Author: Team Avaantar

माधवी जोशी माहुलकर वर्धेवरून काल सकाळी गोरस भांडारचा गोरस पाक घरी आला आणि मग काय घरातील खारी, बिस्किटे मागे सारली जाऊन पहिल्यांदा गोरस पाक चहासोबत पोटात गेला… वा! काय अप्रतिम चव! कल का तो दिन बन गया! वर्धा जिल्ह्याचे गोरस पाक हे प्रसिद्ध असे जागतिक स्तरावरील उत्पादन आहे. वर्धेच्या मगनवाडी प्रभागात 1939 साली महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांच्या संकल्पनेतून गोसंवर्धन गोरस पाक शाळेची निर्मिती झाली. स्थानिकांना ग्रामीण आणि कुटीर उद्योगातून रोजगार मिळावा, खेडीपाडी समृद्ध आणि स्वावलंबी व्हावीत, हाच उद्देश गोरस पाक भांडारच्या निर्मिती मागे या त्रयींचा असावा. गोरस भांडार येथे आजूबाजूच्या खेड्यातील गोपालक शेतकऱ्यांकडून, ग्रामविकास समित्यांमधून,…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! मधल्या काळात मी चांगलीच जाडजूड झाले होते. अगदी रेडिमेड कपडे 4XL साइजचे लागायचे. बरेचदा आवडलेले कपडे, रंग, पॅटर्न, स्टाईल त्या साईजमध्ये मिळायची नाही. खूप वाईट वाटायचं… पण अलीकडेच जाणवत होतं की, आपण बारीक होतोय. ध्यानीमनी नसताना हे घडत आहे. गेल्या आठवड्यात मी स्वतःसाठी XL साईजचा ड्रेस विकत घेतला आणि तो व्यवस्थित झाला. त्यामुळे आता मैत्रिणी, शेजारणी, सहकलाकार या सगळ्यांना माझ्या बारीक होण्याचं कौतुक वाटायला लागलंय. “काय ग जाडे, एवढी बारीक कशी झालीस? आजारी तर दिसत नाहीयेस! आम्हाला तरी सांग तुझं गुपित…” अशा प्रतिक्रिया यायला लागल्यात. वास्तविक, हे गुपित मलाही उशिराने समजलं.…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. मग काहीतरी क्लृप्ती लढविली जाते. ‘फूड कॉर्नर’मध्ये वेगळ्या प्रकारची अळुवडी, फ्राय इडली अन् गुलबक्षीच्या कोवळ्या पानांची भजी बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी… हेही वाचा – Kitchen Tips : एकसारखी गोल आणि झटपट बटाटाभजी, लज्जतदार पराठे! (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. किशोर महाबळ सर्व शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक मुलीला आणि मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची दखल घेऊन त्याला ती गुणवत्ता विकसित करण्याची पूर्ण संधी आणि प्रोत्साहन मिळालेच पाहिजे. विज्ञान आणि गणितात उत्तम गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच भाषा, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल असे अन्य विषय तसेच चित्रकला, गायन, वादन, नृत्य अशा कलांमध्ये गती असलेल्या विद्यार्थ्यांनाही सारखेच महत्त्व दिले गेले पाहिजे. कोणीही विद्यार्थी प्रोत्साहनापासून वंचित राहायला नको, याचे आपण महत्त्व समजून घेत आहोत. आपल्या शाळेत आपण यासाठी काय करू शकतो, याचा विचार करूयात! दरवर्षी सर्व शाळांमध्ये कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेतली जाते. त्यानंतर सहसा स्पर्धकांच्या चित्रांतील पारितोषिक प्राप्त चित्रेच विशेष…

Read More

माधवी जोशी माहुलकर खरंतर शेगाव कचोरीचे सारण हे इतर कचोऱ्यापेक्षा (जसे मूगडाळ कचोरी, प्याज कचोरी, मटर कचोरी) वेगळे असते. शेगावच्या तीरथराम शर्मांची जी कचोरी आहे, तिची बातच निराळी! त्यांचे जे वंशज आहेत भूपेश शर्मा त्यांच्याकडे रोजच्या सुमारे अडीच हजार कचोऱ्या तयार होतात… 20 किलो मैदा याकरिता वापरला जातो. काय खप असेल नाही या कचोरीचा!! तीरथराम शर्मांच्या या कचोरीच्या सारणात आणि मसाल्यात ते वारंवार बदल करत असतात; परंतु ते नेमके काय असतात, त्याबाबत शर्मा बंधू किंवा त्यांचे कामगार याबाबतीत ताकास तूर लागू देत नाही. आता मला माहीत असलेल्या शेगाव कचोरीची रेसीपी देते… साहित्य हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात…

Read More

हर्षा गुप्ते आवळा हे अतिशय गुणकारी फळ मानले जाते. आवळ्यात पाणी (81%), प्रथिने (0.5%), स्निग्ध पदार्थ (0.1%), क्षार (0.5%), कर्बोदके (13-14%) आणि तंतू असतात. आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर असते. तसेच त्यामध्ये अ, ब जीवनसत्त्वे आणि लोह, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादींची संयुगेही असतात. मधुमेह, खोकला, श्वासनलिकादाह, दमा, कावीळ, त्वचारोग, केस अकाली पांढरे होणे आणि इतर अनेक रोगांवर आवळा गुणकारी ठरतो. हिरडा आणि बेहडा या फळांच्या सालीबरोबर आवळकाठीची पूड मिसळून ‘त्रिफळा चूर्ण’ तयार करतात. या आवळ्यापासून त्यापासून लोणचे, मुरांबा (मोरावळा), सुपारी इत्यादी पदार्थ करतात. आपण आज आवळा कँडीची रेसिपी पाहणार आहोत. एकूण कालावधी – अर्धा तास साहित्य हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी बनवताना वापरावयाच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : …तर सामोसे खुसखुशीत होतात! हेही वाचा – Kitchen Tips : कोथिंबीर वडी, अळुवडी आणि केक करताना…. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

गजानन देवधर सन 2005 सालचं कोकण मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरवायचं ठरलं. ठाण्याचे माजी खासदार आणि ज्ञानसाधना संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान हे प्रमुख भूमिकेत होते. संमेलनाचे अध्यक्ष होते प्रसिद्ध पत्रकार माधव गडकरी! एके दिवशी सतीश प्रधानांनी मला बोलावून विचारलं, “सर, संमेलनात तुम्ही सहभाग कसा घेऊ शकाल?” मी क्षणभर गोंधळलो. मी साहित्यिक नाही, पण मराठी साहित्य वाचन मात्र मनापासून आणि भरपूर केलं होतं. लगेच विचार मनात आला – ‘माझा छंद छायाचित्रण, आणि हा साहित्यमहोत्सव… दोन्हींची सांगड घालता आली तर?’ मी प्रधानांना सांगितलं – “आपल्याला ‘साहित्यातील कोकण’ या विषयावर छायाचित्रांचं प्रदर्शन भरवता येईल.” कल्पना त्यांना आवडली. कोकणात प्रत्यक्ष फिरून फोटो काढावे लागतील…

Read More

आराधना जोशी बाहेरील आवरणासाठी साहित्य भाज्यांच्या मिश्रणासाठी साहित्य हेही वाचा – Recipe : वांग्याचे खानदेशी भरीत चटणी साहित्य पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : 15 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे एकूण वेळ : 25 मिनिटे कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी, लो कार्ब, मिलेट बेस हेही वाचा – Recipe : ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा टीप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर मायलेकीची जोडी ओपीडीत आली होती. देहबोलीवरनंच दोघी घरी भांडणं करून आल्याचं स्पष्ट समजत होतं… ‘इट्स नन् ऑफ माय बिझनेस’… पण आपल्याकडे पालक मंडळी फार वेळ गप्प राहू शकत नाहीत; किंबहुना आपल्या पाल्याला चारचौघात लज्जित करणं हा आपला अधिकार समजतात. यामुळं “हिचं डोकं दुखतं, जेवत नाही यांव त्यांव…” झाल्यानंतर “जातीचंच पोरगं आहे हो, पण गुन्हेगार आहे…” म्हणत आईनं सरतेशेवटी मुलीची पोलखोल केलीच! मुलीनं इशारे करूनही आईसाहेब काही थांबेनात “प्रेम वगैरे आपल्यालाही कळतं, पण हा वेडेपणा नाही का? मागं तर त्याच्याकडं बंदूक सापडली… ब्ला ब्ला…” सुरूच होतं… इट वॉज ‘हायब्रिस्टोफिलीया’! एखाद्याला गुन्हेगार किंवा हिंसक व्यक्तीबद्दल एक गूढ आकर्षण वाटतं,…

Read More