायचे. 1 तारखेपासूनच याची आद्य तयारी सुरू व्हायची. नवा युनिफॉर्म, नवी पुस्तके वह्या, दप्तर आणि रेनकोट असा जामानिमा असायचा. जूनच्या 7 तारखेला मृग नक्षत्र लागूनही बरेचदा पाऊस लांबायचा आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागताला हजर व्हायचा. कमालीचा दुर्मिळ योगायोग पहा की, मातीत पडणार्‍या पहिल्या थेंबाने दरवळणारा सुगंध आणि कोर्‍या वह्या-पुस्तकांचा सुगंध एकाच दिवशी घ्यायला मिळायचा. आमच्या पार्ले टिळक विद्यालयात, रोज शाळा…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा तुमच्या भेटीला आलेय. गोष्ट आहे, सदाफुली झाडाची! बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा… बालपणीचा काळ सुखाचा… हे सगळं ऐकायला किती छान वाटतं… पण मोठेपणीच! लहान असताना नाही. लहान मुलांना नाही म्हटलं तरी, सतत काही ना काही प्रश्न पडत असतात. मलाही पडायचे. पण त्याची उत्तरे काही मिळायची नाहीत. ‘गप्प बस, काय सारखं डोकं खाते…,’ असेच म्हणायचे सगळे मला. पण तेच सर्व, माझी मुले मोठी होत असताना मला मात्र, सांगायचे की, ‘मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देत जा, टाळू नको!!’ हल्लीच्या मुलांना प्रश्न पडला तर, त्यांना उत्तर द्यायलाय गूगल बाबा किंवा गूगळीण मावशी आहेच! गिरगावातलं आमचं घर तसं…

Read More

आराधना जोशी पुल स्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर, आनंदयात्रा मिळाली, निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली, हास्यगंगेत न्हाली असं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे, त्या पु. लं.ना जाऊन आज 25 वर्षे झाली. 8 नोव्हेंबर 1919 साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य तर होतंच, पण त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज तसेच माणुसकी कायमच दिसून आली. अशा या पुलंना दोन मिनिटांसाठी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता तो रत्नागिरीच्या समुद्रकिनारी. कोळंब्याहून रत्नागिरीला होडीने प्रवास करून आम्ही किनाऱ्याला लागत होतो आणि समोर साक्षात सुनीताबाई आणि पुलं. त्यांनीही…

Read More

अजित गोगटे कल्याण येथे माझे वास्तव्य आणि नोकरी मुंबईत. सन 1978 ते सन 2020 अशी तब्बल 42 वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसएमटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. कल्याण ते बोरिबंदर हे रेल्वेचे अंतर 56 किमी आहे. मी सरासरी महिन्याला 25 दिवस कामावर गेलो, असे गृहित धरले तरी, या काळात मी लोकलने केलेल्या एकूण प्रवासाचे अंतर 14 लाख 11 हजार 200 किमी एवढे होते. परंतु मध्यंतरीची सलग 12 वर्षे मी तिकीट किंवा मासिक / त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. म्हणजे, माझा विनातिकिट केलेला प्रवास सुमारे चार लाख तीन हजार 200 किमी एवढा होता. मी…

Read More

यश:श्री मे महिना अर्धा सरल्यावर सर्वांनाच पावसाचे वेध लागतात अन् हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सूनची वाटचाल सुरू असल्याचे समजल्यावर पावसाचे तुषार अंगावर उडाल्यासारखे वाटते. यावर्षी पावसाचं आगमन लवकरच झालंय. उन्हाचा चटका वाढलेला असतानाच बरसणाऱ्या थेंबानं एक आल्हाददायक अनुभव सर्वांना दिला. तसं पाहिलं तर पावसात भिजायला कोणाला आवडत नाही? आकाशात काळे ढग जमले आणि गार वारे वाहू लागले की, सर्व ताणतणाव क्षणात निघून जातात. आता जलधारा कोसळणार आणि मन मोहून टाकणारा मातीचा सुगंध सर्वत्र दरवळणार… अशा वेळी आठवते कविवर्य बा. भ. बोरकर यांची कविता – टप टप टप पडती थेंब, मनी वनीचे विझती डोंब वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले गडद…

Read More

आराधना जोशी “हल्लीच्या पिढीवर काहीही संस्कार झालेले नसतात,” हे वाक्य आजकाल सर्रास ऐकायला मिळतं. पण ते कितपत योग्य आहे, याचा विचार आपण करतो का? तसं बघायला गेलं तर, माणसाच्या अनेक पिढ्या हेच वाक्य ऐकत मोठ्या झाल्या आहेत. तरीही, संस्कार म्हणजे नेमकं काय? याची व्याख्या अजूनही आपल्याला करता आलेली नाही, हेच खरं. पूर्वी ‘सातच्या आत घरात’ येणं बंधनकारक होतं. नव्हे, तो संस्कारांचा भाग होता. हा संस्कार जो मुलगा किंवा मुलगी काही कारणांमुळे पाळत नव्हते ते संस्कार विसरले, असाच शिक्का त्यांच्यावर मारला जायचा. हल्ली महानगरांमधून ऑफिसेस सुटल्यावर किंवा अन्य कारणांमुळे घरी पोहोचायला साडेआठ-नऊ तरी वाजतात. त्यामुळे तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावून ‘शुभं करोती’ म्हणणं आता अनेकदा नसतं. थोरामोठ्यांना खाली…

Read More

चंद्रशेखर माधव माझा जन्म पुण्यातच 1975 साली झाला. ही साधारण 1985 ते 1987च्या दरम्यानची गोष्ट आहे. पहिल्यापासूनच शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झाले. राहायला पर्वती परिसरात असल्यामुळे इयत्ता 4थीपर्यंत आई शाळेत घ्यायला यायची. ये-जा करायचे साधन म्हणजे बस. रिक्षा नव्हत्या असं नाही, पण रोज रोज रिक्षाप्रवास परवडणारा नव्हता. इयत्ता पाचवीनंतर मात्र आम्ही आपले-आपले स्वतंत्ररीत्या शाळेत ये-जा करू लागलो. आमच्यासोबत आमच्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठे असे आमच्याच कॉलनीत राहणारे चार-पाच जण असायचे त्यामुळे तशी काळजी नव्हती. माझ्याच शाळेत शिकणारा, पण माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान असणारा माझा मित्र विशाल आणि मी, असे आम्ही दोघे रोज मिळून बसने ये-जा करायचो. आम्ही साधारण एकाच वयाचे…

Read More

आराधना जोशी आम्ही मूळचे जळगावचे. पण बाबांच्या नोकरीमुळे मुंबईत लहानाचे मोठे झालो. रेल्वेच्या नोकरीमुळे मुंबईतल्या मुंबईतही घरं बदलावी लागली. मात्र ही सगळी घरं, मुंबईत जास्त पाऊस पडल्यावर ज्या ज्या सखल भागात पाणी साठतं, तिथल्या परिसरात होती. उदाहरणार्थ, ग्रान्ट रोड, माटुंगा रोड… त्यामुळे आईची पावसाळ्यासाठीची तयारी कायम लक्षात राहिली. आज माझ्या संसारात ती कायम मदतीला येते. पावसाळ्याच्या किमान चार महिने दुधाची पावडर घरी असायलाच पाहिजे. त्यामुळे दुधाचा प्रश्न निर्माण झाला तरी घरी एक पर्याय तयार असेल. मी पण आता पावडर आणून ठेवते. पण त्याच्या बरोबरीने रेडिमेड चहाची पाकिटंही भरून ठेवते. (नवऱ्याचा आग्रह) अमावस्या, पौर्णिमा असतील तर पावसाचा जोर वाढतो. त्यामुळे घरात…

Read More

संगीता भिडे (कमल महाबळ) माझ्या वयाचा पैलतीर जसजसा जवळ सरकतोय तसतसा अनेक आठवणींचा, प्रसंगांचा पिंगा मनात आणि मस्तकातही का सुरू झाला आहे, कळत नाही. काही आठवणी सुखद, काही दुःखद तर काही विचार करायला लावणाऱ्या… अंथरुणाला पाठ टेकली की, आठवणींचा पिंगा सुरू होतो आणि मग ते व्यक्त केल्याखेरीज चैन पडत नाही. असाच एक प्रसंग – रोज दाराशी पेपर टाकणाच्या मुलाचा. या घटनेला आता 30-40 वर्षे झाली. पण अजूनही ती विसरता येत नाही. साधारण 22-23 वर्षांचा हा मुलगा, नित्यनेमाने आमच्या घरी पेपर टाकत असे. हा मुलगा वर्णाने गोरा, दिसायला उमदा आणि हुशार बाटेल असा… ब्राह्मण कुळातला वाटेल असा. मला प्रश्न पडे, हा…

Read More