Author: Team Avaantar

आराधना जोशी महाराष्ट्रात साधारणपणे जुलैपासून वातावरण भारावलेलं असतं. आताही दिवाळीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहात असल्याचे पाहायला मिळते. सणावाराचा हा उत्साह तुळशीच्या लग्नापर्यंत राहील. एकदा का तुळशीचं लग्न लागलं की, मग सुरू होईल लग्नसराईची धामधूम! दिवाळसणानिमित्त ग्राहकांनी फुललेली साड्या, रेडिमेड कपड्यांची दुकाने तसेच सराफ पेढ्या तुळशीच्या लग्नानंतर पुन्हा फुललेली दिसतील. पण यात वेगळेपण दिसेल ते लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचे! वर, वधू, लग्नाचा बस्ता, मानपान, सजावट, डीजे यांच्याच जोडीनं महत्त्व असतं ते लग्नपत्रिकेला. किंबहुना ती निवडली की, मगच लग्नाचा माहोल तयार व्हायला सुरुवात होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्थात, हल्ली याची सुरुवात अनेकदा तुळशीच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका छापूनही केली जाते.लग्न आणि…

Read More

गजानन देवधर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला (3 तारीख) आमच्या आण्णांची (वडिलांची) 104वी जयंती होती. आयुष्यभर रसिकतेनं, उत्साहानं आणि माणसांशी नातं जपत जगलेल्या त्यांच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. खेळाडूपणा, नाट्याची आवड, खवय्येपणा, गप्पिष्ट स्वभाव आणि सतत काही ना काही उपक्रमात रमणं—या सगळ्या पैलूंनी त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसायचं. 3 तारखेच्या पहाटे जाग आली आणि त्यांच्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली. लहानपणी त्यांच्याबद्दल मनात आदरयुक्त भीती होती. त्या भीतीमागे खरंतर त्यांच्या उंच व्यक्तिमत्त्वाचा आणि आमच्या आदराचा संगम होता. आण्णा लहानपणापासून उत्तम खेळाडू होते. मल्लखांब, कबड्डी हे त्यांचे आवडते खेळ. मुंबईपर्यंत संघाचं प्रतिनिधित्व करून त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. लग्नानंतरसुद्धा ऑफिसाहून परत येऊन ते खेळायला…

Read More

हिमाली मुदखेडकर मल्हारराव कुलकर्णी ऊर्फ आप्पा हे नव्वदच्या दशकातील नांदेडच्या सिडक-हडको भागातील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व होते. व्यवसायाने शिक्षक असणारे आप्पा नंतर हडको येथे रहावयास आले… ते, त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि दोन नातवंडे असा त्यांचा परिवार… एकास एक जोडून अशी त्या स्कीमची दोन घरे त्यांनी घेतली होती. दोन बाजूंनी रस्ता असणारे कोपर्‍यावरचे घर मिळाल्यामुळे त्यांना इतर घरांपेक्षा जरा जास्त मोकळी जागा मिळाली होती… ज्यात त्यांनी एक मोठा हॉल बांधून घेतला होता. या हॉलमध्ये त्यांची इंग्लिश विषयाची शिकवणी चालत असे. त्यांच्या या टूमदार छोटेखानी घराला नाव होते ‘आशीर्वाद’… नावाप्रमाणेच हे घर तिथे येणार्‍या प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचे खरे! इयत्ता पाचवीपासून इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…! मराठी भाषा… आपली मायबोली, मातृभाषा. तसं तर बऱ्याच लोकांना कमीत कमी चार भाषा तर येतातच. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती किंवा अजून एखाद-दुसरी किंवा दुसऱ्या अनेक भाषा येतात. हे चांगलं आहे. भाषा मग ती कोणतीही असो, ती शिकणं चांगलंच आहे. पण दुःख होतं की, आपली स्वतःची भाषा मात्र आपण खूप चुकीची, अशुद्ध बोलत असतो. ‘जागा भेटली’, ‘बस भेटली’, ‘पट्टी सांडली’, ‘पेन पडला’, ‘वहिनी मिळाली होती काल बाजारात’, ‘साडी घातली’… एक उदाहरण आहे का? एक मराठी सीरियल करत होते दिग्दर्शक होते कांचन नायक सर. अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय माणूस. त्यांनी एकदा सीन कसा…

Read More

पराग गोडबोले माझा वाढदिवस झाला 30 सप्टेंबरला. खूप शुभेच्छा आल्या आणि मी भरून पावलो अगदी! हल्ली या शुभेच्छा देणं खूप सोप्पं झालंय, त्यामुळे अगदी पूर येतो त्यांचा आणि त्या सगळ्यांना उत्तरे देता देता श्रमतो जीव… तरीही छान वाटत राहतं दिवसभर. कधी नव्हे ती सुट्टी घेतली होती. बायकोला आदल्या दिवशीच सांगून ठेवलं होतं, “घरी काही करत बसू नको… छान कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ.” अर्थात, सर्वसामान्य डोंबिवलीकराची झेप ‘मॉडर्न कॅफे’च्या पुढे जात नाही आणि तिथे जाऊन त्याच लाल, पिवळ्या, हिरव्या भाज्या, रोट्या, नान हे सगळं सदोदित आणि निरंतर खाऊनही जित्याची खोड काही जात नाही…! “नको बाई, मी घरीच करते काहीतरी तुझ्या आवडीचं……

Read More

डॉ. किशोर महाबळ शाळाशाळांमध्ये दरवर्षी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होतात. पण काव्यस्पर्धा होतात का? किती शाळांना आपल्या विद्यार्थ्यांमधील काव्यप्रतिभा शोधण्यात रूची असते? शाळांना जरी या गोष्टीचे महत्त्व वाटत नसले तरीही विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे. चांगली कविता करता येणे, चांगली कविता समजणे, हे भाषिक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी आवश्यक असते. कविता या सर्जनशीलतेचा एक समृद्ध आविष्कार असतात. ‘जे न देखे रवि, ते देखे कवी’ असे जे म्हटले जाते तेही खरेच आहे. कवी आपल्या कवितांद्वारे वाचकाला जीवनाकडे वेगळ्या अन् व्यापक दृष्टिकोनातून बघायला शिकवतात. कविता वाचकाला संवेदनशील करते, विविध भावभावनांचे दर्शन घडविते, निसर्गातील आणि जीवनातील सौंदर्य दाखविते, कृतिशील…

Read More

मनोज जोशी व्यक्ती तितक्या प्रकृती, असं म्हटलं जातं. क्षेत्र कुठलंही असो तिथे तयारीचे, दिखाऊपणा करणारे, दुसऱ्यांना शहाणपण शिकवणारे… असे माणसांचे नानाविध प्रकार पाहायला मिळतात. क्षेत्र जितकं मोठं तितकी व्हरायटी जास्त! पत्रकारितेतही अनेक प्रकारची माणसे पाहिली. काहींची विद्वत्ता तोंडात बोटं घालयला लावणारी होती. अफाट वाचन, भाषेवर प्रभुत्व, पक्की वैचारिक बैठक, लिहिण्याची खास शैली… अशी वैशिष्ट्ये त्यांच्यात होती. काही ‘गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास’ असेही होते, पण ते हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. काहींचा अभ्यास चांगला, वाचन चांगले पण केवळ दिखाऊपणा करण्यात सर्व शक्ती खर्ची करणारे होते. त्यातही आपल्या पेशाचा उपयोग ‘वर कमाई’साठी करणारे महाभाग या दिखाऊ सहकाऱ्यांमध्ये होते. मुंबई-ठाणे परिसरात…

Read More

आराधना जोशी दिवाळी म्हणजे आनंदोत्सव… गणेशोत्सव आणि दिवाळी हे दोन सण असे आहेत की, या काळात मनातील उल्हास ओसंडून वाहात असतो. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. चिंता-विवंचनांची जळमटं झाडून टाकून आनंदाचे आकाशदिवे झगमगत ठेवणारा सण. घरासमोर शांतपणे तेवणारी पणती… छानसा आकाशकंदिल… घरात फराळाचा घमघमाट… तर, भल्या पहाटे उटण्याचा अन् सुवासिक तेल, साबणाचा घमघमाट… असे मन प्रसन्न करणारे वातावरण म्हणजे दिवाळी. पूर्वी रेडिमेड कंदिल आणण्याऐवजी आकाशकंदिल घराघरांत बनवला जायचा. वडिलधाऱ्यांकडून मुलांना आकाशकंदिल तयार करण्याचे धडे दिले जायचे. रंगीत कागद, घरी केलेली खळ यांच्या मदतीने कंदिल तयार केले जात होते. याच्याबरोबरीनेच वाडीतला सार्वजनिक कंदीलही त्याच उत्साहाने तयार केला जायचा. बहुधा ती चांदणीच असायची. त्यासाठी…

Read More

गजानन देवधर आमचं ग्रीसला जायचं ठरलं, प्रवासाची रूपरेषा तयार झाली. तिथं गेल्यावर वेगळं काय पहाता येईल, हे शोधत असताना मला दिसलं, आम्ही ॲथेन्समध्ये ज्या आठवड्यात मुक्कामाला होतो, त्याच आठवड्यात तिथं संगीताचे दोन कार्यक्रम होणार होते. अर्थात, दोन्ही कार्यक्रम ग्रीक भाषेतील गीतांचे होते! त्यातला एक होता पॉप संगीताचा लायकाबेट्टस डोंगरावर आणि दुसरा होता हेरोडेस अटिकस या दोन हजार वर्षांपूर्वीच्या अँफिथिएटरमध्ये. आम्हाला दुसरा कार्यक्रम जास्त आकर्षक वाटला, कारण ती कॉन्सर्ट होती. मिकिस या ग्रीसमधील प्रसिद्ध संगीतकाराच्या गीतांची… तुरुंगवास भोगलेला सामाजिक कार्यकर्ता, पूर्वीचा सांस्कृतिकमंत्री, आघाडीचा संगीतकार अशी बहुआयामी व्यक्तिमत्व अशीही त्याची ओळख आहे; तसेच त्या कार्यक्रमाचे स्थळ होते ॲक्रोपोलीसच्या पायथ्याशी असलेलं हेरोडेस अटिकस…

Read More

चंद्रशेखर माधव साधारण एक महिन्यापूर्वीची घटना. माझ्या कंपनीत सुदीप नावाचा एक तरुण इंजिनीअर सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन विभागात जॉइन झाला. पहिल्याच दिवशी आम्हा सर्वांशी त्याची ओळख करून देण्यात आली. आमचे ऑफिस पुण्यातील पिरंगुट येथे आहे आणि आम्हा बऱ्याच जणांची घरं तिथून लांब आहेत. त्यामुळे साहजिकच आम्हाला घरातून सकाळी बऱ्यापैकी लवकर निघावे लागते. दोन तीन दिवसांतच दुपारी जेवायला एकत्र जाण्याच्यावेळी बऱ्यापैकी संवाद घडून आला. परिणामी, तो आमच्यामध्ये पटकन रुळला. तो जॉइन झाल्यानंतर साधारण सात-आठ दिवसांनी मी काही काम असल्याने तो बसतो त्या ठिकाणी पोहोचलो. सुदीप जागेवर नव्हता. इतरांना विचारलं तेव्हा समजलं की, तो सुट्टीवर आहे. नुकताच जॉइन झालेली व्यक्ती सुट्टीवर…

Read More