Author: Team Avaantar

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! मी ‘लग्नाची बेडी’ सीरियलमध्ये काम करत होते. ‘राघव’ची ‘माई आत्या’… म्हणजे रायाच्या आईची भूमिका होती. आता माझा मुलगा ‘राया’ आर्मीमध्ये असतो आणि तो ड्युटीसाठी एक पोस्टवर जातो अन् तिथून गायब होतो, हरवतो! त्याचे वडील पण शहीद झाले होते. आता ती माई बिचारी या त्या देवस्थानला जाऊन ‘रायाला सुखरूप ठेव… लवकर घरी येऊ दे…’ अशी प्रार्थना करत असते… असे बरेचसे सीन टेलिकास्ट झाले. सांगायची गोष्ट अशी की, गुढी पाडाव्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या स्वामी समर्थांचा वाढदिवस होता. मी कांदिवलीच्या डहाणूकरवाडी येथील स्वामींच्या मठात दर्शन आणि भंडाऱ्यासाठी गेले होते. अशा गर्दीच्या ठिकाणी मला ओळखणारी…

Read More

डॉ. किशोर महाबळ शालेय जीवनात विद्यार्थी हे शिक्षकांना मार्गदर्शक आणि आदर्श‍ मानतात. शिक्षक विद्यार्थ्यांशी वर्गात कसे वागतात? कसे शिकवतात? कसे बोलतात? कसे राहतात? कसे उभे राहतात? कसे चालतात? खुर्चीवर कसे बसतात? हजेरी कशी घेतात? प्रश्न कसे आणि कोणते विचारतात? विद्यार्थ्यांना कसा प्रतिसाद देतात? शिकवताना चेहेऱ्यावरील हावभाव कसे असतात? त्यांचा मूड कसा असतो?… या सर्व गोष्टी विद्यार्थी बारकाईने बघत असतात. शिक्षकांच्या वर्तनाचा दूरगामी परिणाम विद्यार्थ्याच्या विचारांवर, वर्तनावर तसेच मानसिक, बौद्धीक जडणघडणीवर होतो आणि तो विद्यार्थ्यांवर आयुष्यभर टिकून राहतो. म्हणूनच प्रत्येक शिक्षकाचे शाळेतील आणि वर्गातील वर्तन सकारात्मक असणे, अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे असते. सकारात्मक वर्तनाचे महत्त्व न समजणाऱ्या शिक्षकाचे वर्तन नकारात्मक असेल.…

Read More

डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ आपण अनेकदा “माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय!” असं ऐकतो आणि लगेचच घाबरतो. पण खरं पाहिलं तर, कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातील एक अत्यावश्यक घटक आहे, जे प्रत्येक पेशीच्या निर्मितीत आणि अनेक महत्त्वाच्या क्रियांमध्ये सहभागी असते. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं, तर ते हृदयविकारासारख्या अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतं; पण योग्य प्रमाणात असलेलं कोलेस्ट्रॉल आपलं आरोग्य टिकवून ठेवतं. म्हणूनच, कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? त्याचे शरीरावर काय परिणाम होतात? ते कशामुळे वाढते? ते नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? हे जाणून घेणे आजच्या काळाची गरज आहे. कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातील एक प्रकारचा लिपिड (चरबीसारखा पदार्थ) आहे, जो यकृतात (liver) तयार होतो.…

Read More

रविंद्र परांजपे निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी आपण मागील लेखात दिनचर्येपासून मार्गदर्शनाचा श्रीगणेशा केला. दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठून केल्यास त्याचे मिळणारे फायदे देखील आपण जाणून घेतले. पूर्वापार प्रचलित असलेल्या उक्तीचे आपण पुन्हा स्मरण करूया. लवकर निजे, लवकर उठे, तयास ज्ञान, सुख, शांती, आरोग्य, धनसंपदा लाभे. या उक्तीची सुरुवात रात्री लवकर झोपावे, अशी आहे. या लेखात आपण लवकर झोपण्याविषयी माहिती घेऊया. रात्री लवकर झोपणे दररोज रात्री वेळेवर झोपणे महत्त्वाचे आहे. साधारणपणे रात्री 9:30 ते 10 या दरम्यान झोपी जावे. रात्री 10 वाजेपर्यंत कफाचा काळ असल्याने त्या वेळेपर्यंत झोपणे निरामय आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच हितावह असते. फार दिवसांपूर्वी मी रात्री लवकर झोपण्याविषयी…

Read More

हिमाली मुदखेडकर पुण्यात पाषाण आणि बाणेरच्या मधे सोमेश्वर वाडी नावाचे ठिकाण आहे. इथे साधारण 900 वर्षे जुने सोमेश्वर महादेवाचे एक खूप सुंदर हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराचा परिसर भव्य असून अतिशय सुबक असे नक्षीकाम केलेले दगडी बांधकाम आहे. येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. मुळा नदीची उपनदी असणार्‍या राम नदीच्या काठावर हे मंदिर आहे. मंदिराला चार प्रवेश द्वार असून मुख्य प्रवेशद्वारा समोर एक भव्य चाळीस फूट उंचीची दीपमाळ आहे. दगडी कोरीवकाम असणारी एक भिंत सभोवताली असून तिच्या एका कोपर्‍यात एक छान गॅलरी आहे. त्या गॅलरीत मोडी लिपीतील जुनी पत्रे, चित्रे, काही खास छायाचित्रे जतन करून ठेवली आहेत. मंदिरात ठिकठिकाणी स्मरण शिळा……

Read More

लीना जोशी परुळेकर केस हा आपल्या सर्वांचा आवडता विषय आहे. आपल्या केसांबद्दल माहिती जाणून घेण्याची आपल्याला कायम उत्सुकता असते. आपले केस कशा प्रकारचे आहेत? काय काय केले तर, आपले केस चांगले रहातील? त्यांची निगा कशी राखायची? असे प्रश्न मनात असतात. पण त्यासाठी आपण आधी केसांबद्दल थोडी basic माहिती घेऊ. आपले केस हे प्रथिनांनी बनलेले असतात, त्वचेच्या आत जो केसांचा भाग असतो, त्याला ‘केसांची मुळे’ म्हणतात. जो भाग त्वचेच्या बाहेर असतो त्याला shaft म्हणतात. त्वचेच्या बाहेर केसांचा जो भाग असतो, तो मृत (dead) असतो; म्हणूनच केस कापले, विंचरले, त्यांची काहीही स्टाईल केली तरी, आपल्याला दुखत नाही. तेच केस ओढले गेले तर,…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते…! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… हल्ली वेगवेगळे डेज (days) आपण साजरे करतो… काही लोक म्हणतात, ‘नसती कौतुकं!’ मला मात्र हे असले सगळे डेज् साजरे करायला आवडतात… असाच एके दिवशी माझ्या आयुष्यात ‘मदर्स डे’ आला. माझ्या लेकी म्हणाल्या, ‘आवडे (लाडात आल्या की, आईची ‘आवडी’, ‘आवडे’ होत असते!) आज आपण तुझ्यासाठी शॉपिंग करूयात.’ शॉपिंग म्हटलं की, मी नेहमीच खूश असते. आम्ही तिघी निघालो… मॉलमध्ये गेलो… ‘Factory outlet’ जिथे 3500 ते 4000 रुपयांची जीन्स आम्हाला दीड हजार रुपयांना मिळाली. वेगवेगळ्या खूप जीन्स ट्राय केल्यानंतर मुलींना एक जीन्स परफेक्ट वाटली! काऊंटरवर गेलो, तशा लेकी म्हणाल्या, “हां, आई दे पैसे!” मनात…

Read More

रश्मी परांजपे ‘प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी’ या मालिकेअंतर्गत मागील लेखात आपण पालकांच्या माहितीसाठी आणि पूर्ततेसाठी विद्यार्थीसंबंधित माहितीपत्रक तयार करताना समाविष्ट करावयाचे महत्त्वाचे निवडक मुद्दे जाणून घेतले. या लेखात आपण शाळेतील तसेच मुलांची स्वच्छता याविषयी माहिती घेणार आहोत. शाळा हे विद्येचे मंदिर आहे, असे आपण मानतो. त्यामुळे शाळा मंदिराप्रमाणेच स्वच्छ असणे नितांत गरजेचे आहे. तद्वतच, शाळेतील विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी त्यांची स्वच्छतादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. आता आपण एकंदरीत स्वच्छतेसंबंधित काही मुद्दे जाणून घेऊयात. शाळेचे प्रवेशद्वार आकर्षक रचनेचे तसेच चांगल्या पद्धतीने रंगवलेले असावे. शिवाय, ते नेहमीच धुवून-पुसून धूळरहित आणि स्वच्छ ठेवावे. असे प्रवेशद्वार बघितल्यावर शाळेत प्रवेश करताना सर्वांचे मन सदैव प्रसन्न राहील. शाळेत वर्गाबाहेरील…

Read More

डॉ. किशोर महाबळ शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेत परीक्षक म्हणून गेल्यावर अनेकदा असे लक्षात आले की, शेकडो विद्यार्थी असलेल्या शाळांतून दरवेळेस तेच तेच विद्यार्थी स्पर्धक म्हणून पाठविले जातात. वक्तृत्व गुण असलेले शाळेतील एक-दोन विद्यार्थी निवडले की, शाळेतील शिक्षकांना समाधान वाटते आणि मग तेच-तेच विद्यार्थी स्पर्धेत पाठविले जातात. वक्तृत्व गुण असलेले विद्यार्थी शोधण्याचा शाळांनी जर नीट प्रयत्न केला तर, प्रत्येक शाळेत अगदी सहजगत्या असंख्य विद्यार्थी सापडतील. शाळेतील प्रत्येक मुला-मुलीला आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली तर, हे असंख्य विद्यार्थी सहजगत्या सापडतील. मात्र, त्यासाठी सर्वांना अशी संधी मिळावी, असा विचार शाळांतील शिक्षकांना करावा लागेल. शाळेतील सर्व मुला-मुलींना संधी मिळेल, अशी व्यवस्थाच आपण निर्माण…

Read More

माधवी जोशी माहुलकर नवरात्रौत्सव म्हटलं की, मला आठवतो तो लहानपणी आमच्या घराजवळील रेणुका मातेच्या मंदिरात नित्यनेमाने येणारा पोतराज! हा शब्द तमिळ भाषेतील पोत्तुराजू या शब्दाचा अपभ्रंश होऊन पोतराज म्हणून रूढ झाला. दक्षिणेत ‘सात बहिणी’ म्हणून ग्रामदेवता पूजल्या जातात; त्यांचा पोतराज हा भाऊ आहे, अशी लोकमान्यता आहे. त्याच्या हातातील सोट्याला (चाबूक) ‘कडक’ असे म्हटले जात असल्यामुळे तो गावात आला की, ‘कडकलक्ष्मी आली’, असंही त्यांना संबोधले जायचे. स्वतःच्याच पाठीवर आसूड ओढणारा पोतराज पाहिला की, तेव्हा त्याची भीती वाटत असे… जसजसे मोठी होत गेले तशी ही भीती नाहीशी होऊन त्याची जागा कुतूहलाने घेतली. त्याच्या गळ्यात रंगबीरंगी मण्यांच्या माळा, कधी कवड्याची माळ ज्यामधे देवीचा…

Read More