Author: Team Avaantar

अर्चना कुलकर्णी (शिक्षक दिन विशेष) टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाकडे पहात मी विचार करीत होते, “या पुस्तकाच्या देवाण-घेवाणीच्या मागे काय रहस्य असेल?” नववी ‘ब’मधील सचिन सारंगच्या आईचे मला फार कौतुक वाटत होतं. त्याचं असं झालं, सचिनची आई रोज दुपारी घरी त्याचे दप्तर नेहमी पाहात असत. त्यामुळे त्यांना त्या दिवशी वर्गात काय शिकवलं, काय गृहपाठ दिला आहे,, याची माहिती मिळत असे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे दुपारी त्याचे दप्तर पाहिले त्यावेळी त्यांना ‘एक होता कार्व्हर’  हे कोरे करकरीत पुस्तक त्यात दिसलं. त्यांनी ते पुस्तक पुन्हा दप्तरात ठेवलं. ते पुस्तक सचिन स्वतः दाखवतो का, हे त्यांना पाहायचं होतं. विशेष म्हणजे, त्या दिवशी रात्रीच सचिनने त्यांना ते…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥45॥ तिन्हीं गुणीं आवृत्त । हे वेद जाणें निभ्रांत । म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्त्विक ते ॥256॥ येर रजतमात्मक । जेथ निरुपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥257॥ म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासीच कारण । एथ झणें अंतःकरण । रिगों देसी ॥258॥ तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं । एक आत्मसुख अंतरी । विसंब झणीं ॥259॥…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांच्याच आग्रहामुळे मी पुन्हा कामाची सुरुवात केली. दुसऱ्या इनिंगची सुरुवात ‘स्टार प्रवाह’च्या नवीन सीरियलने झाली. सीरियलचे नाव ‘वचन दिले तू मला’… सुलभा देशपांडे, ज्योत्स्ना कार्येकर, आसावरी जोशी, राजेंद्र चावला, पुष्कर जोग, मयुरी वाघ, भारती पाटील, सुश्रुत मंकणी आणि अन्य बरेच कलाकार होते. माझं कॅरेक्टर म्हणजे एकदम ठसका! खूप श्रीमंत, पैशाचा माज असलेली अशिक्षित बिनडोक पण प्रेमळ आई… कथानक पण छान होतं… मला फुटेज पण चांगलं होत… म्हणजे, लोक रस्त्यात ओळखायला लागली होती. हे पाहून छान वाटायचं. तशात मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आला. मी बाजारात जाऊन पूजा तसेच हळदी…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः । वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥42॥ वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥245॥ म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजें । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥246॥ एथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाही । ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥247॥ कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् । क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥43॥ देखें कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत ।…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखामध्ये खाली बसून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात आणखी काही आसने आणि त्यांचे फायदे जाणून घेऊयात. दंडासन दंडासन करताना पाय सरळ पुढे करून बसायचे. दोन्ही पायांची बोटे वाकवून तुमच्याकडे ताणून ठेवा. हात शरीराच्या दोन्ही बाजूंनी समांतर ठेवून पंजे जमिनीवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. नजर समोर ठेवून आणि आपला श्वासही सामान्य ठेवायचा. फायदे : तुमचा मेंदूही इतर योगासनांप्रमाणे निरोगी राहतो. या मुद्रेच्या नियमित सरावाने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचे प्रमाण कमी होते. पाठीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. सर्व आसनांचा तयारी म्हणून अत्यंत उपयोगी आहे. भद्रासन भद्रासन करताना दोन्ही पाय गुडघ्यात…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा एषाऽतेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु । बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥39॥ हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ । आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥230॥ जया बुद्धियुक्ता । जाहालिया पार्था । कर्मबंधु सर्वथा । बांधू न पावे ॥231॥ जैसे वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेंसीं उरिजे । अचुंबिता ॥232॥ नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥40॥ तैसें ऐहिक तरी न नशे…

Read More

रश्मी परांजपे भाग – 4 मागील तीन लेखांमध्ये आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, याविषयी बरेच निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण या विषयावरील उर्वरित मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. शालेय वार्षिक सहल आणि स्नेहसंमेलन अशा दोन महत्त्वाच्या मुद्द्यांसंबंधी पालकांच्या जबाबदारीविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. शालेय वार्षिक सहल आणि मुलांचा सहभाग शाळा दरवर्षी मुलांसाठी सहल आयोजित करत असते. सहलीचे ठिकाण आपण पाहिलंय, तेव्हा मुलाने तिथं जायची गरज नाही, असा विचार पालकांनी कधीच करू नये. तसेच, मुलं लहान आहेत म्हणून अजिबात काळजी करू नये, कारण सर्वच मुलं समवयस्क असतात,  शिवाय शाळेच्या ताई आणि मावशी सहलीमधे सर्व मुलांची व्यवस्थित काळजी घेत असतात.…

Read More

रविंद्र परांजपे मागील सर्व लेखांमधे आपण विशेष करून निरामय मानसिक आरोग्यासंबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन घेतले. आता Health is Wealth अर्थात आरोग्यम् धनसंपदा! या उक्तीचा समर्पक अर्थ असा आहे कि आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे. वास्तविक पाहता, आपण जेव्हा जन्माला येतो, तेव्हा आपले शरीर निरोगी आणि स्वस्थ असते. तथापि,  कालपरत्वे वयोमानानुसार तसेच वातावरणानुसार आपल्या शरीर-मनात तसेच आपल्या रोजच्या जीवनात हळूहळू बदल होत जातात. असे बदल होणे हे स्वाभाविक तसेच नैसर्गिक देखील आहे. काही बदल आपल्या कळत-नकळत आपोआप होत असतात; तर काही बदल आपण मुद्दामून घडवून आणतो. कारण काही असले तरी बदल होत असतात आणि ते देखील सतत होत असतात, हे मात्र…

Read More

मनीषा गोगटे साटोरीमध्ये दोन भाग असतात, एक असते पारी (वरचे कव्हर) आणि दुसरे असते सारण. पारीसाठी साहित्य मैदा – 2 वाट्या एकदम बारीक रवा – 1 वाटी साजूक तूप अथवा तेल – दोन ते अडीच टेबलस्पून मीठ – चवीनुसार दूध – पारी किंवा कणीक भिजण्यासाठी सारणासाठी साहित्य खवा – 200 ग्रॅम एकदम बारीक रवा – 100 ग्रॅम पिठीसाखर –दीड ते पावणेदोन वाटी (आवडीनुसार / हवं तेवढ्या गोडीनुसार) भाजलेली खसखस – 2 ते अडीच टेबलस्पून वेलची पावडर – एक टीस्पून साजूक तूप – 2 टेबलस्पून साटोरी भाजायला किंवा तळण्यासाठी तूप पुरवठा संख्या : 20 ते 22 नग हेही वाचा – Recipe :…

Read More

निवेदिता मराठे सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वाधिक प्रिय मोदक. त्यामुळे उकडीच्या मोदकासह नानाविध प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणरायाला दाखवला जातो. उकडीच्या मोदकांप्रमाणेच तळणीचेही मोदक केले जातात. याशिवाय, केशर मोदक, मावा मोदक, अंजिर मोदक, गुलाब मोदक तसेच चॉकलेट मोदकही उपलब्ध आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण पाहूया माव्याच्या मोदकाची रेसिपी. साहित्य खवा (मावा) – पाव किलो पिठीसाखर – स्वादानुसार (साधारण ¼ कप) केशर – चिमूटभर कोमट दूध – 1 ते 2 चमचे (केशर भिजवण्यासाठी) वेलची पूड – पाव चमचा पिस्ता – थोडेसे (गार्निशसाठी, ऐच्छिक) तूप – अर्धी वाटी हेही वाचा – Recipe : गणपतीसाठी नैवेद्य… खिरापत आणि पंचखाद्य कृती नॉन-स्टिकच्या कढईत…

Read More