Author: Team Avaantar

डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ मानवी शरीरात घडणाऱ्या जैविक प्रक्रियांपैकी पचनक्रिया ही सर्वात सूक्ष्म, परंतु अत्यंत महत्त्वाची असते. आपण जे अन्न खातो त्यातून शरीराला ऊर्जा, पोषकद्रव्ये आणि वाढीसाठी आवश्यक घटक मिळवण्याचे काम ही प्रक्रिया अखंडपणे पार पाडते. खाण्यानंतर पचनाची प्रक्रिया आपल्या तोंडापासून सुरू होते. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा आपल्या तोंडातील लाळ अन्नासोबत मिसळते. लाळेमध्ये काही एन्जाईम्स असतात जे अन्नातील कार्बोहायड्रेटचे विघटन सुरू करून पचनाची प्रक्रिया सुरू करतात. तोंडातील चवीची अनुभूती देखील पचनास मदत करते, कारण चव ओळखल्यानंतर शरीरात पचनासाठी आवश्यक रसायने तयार होतात. अन्न जितकं व्यवस्थित चावले जाते, तितकं पुढील अवयवांचा अन्न पचवण्याचा ताण कमी होतो आणि म्हणून जास्त…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे… हेही वाचा – Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

अजित गोगटे पुण्यातील एका इसमाने 27 वर्षांपूर्वी केलेल्या, परंतु कायद्याच्या दृष्टीने सिद्ध होऊ न शकलेल्या पहिल्या लग्नाचे गूढ कथानक आज मी सांगणार आहे. पहिल्या लग्नाची पत्नी हयात असूनही आणि तिला रीतसर घटस्फोट न देता आणखी एका स्त्रीशी फसवणुकीने विवाह करणे हे भारतीय दंड विधांनाच्या (Indian Penal Code) 494 आणि 495 या कलमान्वये गुन्हे आहेत. त्यासाठी अनुक्रमे सात आणि 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. या गुन्ह्यांसाठी या इसमाविरुद्ध दाखल खटल्याने या कथानकाची सुरुवात होते आणि अपिलात हायकोर्टाने त्याला निर्दोष सोडण्यात सांगता होते. या कथानकास गूढ म्हणण्याचे कारण असे की, त्यात दोन समांतर शक्यता तुल्यबळ संभाव्यतेने दिसतात. एक म्हणजे, दुसरे लग्न करण्याआधी…

Read More

माधवी जोशी माहुलकर हिवाळा सुरू झाल्यावर हिरव्यागार आणि ताज्या भाज्या यायला सुरुवात झाली की, घराघरातील गृहिणींना या भाज्यांपासून किती पदार्थ करावे आणि किती नको असे होऊन जात. याच सीझनमधे तुरीच्या शेंगा, पोपटीच्या शेंगा, हुरडा, हरभरा असे कितीतरी फ्रेश प्रकार उपलब्ध असतात. हे पदार्थ असे आहेत की, जेवताना तोंडी लावणे म्हणून खा किंवा दुपारच्या वेळेस खा… कसेही आणि कोणत्याही वेळेस खाल्ले तरी चालतात. अशा पदार्थांचे सेवन करण्याची कोणतीही एक ठराविक वेळ नसते. तुरीचे तुपाच्या फोडणीतील दाणे आणि वाणीचा हुरडा (ज्वारीचे कोवळे, हिरवे दाणे) थंडीच्या दिवसांत दुपारी चहा न घेता एखादी मुव्ही किंवा सीरियल पहाताना टाइमपास म्हणून खाणे छान वाटते. तुरीचे तुपातील…

Read More

गजानन देवधर स्कॉटलंडच्या हायलंड भागातील Cairngorms National Park मध्ये वसलेलं न्यूटनमोर हे छोटंसं पण मोहक खेडं आम्ही 2015 साली पाहिलं. आम्ही दोघं, सोबत माझा धाकटा भाऊ दीपक आणि भावजय ज्योती, चौघांनी मिळून या गावात दोन दिवस घालवले. दुपारी साधारण 12 वाजता आम्ही एडिंबरोहून कारने न्यूटनमोरला पोहोचलो. स्कॉटलंडच्या केंद्रस्थानी असलेलं जेमतेम हजार लोकवस्तीचं हे गाव. तिथं राहण्यासाठी निवडलेला आमचा Eagle’s View हा होम स्टे अगदी गावाच्या वेशीजवळच होता. Eagle’s View हा छोटेखानी बंगला अजूनही आमच्या छान लक्षात आहे, तो त्याच्या लाकडी सजावट, आजूबाजूचं शांत वातावरण आणि उबदार आदरातिथ्य यामुळे! प्रवासाची सुरुवातच मनात आपलेपणाची भावना मनात निर्माण झाली. दुपारनंतर बाहेर पडून, Eagle’s…

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर काय हे मन… मन… ‘मन म्हणजे फक्त डोक्यातील गुंतागुंतीचा गोंधळ आहे. खरं विज्ञान हे फक्त दिसणारं आणि मोजता येणारं असावं… आणि माणसात जे दिसतं-अनुभवता येतं ते म्हणजे वर्तन!’ तो येता-जाता नेहमी हे वाक्य बोलत असे… तो म्हणजे एकेकाळी अमेरिकेत एक प्रचंड हुशार, पण तितकाच हट्टी असलेला एक मानसशास्त्रज्ञ! याचं गुपित कदाचित त्याच्या बालपणात दडलं होतं; फक्त 13 वर्षांचा असताना त्याच्या बाबानं कुटुंब सोडून दिलं, यामुळं तो आयुष्यभर नात्यांबद्दल थोडासा कठोर आणि थंड राहिला… बहुदा म्हणूनच त्याच्या मानसशास्त्रात, मनोविश्लेषणात भावभावनांना फारसं स्थान नाही; महत्त्वाचं आहे ते फक्त वर्तन! त्याची आई अतिशय ‘धार्मिक’ होती आणि आपल्या मुलानं पाद्री बनून…

Read More

कामिनी व्यवहारे भारतात सर्वत्र सुरणाची भाजी केली जाते. सुरणाच्या औषधी गुणांमुळे ‘सर्वेषा कन्दशाकाना सुरण: श्रेष्ठ: उच्चते।’असे भावप्रकाशात म्हटले आहे. याचा अर्थ सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरण श्रेष्ठ आहे. त्याची ‘कन्दनायक’ अशी सुद्धा ओळख आहे. सुरणात अ, ब तसेच क ही जीवनसत्त्वे आहेत. त्याच्या कंदाची आणि पानांची भाजी तसेच काप-कटलेटस सुद्धा करतात. सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. त्याच्या कंदात कॅल्शियम ऑक्झॅलेट असल्याने खाज येते. हा खाजरेपणा घालविण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात किंवा उकडतात. पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी साहित्य तयारीसाठी लागणारा वेळ – 20 मिनिटे शिजण्यासाठी लागणारा वेळ – 20 मिनिटे एकूण…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझ्या आयुष्यात एक बाई आली, ‘मोठा मम्मी’! थोडंस वेगळं नाव. एका मराठी सिनेमाचं शूट करत होते… नगर जिल्ह्यातील एका खेडे गावात. एकंदरीत सगळ प्रकरण ‘धन्यवाद’ होतं. नावाजलेले दिग्दर्शक असूनही खूप वाईट पद्धतीने काम चाललेलं. बरं, प्रोड्युसरची वांग्याची शेती होती. त्याने हॉटेलवर पोतभर वांगी आणून ठेवली होती. सकाळ, संध्याकाळी फक्त वांग्याची भाजी! चला, मला वांगी आवडतातच. पण तिथला आचारी म्हणजे वांग्याचं ‘होळकं’ बनवायचा. ते तिखट जेवण मी अजिबात खाऊ शकत नव्हते… दुसर तिथे काहीच मिळत नव्हतं! तिथे मुंबईहून एक थोड्या वयस्कर बाई आल्या होत्या… उंच, धिप्पाड, गोऱ्यापान, सुंदर आणि हसतमुख. अर्थात, मी…

Read More

दिलीप कजगांवकर मागच्याच आठवड्यात आबासाहेब आणि आईंच्या लग्नाचा 51वा वाढदिवस राज आणि नेहाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दुसऱ्या दिवशी नेहा आणि तिची दोन्ही मुले, नेहाच्या माहेरी गेली. राजने आई-बाबांना मॉलमध्ये नेले, त्यांच्यासाठी कपडे, बुट, चपला, चष्मा एवढेच काय अगदी टुथब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण… मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले. एकंदरीत दिवस खूपच छान गेला. “राज किती खर्च करतोस आमच्यावर?” न राहवून आई-बाबांनी विचारले. “दोन दिवस आपल्याला पाचगणी-महाबळेश्वरला जायचेय आणि त्यानंतर साताऱ्याला…” राजने त्याचा प्लॅन आई-बाबांना सांगितला. पुढील दोन दिवस राज आणि आई-बाबा पाचगणी-महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न आईने…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. येत्या 19 डिसेंबर 2025 ला माझा सिनेमा रीलीज होतोय, ‘आशा’… आशा रुग्णसेविकांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमा खूप छान झालाय. त्याचा प्रत्यय पण आलाय. हा चित्रपट महाराष्ट्र राज्य पुरस्काराचा मानकरी ठरलाय, तेही चार पुरस्कारांचा… उत्कृष्ट सिनेमा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि उत्कृष्ट अभिनेत्री! देश-विदेशातल्या चित्रपट महोत्सवांमध्ये या सिनेमाने धम्माल उडवली. थिएटरमध्ये जाऊन बघा बरं हा सिनेमा सगळ्यांनी! Enjoy करा… तर, तुम्ही ओळखलं असेलच की, आजचा लेख ‘आशा’ सिनेमाशी जोडलेला आहे. भर नवरात्रीमध्ये जळगाव-धुळ्यामध्ये आम्ही सिनेमाच शूटिंग करत होतो. रिंकू राजगुरू, खरंतर फार लहान वयात उगवलेली चांदणी (स्टार). बरेचदा अशी…

Read More