Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. “भाऊ काका तुमच्या हातचा गरमा गरम चहा…” जयू आत्याने माझ्याकडे पाहिलं. आत स्वयंपाकघराकडे वळून म्हणाली, “अहो पपी आलीय… चहा ठेवा हो तिच्यासाठी.” भाऊ काका धडपडत बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर कितीतरी आनंदाची फुलं फुलली होती… “ये ग बस. आधी पाणी पी. मी तुझा फेव्हरेट चहा ठेवतो… आणि तुझ्या चहासाठी मी आता कुंडीत पुदिना लावलाय, बरं का!” आम्ही तिघेही खळखळून हसलो. भाऊ काकांनी मस्त चहा बनवून आणला आणि आम्ही तिघे गप्पामध्ये बुडालो. जयू आत्या. आमच्या समोर राहणाऱ्या रघूअण्णा मोगरे यांची मुलगी. तिची भाची माझी मैत्रीण. लहानपणी आम्ही त्यांच्याच घरी खेळायचो. एके…
पराग गोडबोले अशीच एक सुट्टी होती, आळसावलेली, रविवारसारखीच… बायकोच्या बहिणींचा ठाण्यात भेटायचा बेत ठरला होता, त्यामुळे स्वारी लगबगीत होती. आज ‘खानपान सेवा’ बंद राहील, अशी घोषणा करून, आवरून सावरून ती ठाण्याला जायला निघाली… मी आणि लेक उरलो घरात, दंगा घालायला! नेहमीच्या, तोंडपाठ झालेल्या सूचनांचा भडिमार झालाच निघताना आणि आम्ही डोळे मिचकावले एकमेकांकडे पाहून… ती एकदाची बाहेर पडल्यावर, आम्ही नि:श्वास सोडला सुटकेचा आणि तंगड्या पसरून बसलो. लेक आधीच म्हणाली होती, “बाबा, खानपान सेवा सुरूच राहील, नका काळजी करू तुम्ही… मै हूं ना!” पण न्याहारीला मॉडर्न कॅफेमधून इडली सांबार मागवलं गेलं… आणि हीच का खानपान सेवा? अशी शंकेची पाल चुकचुकली मनात. भल्यामोठ्या…
डॉ. किशोर महाबळ अनेकदा शाळांमधील चित्रकलेचे शिक्षण हे निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे एवढ्यापुरतेच मर्यादित असते. त्यामुळे या प्रकारच्या चित्रकलेला प्रोत्साहन दिले की, पुरे एवढाच विचार होतो. खरेतर, चित्रकलेचे क्षेत्र खूपच व्यापक असते. वैज्ञानिक विषयांची माहिती देणारे चित्रमय तक्ते; वृक्ष, पशु-पक्ष्यांची माहिती देणारे तक्ते; भूगोलाचे नकाशे; ऐतिहासिक इमारतींची चित्रे अशी अनेक प्रकारची रेखाटने ही सुद्धा चित्रकलेचाच एक महत्त्वाचा प्रकार मानला जातो. विविध आकाराच्या भूमितीच्या आकृत्या काढणे; वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा विविध विज्ञानविषयांशी संबंधित आकृत्या काढणे ही गोष्ट त्या विषयाच्या उत्तम अभ्यासासाठी अत्यावश्यकच असते. अशा आकृत्या अचूकरित्या काढणे हे सोपे काम नाही. या आकृत्या काढण्यासाठी खूप वेळ, एकाग्रता, अचूकता आणि ज्ञान आवश्यक असते. इयत्ता…
डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्थूलता, थायरॉइड विकार, फॅटी लिव्हर, पचनाचे आजार… पूर्वी मध्यम आणि उतार वयात दिसणारे हे आजार आता तरुणांमध्येही झपाट्याने वाढू लागले आहेत. यामागे सर्वात मोठा दोष आपली बदलती जीवनशैली आहे. पण ही जीवनशैली शरीरात नेमके कोणते बदल घडवते आणि आजारांची निर्मिती कशी करत जाते, हे अनेकांना माहिती नसते. बऱ्याच वेळेला हे माहीत असून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार हे एका दिवसात होत नाहीत. चुकीच्या सवयी दीर्घकाळ टिकल्या की शरीराची नैसर्गिक संतुलन प्रणाली (homeostasis) बिघडते. परिणामी, शरीर हळूहळू या आजारांकडे ढकलले जाते. त्यामुळे लाइफस्टाईल (Lifestyle) डिसीजना “silent killer” असंही म्हटलं…
हिमाली मुदखेडकर कोणते नाते म्हणू हे, ना टाळणे ना गुंतणे का तरी माझे तुझे हे, सोबतीने चालणे… इयत्ता सहावीच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघी पहिल्यांदा भेटलो. तिच्याच घरी तिच्या घराची वास्तुशांत होती. मी आजीसोबत गेले होते. माझ्यापेक्षा दोनच वर्षानी मोठी होती ती… पण घरातील सगळी कामे अशी काही चटाचट करत होती की, मी पाहातच राहिले! स्वयंपाकघरापासून ते आला-गेला पाहुण्याचे आगतस्वागत… पूजेची तयारी… कुणाला काही हवे नको… सगळे एक हाती सांभाळले होते तिने. “रजनीSSS…हे कुठे ठेवलंय…?” “रजे… त्या अमुक माणसाला किती पैसे द्यायचे?” “रजनी डाळ कोणत्या डब्यातून घ्यायची?” “पूजेची पान-सुपारी कुठे ठेवली आहे?” “पंचपाळे भरून ठेवले का?” “दाराला तोरण लावले का?”…
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मिरचीची भजी, खिचडीचे परोठे, शेंगदाणा भजी बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी… हेही वाचा – Kitchen Tips : स्वादिष्ट दहीवडे, हलका ढोकळा, कुरकुरीत कचोरी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये स्वादिष्ट केक, घरगुती चॉकलेट्स अन् खमंग चकली बनविण्याच्या टिप्स पाहुयात. हेही वाचा – Kitchen Tips : गुलबक्षीच्या पानांची भजी, फ्राय इडली, बनवायला सोपी अळुवडी… हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकली आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकल्या आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा बनवताना वापरावयाच्या काही टीप्स पाहुयात (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार) [L1]
हिमाली मुदखेडकर मला अजूनही आठवतोय तो दिवस… कसा विसरणार? सतरा वर्षे झाली आज! पण अजूनही ती आठवण… ती कळ शांत होत नाही… टीव्हीवरील न्यूज पाहून हात-पाय लटपटले माझे… ताबडतोब मामाला फोन लावला… तो उचलेना म्हणून मामीचा नंबर डायल केला… ती बिचारी तिच्या घरगुती कामात मग्न! तिला कशाचा सूतराम पत्ता नाही… “मामी… अगं श्रेयस कुठाय?” “सकाळीच गेलाय तो आज. लवकर जायचे होते त्याला… आज फॉरेन डेलिगेट्स यायचे होते म्हणे व्हिजिटसाठी…” ती निवांतपणे उत्तर देत होती!… आणि तिला कसं सांगू हे मला कळत नव्हतं.. आमचा श्रेयस… लहानपणापासून शेफ होण्याचे स्वप्न त्याचे… आणि त्यासाठी खूप मेहनतही घेतली होती त्याने… सर्वसामान्य मध्यमवर्गात जन्माला आला…
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर आपल्याकडं अनेकदा लोक अशी चर्चा करतात की ‘डॉक्टर’ म्हणजे जणू एक वेगळीच स्पिशिज आहे… ते कधी आजारी पडतच नाही किंवा औषधोपचार म्हणजे पेशंटवर प्रयोगच वगैरे वगैरे.. पूर्वी लोकं खिळा टोचला तरी मरायचे आणि डास चावला तरीही! पण अनेकांच्या अथक प्रयत्नातून, वैद्यकशास्राच्या प्रगतीमुळं मानव समूह तुलनेत कितीतरी अधिक सुरक्षित झालाय. आज अशाच एका धाडसी डॉक्टरची गोष्ट सांगतो… ऐंशीच्या दशकात अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या वेटिंगरूममध्ये पोटदुखीचे पेशंट मोठ्या प्रमाणात असायचे. जठराला अल्सररूपी जखम झालेली असायची, त्यामुळं काही खाल्लं तरी पोट दुखायचं आणि उपाशी राहिलं तरी पोट दुखायचं. वेदनाशामक (Painkillers) तरी किती खायचे? डॉक्टर मंडळींनी या अल्सरचं नामकरण ‘स्ट्रेस…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
