Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
हिमाली मुदखेडकर “आई, माझ्या फिजिक्सच्या सरांनी तुला भेटायला बोलावले आहे…” चिरंजीव घरात येता येता सांगते झाले… “का रे बाबा? काय प्रताप करून ठेवलायस? कालच तर त्यांच्या नावे ॲप्लिकेशन नेलेस ना, माझ्या सहीने… मग आता काय?” “माहिती नाही यार… सगळ्यांनीच दिलं ॲप्लिकेशन…” मला वाटलं, याने केलं असणार काहीतरी किंवा मागच्या पालक सभेत आम्ही हजर नव्हतो म्हणून कदाचित असेल बोलावले! जाऊन तर पाहू, उद्या कळलेच काय प्रगती आहे ते… आधी फोन करून दुसर्या दिवशी सकाळी अकरा वाजताची वेळ ठरवून घेतली.. आणि ठरलेल्या वेळेत पोहोचले… दारावर टकटक करून ‘आत येऊ का,’ असे विचारले… समोरची व्यक्ती साधारण माझ्याच वयाची… रंग सावळा, शिडशिडीत बांधा, उंची…
लीना जोशी परुळेकर Hair removal (अनावश्यक केस काढून टाकणे) बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. कारण, आजकाल बाजारात खूप प्रकार उपलब्ध आहेत आणि कुठला प्रकार आपल्यासाठी उत्तम आहे, हे त्याची माहिती असेल तर ठरवणे सोपे जाते. सगळ्यात प्रसिद्ध असलेला Hair removal चा प्रकार म्हणजे waxing. Waxing हे Painful असले तरी त्याचा परिणाम हा जास्त वेळ राहाणारा असतो. कारण, त्यात केस हे मूळापासून निघतात. ज्यामुळे नवीन केस येण्यास वेळ लागतो. Waxing केल्यावर घ्यायची काळजी म्हणजे, जर waxing केल्यावर लालसरपणा येत असेल तर, बाजारात Aleo Vera Gel मिळते ते सर्वप्रथम लावावे, बर्फ फिरवावा. त्वचा नॉर्मल झाल्यावर त्यावर Astringent वापरावे, कारण त्यात antiseptic property…
आराधना जोशी साहित्य विशेष आहार माहिती : शाकाहारी पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी सुक्या लाल मिरच्या – 12 ते 15 (कमी तिखट खाणाऱ्यांनी मिरच्या अजून कमी केल्या तरी चालतील) सालं काढलेल्या लसूण पाकळ्या – 15 ते 20 (पाकळीच्या आकारानुसार घ्या) जिरे – दीड टीस्पून तेल – फोडणी पुरते (साधारणपणे 1 टेबलस्पून) मीठ – चवीनुसार पाणी – अर्धा ते पाऊण लीटर तयारीस लागणारा वेळ : लसूण पाकळ्या सोलून ठेचून घेण्यासाठी – 5 मिनिटे सुक्या मिरचीचे तुकडे करून त्यातील बिया बाजूला करण्यासाठी – 5 मिनिटे एकूण वेळ – 10 मिनिटे हेही वाचा – Recipe : देवीसाठी त्रयोदशगुणी विडा (तांबूल) कृती कढईमध्ये तेल गरम करून…
माधवी जोशी माहुलकर भाग – 2 मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ताडोबाच्या जंगलाने पहिल्याच भेटीत आमच्या मनावर गारुड केलं होतं. त्यामुळे चंद्रपुरला कोणी पाव्हणे आले की, आमची ताडोबा भेट ही नक्की ठरलेली असायची. ताडोबाच्या जंगलाचा एरिया हा जवळपास 625 कि.मी. स्क्वेअर एवढा पसरलेला आहे. ताडोबा अंधारी हा महाराष्ट्र राज्यातील एक नंबरचा व्याघ्र प्रकल्प आहे. जैवविविधतेच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण असे हे जंगल आहे. ऐन, खैर, सागवान, हिरडा, बेहडा अशा अनेक औषधीयुक्त वनस्पतींनी परिपूर्ण असे वन आहे, पण मुख्यत्वेकरून बांबूची झाडे या जंगलात मोठ्या प्रमाणावर आहेत. या जंगलात फुलपाखरांच्या विविध जाती आहेत… यासुद्धा माझ्या पाहण्यात आल्या. जंगलातील उंच मचाणावर वाघ पाहायला बसलो असताना वाघ तर…
यश:श्री हत्ती या अजस्त्र प्राण्याबद्दल अबालवृद्धांच्या मनात कुतूहल असते. विविध भाषिक चित्रपटांमध्येही ते पाहायला मिळाले आहेत. या प्राण्याला माणसावळतात आणि त्याचा वापर मोठमोठे ओंडके वाहून नेणे किंवा मिरवणुकीसाठी केला जातो. काही काळापूर्वी तो सर्कशीमध्येही दिसायचा, मात्र प्राणीमित्रांच्या पुढाकाराने सर्कशीत प्राण्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली. वस्तुत: भारतीय संस्कृतीत हत्ती हे भरभराटीचे, ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच पूर्वी राजे-महाराजांचा राज्यातील फेरफटका हत्तीवरील अंबारीत बसून असायचा. या हत्तीला सजवण्यातही येत असे. त्याच्या पाठीवरील झुली देखील नक्षीदार आणि आकर्षक रंगाच्या होत्या. एखाद्या धार्मिक उत्सवाच्या वेळी हत्तीची जेव्हा मिरवणूक काढण्यात येते, तेव्हा त्याला सजविण्यात येते. त्यामध्ये त्याच्या पाठीवरील अंबारीचाही समावेश असतो. हत्तीच्या पाठीवर जरीची…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – अर्धा किलो चिंच अर्धा लीटर पाण्यात दोन तास भिजवून तिचा कोळ (गर) काढावा. पीठ चाळावयाच्या प्लॅस्टिकच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या चाळणीतून गर छानून घ्यावा. त्यात दोन मोठे चमचे मीठ आणि अर्धा कप व्हिनिगर घालून उकळावे. दाट झाल्यावर गार करून छोट्या बाटल्यांत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. जरुरीच्या वेळी आवश्यक तेवढे चटकन वापरता येते. रोजच्या जेवणात चिंचेचा उपयोग करताना रोज गोळा भिजवून कोळ काढायचा त्रास वाचतो. याच मिश्रणात गूळ, तिखट, चार-पाच लवंगा, सात-आठ मिरीचे दाणे आणि दालचिनीचे दोन तुकडे घालून…
माधवी जोशी माहुलकर विदर्भातील खाद्यसंस्कृती समृद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा या गावांसह इतर खेड्यांमधे वाळवणाचा असाच एक पापडा हा पारंपरिक प्रकार केला जातो. पापडा करताना गहू ओलावून पीठ तयार करतात. हे पीठ चांगले मळून, दीड-दोन तास मुरत ठेवतात. नंतर त्याच्या मोठमोठ्या पोळ्या लाटून घेतात आणि त्या परत हातावर घेऊन त्यांना दोन्ही हातांनी गोल गोल फिरवत अजून मोठा आकार देतात. एका मोठ्या परडीवर तो पापडा वाळत घालतात. पापडा उन्हात कडकडीत वाळले की त्यांचा हातानेच चुरा करून हवाबंद डब्यात भरून ठेवतात. हा प्रकार वर्षभर साठवून ठेवला जातो. अगदी फोडणीच्या पोळीसारखा किंवा फोडणीच्या शेवयांसारखाच असणारा हा पदार्थ कसा करतात ते पाहूया! एकूण…
हिमाली मुदखेडकर माहेरी गावी जाण्याचा खूप वर्षांनी योग आला होता. वामकुक्षी आटोपून मस्तपैकी फक्कड चहा घेतला… आणि फेरफटका मारून यावा म्हणून निघाले. आजूबाजूचा परिसर अनोळखी वाटावा, इतका बदल झाला होताच. तरी काही ओळखीच्या… जुन्या खुणा शोधण्याचा अट्टाहास नजर करत होती… पण कुठे काही खाणाखुणा सापडत होत्या… तर कुठे अगदीच नावीन्य पसरले होते… अशीच पुढे पुढे जात मी त्याच जुन्या पाण्याच्या टाकीजवळ आले… सहज नजर वर टाकीकडे टाकली… पण ते मधमाशांचं पोळं नव्हतं तिथे, जे पूर्वी आम्ही तेथून जात असताना नेहमी दिसायचं… सवयीने नजर समोरील घराकडे वळली. असं वाटल की, तिथेही अपेक्षित चाफा नसेल आता… पण सुखद आश्चर्याचा धक्का! चाफा होता…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – रोजच्या जेवणात कढीपत्ता अथवा करेपाक नेहमीच वापरला जातो. अशावेळी कढीपत्त्याची चटणी हा एक प्रकार रोज आहारात वापरला तर मधुमेह, रक्तदाब आणि ॲसिडिटी असणाऱ्यांना थोडाफार फायदा होतो. कढीपत्त्याची पाने चांगली कोरडी होतील, अशी वाळवावीत, पण तीही सावलीत. पानांच्या प्रमाणात अंदाजाने एक-दोन सुक्या लाल मिरच्या, दोन चमचे धणे, प्रत्येकी एक चमचा जिरे आणि मिरे, थोडासा आंबटपणा येण्यास लिंबाएवढी चिंच किंवा आमसूल घेऊन, तेल किंवा तूप न घेता कढईमध्ये चांगले कोरडे होईपर्यंत परतून घ्यावे. कढीपत्त्याची वाळलेली पाने आणि सर्व…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते…! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… नाती, बोलीभाषेतली… थोडंसं विचित्र… पण बऱ्याच जणांना माहीत असलेलं… आता माझ्यासारखे बावळट पण असूच शकतील, ज्यांना बोलीभाषेतील नाती म्हणजे काय? हा प्रश्न पडलाच असेल. काही लोक बोलता बोलता सहज नाती जोडून मोकळी होतात. सकाळची घाईची वेळ. नवऱ्याची ऑफिसला जायची घाई… मी इस्त्रीचे कपडे आणायला निघाले तर, इस्त्रीवाले काका आमच्या कपड्यांचं गाठोडं घेऊन घरीच यायला निघाले होते, रस्त्यातच भेटले. सोबत एक बाई होती. तिला जरा वाईट वाटत होतं की, थोड्या वेळापूर्वी ती इस्त्रीवाल्या काकांसोबत भांडून गेली होती. तिच्या नवऱ्याची नवीन पँट हरवली होती आणि आता ती भरून द्या म्हणून ती काकांशी भांडली…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
