Author: Team Avaantar

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा अगा मी एकुलाणीचें खागें । मज येवों ये भलतेनि मार्गें । भक्ती कां विषयें विरागें । अथवा वैरें ॥470॥ म्हणोनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझां ठायीं । उपायांची नाहीं । केणि एथ ॥471॥ आणि भलतिया जाती जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें । परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥472॥ अगा कवणें एकें बोलें । माझेपण जऱ्ही जाहालें । तरी मी होणें आलें । हाता निरुतें ।।473॥ यापरी पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना । मातें भजतां सदना । माझिया येती ॥474॥ किं पुनर्ब्राह्मणा: पुण्या भक्ता राजर्षयस्तथा । अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥33॥…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष समाजसुधारक अप्पासाहेब पटवर्धन टीम अवांतर कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसुधारक सीताराम पुरुषोत्तम तथा अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1894 रोजी आगरगुळे, रत्नागिरी येथे झाला. अप्पासाहेब पटवर्धन यांचे प्राथमिक शिक्षण रत्‍नागिरीत झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. मुंबई विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात एम.ए. केल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात 1917–18  या काळात एक वर्ष प्राध्यापकी केली. तत्पूर्वी, मुंबईत 1916 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी अप्पासाहेबांना गांधीचे पहिल्यांदा दर्शन झाले होते. 21 वर्षांचे अप्पासाहेब गांधींचे विचार ऐकून इतके भारावून गेले की, त्यांनी नोकरी सोडली आणि ते पूर्णकाळ समाजकार्य करण्यासाठी गांधींच्या आश्रमात दाखल झाले, आणि गांधीजींचा…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझ्या आयुष्यातली हीरोइन म्हणजे माझी मोठी आई. म्हणजे आप्पांची (बाबा) आई. तशा मला दोन मोठी आई. एक आप्पांची आई आणि एक मामाची, म्हणजे आईची आई. आजची उत्सवमूर्ती आहे, आप्पांची मोठी आई, म्हणजे इंदिराबाई वसंतराव नाईक. तिच्याबद्दल नाईकांची ‘इंदिरा गांधी’ असे बरेच जण बोलायचे. आप्पाई असे माझा मुलगा तिला म्हणायचा. काळा नाही, पण गडद सावळा रंग. खूप देखणा चेहरा. अतिशय हुशार (फक्त प्राथमिक शिक्षण; लिहता-वाचता येईल एवढंच). रोज वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे, हा दंडक. राजकारणावर अगदी हिरीरीने बोलायची. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रभात फेरीमध्ये देशभक्तीपर गाणी गात फिरायची. न शिकता उत्तम हार्मोनियम वाजवायची… सकाळी उठल्यावर…

Read More

सतीश बर्वे मी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. दुसऱ्या मजल्यावरच्या नितीनच्या खोलीत प्रवेश केला. नितीन माझा जवळचा मित्र. जवळपास दीड महिन्यांपूर्वी याच हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत दाखल झाला होता. रात्रीच्या वेळी ऑफिसमधून घरी परतत असताना रस्त्यावरील खड्डे चुकवताना त्याच्या मोटरसायकलची एका ट्रकसोबत जोरदार टक्कर झाली. नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला होता तो. नितीन ॲडमिट झाल्यावर साधारण आठवडाभराने त्या खोलीत सहरुग्ण म्हणून 25 वर्षांचा अशोक दाखल झाला होता, अशाच काहीशा अपघाताचं निमित्त होऊन. पण नितीनच्या मानाने अशोक खूपच सुदैवी होता जखमांच्या बाबतीत. नितीनच्या बेडजवळच्या खुर्चीवर मी बसलो, इतक्यात नितीनने खुणेनेच मला अशोककडे बघायला सांगितले. एरवी मी खोलीत शिरता क्षणी ‘गुड मॉर्निंग चाचू’ असं माझं…

Read More

पराग गोडबोले “आई काय दिलंय आज डब्यात?” मी अगदी उत्सुकतेनं विचारलं आईला आणि आई म्हणाली, “अगं, आलू पराठे आणि दही दिलंय. सोबत एक केळं पण आहे. न विसरता खा.” “दादाला काय दिलंय?” “तुला जे दिलंय, तेच त्यालाही दिलंय. त्याला एक जास्त दिलाय पराठा, एवढंच.” “बरं” म्हणाले मी, पण आईच्या नकळत दोघांचे डबे उघडून बघण्याचा मोह मला आवरला नाही. दोघांच्याही डब्यात पराठेच होते, पण माझ्या डब्यातले दोन पराठे थोडेसे करपलेले होते. दादाचा डबा उघडला आणि त्यात डोकावून बघितल्यावर, सगळे पराठे अगदी छान, व्यवस्थित भाजलेले, सुबक दिसत होते. “आई, लगेच इकडे ये. काहीतरी विचारायचंय तुला…” मी आईला हाक मारली. “अगं, का एवढा…

Read More

शोभा भडके भाग – 17 सिया आणि सुधाला आरूच्या घरी सोडून आकाश ऑफिसमध्ये गेला होता. महत्त्वाचे काम असल्याने शिवने त्याला जायला सांगितलं होतं. इथे आरूकडे हॉलमध्ये सोफ्यावर सुधा आणि सिया बसल्या होत्या. कलावती आणि सरिता त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आल्या. “अहो राहू द्यायच हो… याची काय गरज होती?” सुधा एवढा सगळा नाश्ता पाहून म्हणाल्या. “गरज कशी नाही वं! तुम्ही आमच्या विइन बाई. तुमचा मान राखाया नगं व्हय? लेकीच्या सासू हाईस तुम्ही…” त्यांच्या हातात चहा देत कलावती म्हणाल्या. “मुलीच्या सासू तर तुम्ही पण आहात ना? आणि कशाला उगाच हे मुलाकडचे, मुलीकडचे असं मानायचं? सगळं सारखंच धरून चालूया…” सुधा हसत म्हणाल्या. मग…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा जैसे तवंचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप ॥458॥ कां खैर चंदन काष्ठें । हे विवंचना तंवचि घटे । जंव न घापती एकवटें । अग्नीमाजीं ॥459॥ तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यादि इया । जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥460॥ मग जातीव्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भाव होती मज मीनले । जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥461॥ तंववरी नदानदींचीं नांवें । तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे । जंव न येती आघवे । समुद्रामाजीं ॥462॥ हेंचि कवणें एकें मिसें । चित्त माझां ठायीं प्रवेशे । येतुलें…

Read More

दर्शन कुलकर्णी श्री एकनाथ षष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन टीम अवांतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. संगीताचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता. वडील विख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखाँ (रख कुरेशी) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे धडे घेतले. झाकीर हुसेन यांनी पहिला व्यावसायिक तबलावादनाचा कार्यक्रम 1963 मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी केला. तर, आपल्या तबलावादनातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस त्यांनी 1970 मध्ये प्रारंभ केला. त्या एका वर्षात साधारणपणे 150 तबलावादनाचे कार्यक्रम त्यांनी भारतासह विविध देशांत सादर केले. याशिवाय सामूहिक तबलावादनासाठी विख्यात सरोदवादक आशीष खान यांच्यासोबत 1970 ‘शांतिगट’ आणि नंतर 1975 मध्ये पुढे…

Read More

माधवी जोशी माहुलकर “नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो…” सलील कुलकर्णींचे संगीत आणि संदीप खरेंचे शब्द. सगळंच अप्रतिम! ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी जीवनातल्या छोट्या छोट्या अनुभवांवर, प्रसंगांवर प्रकाश टाकला आहे. ‘जरा चुकीचे अन् जरा बरोबर बोलू काही’ म्हणत सामान्य लोकांच्या भावभावनेला हात घातला आहे, त्यातीलच मला आवडलेली कविता, “नसतेस घरी तू जेव्हा…” ही कविता ऐकली की खरंच जीव कासावीस होतो. घरातील स्त्रीचे असणे किंवा नसणे दखलपात्र असतं, तिचे घरात असणंही तिच्या नसण्याइतकंच महत्त्वाचं असतं, जसा घरातील कर्तापुरुष हा त्या घराचा आधारवड असतो, तशी स्त्री ही त्या घराची आधारस्तंभ असते. प्रत्येक…

Read More

मेष या आठवड्यात तुमच्या जोडीदाराचा भाग्योदय होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या नोकरीत बदल होऊ शकतो. नोकरीसंदर्भात आधी दिलेल्या मुलाखतीचे उत्तर येईल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. व्यावसायिक वर्गाची रखडलेली कामे मार्गी लागतील. कायदेशीर निर्णय तुमच्या बाजूने लागतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी महिलांचे वाद मिटतील. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. वृषभ या आठवड्यात सकारात्मकता अनुभवू शकाल. नोकरदारांना नवीन प्रोजेक्ट मिळतील. आधी केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल आणि कौतुक होईल. व्यावसायिक वर्गाकडून नवीन संकल्पना राबविल्या जातील आणि त्याद्वारे व्यवसायाला चांगला दर्जा मिळवून देतील. जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल. महिलांनी विनयाने वागावे, घरात एखादे मंगलकार्य ठरेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. मिथुन…

Read More