Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
निवेदिता मराठे सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वाधिक प्रिय मोदक. त्यामुळे उकडीच्या मोदकासह नानाविध प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणरायाला दाखवला जातो. उकडीच्या मोदकांप्रमाणेच तळणीचेही मोदक केले जातात. याशिवाय, केशर मोदक, मावा मोदक, अंजिर मोदक, गुलाब मोदक तसेच चॉकलेट मोदकही उपलब्ध आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण पाहूया माव्याच्या मोदकाची रेसिपी. साहित्य खवा (मावा) – पाव किलो पिठीसाखर – स्वादानुसार (साधारण ¼ कप) केशर – चिमूटभर कोमट दूध – 1 ते 2 चमचे (केशर भिजवण्यासाठी) वेलची पूड – पाव चमचा पिस्ता – थोडेसे (गार्निशसाठी, ऐच्छिक) तूप – अर्धी वाटी हेही वाचा – Recipe : गणपतीसाठी नैवेद्य… खिरापत आणि पंचखाद्य कृती नॉन-स्टिकच्या कढईत…
शैलजा गोखले साहित्य ओलं खोबरं – 2.5 वाटी कापलेलं सुरण – 1 वाटी हिरव्या मिरच्या – दोन किंवा चवीनुसार कच्चं केळं – 1 लाल माठाची पाने चिरून – 1 वाटी लाल माठाची देठे – 1 लहान वाटी मक्याचे कणीस – 1 भाजीच्या अळूची पाने बारीक चिरून – 1 वाटी अळूचे देठ – 1 लहान वाटी अरबी किंवा अळकुड्या चिरून – 1 वाटी घोसावळं किंवा घोसाळं चिरून – 1 वाटी दोडक्याचे चिरून – 1 वाटी रताळं – 1 ओल्या शेंगामधील शेंगदाणे – मूठभर (ताज्या शेंगा नाही मिळाल्या तर, कच्चे शेंगदाणे स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजवून) सोलून चिरलेली हिरवी काकडी…
अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखामध्ये उभे राहून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात बसून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघूया. पद्मासन पद्म म्हणजे कमळ. हे आसन करणार्या व्यक्तीच्या शरीराचा आकार कमळासारखा भासतो म्हणून या आसनाला पद्मासन किंवा कमलासन हे नाव दिले आहे. जमिनीवर पाय सरळ समोर ठेवून ताठ बसावे. उजवा पाय जवळ घेऊन त्याचे पाऊल पकडून ते किंचित वर उचलावे आणि डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. डावा पाय वाकवून त्याचे पाऊल थोडे वर उचलून, उजव्या पायावरून ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. तळहात गुडघ्यांवर पालथे किंवा ज्ञानमुद्रेत ठेवावेत. पाठीचा कणा ताठ ठेवून दृष्टी नासाग्री (नाकाच्या शेंड्याकडे)…
यशःश्री जोशी खिरापतीसाठीचे साहित्य किसलेलं सुकं खोबरं – 1 वाटी पिठी साखर – अर्धी वाटी काजू आणि बदाम – 1 ते 2 टेबलस्पून पुरवठा संख्या : 5 ते 7 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : खोबरं किसायला – 10 मिनिटे पिठीसाखर करायला 2 मिनिटे वेलची पूड करायला – 1 मिनिट शिजवण्याचा वेळ : खोबरं भाजून घ्यायला 5 ते 6 मिनिटे भाजलेले खोबरे गार करायला – 7 ते 8 मिनिटे एकूण वेळ : 25 मिनिटे कृती सुकं खोबरं जाडसर किसून घ्या. जाड बुडाच्या कढईत किसलेले खोबरे घालून मंद आचेवर पाच मिनिटे भाजून घ्या. खोबऱ्याचा रंग बदलणार नाही, याची काळजी घ्या. (कढईचे बूड…
रश्मी परांजपे भाग – 3 मागील दोन लेखात आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, या विषयी काही निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण सदर विषयावरील आणखीन काही मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. नीटनेटकेपणाची सवय शाळेमधे वर्गात गेल्यावर ताई-मावशी मुलांना बूट ठराविक ठिकाणी ओळीत ठेवायला शिकवतात. तसेच मुलांना आपले दप्तर घेऊन रांगेत बसायला शिकवतात. मुलांना अशा सवयी लागण्यासाठी जवळपास एक महिना लागतो आणि ताई-मावशींना लक्ष देऊन बरीच मेहनत घ्यावी लागते. पण एकदा मुलांना अशा सवयी लागल्यावर मुलं सवयींचे तंतोतंत पालन करतात आणि हा मुलांचा खूप चांगला गुण आहे. पालकांनी मुलाला अशा सवयी घरी देखील लावाव्यात. त्याला बूट आणि दप्तर ठराविक ठिकाणी…
हर्षा गुप्ते निनाव साहित्य बेसन – 1 वाटी ओल्या नारळाचं दूध – अडीच वाटी गूळ पावडर – दीड वाटी वेलची पावडर साजूक तूप पुरवठा संख्या – दोघांसाठी कालावधी – साधारणपणे 20 मिनिटे कृती नारळाच्या दूधामध्ये गूळाची पावडर घालून ठेवा. जेणेकरून गूळ लवकर विरघळेल. एक वाटी बेसन मंद आचेवर जाड बुडाच्या कढईत खमंग भाजून घ्या. मंद आचेवर भाजलेल्या बेसनमध्ये हळूहळू गूळ मिश्रित नारळाचे दूध घालून ढवळत रहा. म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि सतत ढवळल्याने करपणारही नाही. त्यात नंतर वेलची पावडर आणि साजूक तूप घालायचे. यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढायची. कढईत खाली हलकेसे करपल्यावर निनावं एकदम खरपूस लागते. वाटीत काढून…
डॉ. सारिका जोगळेकर (होमिओपॅथिक तज्ज्ञ) ‘मन निरोगी तर तन निरोगी!’ शरीर आणि मनाचे अतूट नाते आज विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. मन आणि शरीर हा संवाद मुख्यतः मेंदूतील न्यूरॉन्स, हार्मोन्स आणि स्नायूसंस्था यांच्या माध्यमातून घडतो. मन शांत, सकारात्मक आणि आनंदी असते, तेव्हा शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते, हार्मोन्सचे संतुलन राखले जाते आणि ऊर्जा पातळी सुधारते. पण जेव्हा मन तणावग्रस्त, अस्वस्थ किंवा नकारात्मक भावनांनी भरलेले असते, तेव्हा शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो. त्यानंतर कालांतराने डायबिटीस, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल अशा आजारांचा प्रवास सुरू होतो. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव वाढत चालले आहेत. त्यामुळे मानसिक आजाराचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे. शरीरात एखादी वेदना झाली की, आपण…
रविंद्र परांजपे मागील लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणार्थ आरोग्यदायी संतुलित जीवनशैली अमलात आणणे नितांत आवश्यक आहे, हे वास्तव लक्षात घेतले. या लेखात आपण आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव याबाबत जाणून घेणार आहोत. पूर्वी फक्त वयस्कर लोकांना मनोविकार समस्या असायच्या. आता मात्र किशोरवयीन तसेच तरुण-प्रौढ या सर्वांनादेखील मानसिक ताणतणावांनी ग्रासलेले असल्याचे कटू वास्तव निदर्शनास येते. मानसिक ताणतणाव कोणालाच चुकलेला नाही. प्रत्येकालाच ताणतणावमुक्त जीवन जगावेसे वाटते. वयोमानानुसार वर्गीकरण आयुर्वेदात मनुष्याचे आयुर्मान 100 वर्षे धरून वयाच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत. बाल अवस्था : जन्मापासून 16 वर्षांचा कालावधी मध्य अवस्था : 17 ते 70 वर्षांचा कालावधी वृद्ध अवस्था : 70 वर्षांनंतर सुरुवात आपल्या जीवनशैलीत कालानुरूप बदल…
लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण पारंपरिक घरगुती उपाय पाहिले. आता या लेखात आपण काही trending ingredients आणि trends बद्दल माहिती घेऊ. सध्याच्या उत्पादनांमध्ये एक ingredient जे खूप trending आहे,- ते म्हणजे ‘Hyaluronic Acid’ (हायल्यूरॉनिक ॲसिड) मुळात हे Acid आपल्या शरीरात तयार होते. हे डोळे, joints आणि त्वचेत आढळते. हे Acid शरीरात इतर उपयोगांच्या जोडीला त्वचेला – hydration देण्याचे काम सुद्धा करते. या acid मुळे त्वचेची flexibility आणि elasticity वाढायला मदत होते, ज्यामुळे त्वचा मऊ मुलायम राहून त्यावरील fine lines आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते. हे acid artificially बनवून त्याचा विविध उत्पादनांमध्ये उपयोग केला जातो. Hyaluronic Acid चे वैशिष्ट्य…
हर्षा गुप्ते शेंगा डाळ साहित्य भिजवलेली तूरडाळ – अर्धी वाटी शेंगदाणे – 3 टी-स्पून जीरं – अर्धा चमचा लसूण – 7-8 पाकळ्या कोथिंबिर – पाव वाटी मीठ, लाल तिखट, लिंबू, साजूक तूप – चवीनुसार फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, कढिपत्ता पुरवठा संख्या – दोघांसाठी कालावधी : साधारणपणे अर्धा तास (डाळ भिजायला वेळ लागतो.) कृती तूरडाळ उकडून नीट घोटून घ्यावी. शेंगदाणे, लसूण, जिरं खमंग भाजून घ्यावेत. थोड्यावेळाने वरून कोथिंबिर घालून पुन्हा परतून घ्यावे. शेवटी लाल तिखट घालून गॅस बंद करा आणि ते मिश्रण परतवा. कढई गरम असतेच आणि लाल तिखट जळत नाही. शेंगदाण्याचे मिश्रण पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. आता कढईमध्ये…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
