Author: Team Avaantar

दिलीप कजगांवकर “आई, आज मला शाळेतून घरी यायला उशीर होईल कारण, आज आमच्या गणिताच्या सरांचा निरोप समारंभ आहे…” अनेक मुला-मुलींनी त्यांच्या आईला हेच सांगितले. संस्थेच्या अध्यक्षांनी सरांचा सत्कार करताना सांगितले की, “आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आपणा सर्वांच्या आवडत्या गणिताच्या सरांचा निवृत्तीचा दिवस. गेली अनेक वर्षे सरांनी आपल्या संस्थेच्या विविध शाळांमध्ये गणित हा विषय शिकविला. गणित हा विषय तसा शिकायला आणि शिकवायला अवघड, पण सरांनी हा विषय अतिशय रंजक आणि सोप्या पद्धतीने शिकविला. त्यामुळेच आपल्या शाळेतील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळविलेत.” सत्काराला उत्तर देताना सरांनी जे सांगितले ते अविश्वसनीय होते. सरांनी ग्रॅज्युएशनलाच नव्हे तर मॅट्रिकला सुद्धा…

Read More

आराधना जोशी चार दिवसांच्या सलग सुट्टीनंतर परत ऑफिसला जाणं अर्णवच्या खरंतर जीवावरच आलं होतं. त्यातच गोव्यातील एका लग्नाला उपस्थिती लावून मुंबईत घरी परतायला पहाटेचे दोन वाजले होते. त्यामुळे “आजही सुट्टी टाकावी आणि झोप पूर्ण करावी का? त्यासाठी बॉसला कारण काय सांगायचं?” असे प्रश्न अर्धवट झोपेत असलेल्या अर्णवच्या मनात सुरू होते. तेवढ्यात गॅलरीतून बेडरूममध्ये येत सागरिका म्हणाली, “अर्णव अरे, सोसायटीत काहीतरी गडबड झाली आहे. सोसायटीच्या गेटवर बरेचजण जमले आहेत. जरा बघ नं काय झालं आहे ते.” हे ऐकून अर्णवने आधी मोबाईलवर सोसायटीच्या ग्रुपवर काही कोणी पोस्ट केलं आहे का, ते अर्धवट झोपेतच चेक केलं. तिथे कोणतीही पोस्ट नव्हती. “नसेल गं काही…

Read More

डॉ. किशोर महाबळ प्रत्येक विद्यार्थ्यातील बुद्धिमत्तेचा प्रकार ओळखणे आणि त्याबद्दल त्या विद्यार्थ्याला सांगणे, हे महत्त्वाचे असले तरीही तेवढेच पुरेसे नसते. बुद्धिमत्ता ही निसर्गदत्त असते. मात्र, बुद्धिमत्तेचा कधीच आपोआप विकास होत नाही. वर्षानुवर्षे सातत्याने, चिकाटीने, निष्ठापूर्वक, ज्ञान मिळवून, अनुभव घेऊन, प्रयोग करून, वाचन, चिंतन, मनन करून, अनुभवसंपन्न बुद्धिमान व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन आणि वेळप्रसंगी स्वयंअध्ययन करून बुद्धिमत्तेचा विकास करता येतो. हा विकास घडवून आणण्यात पालक, शिक्षक, शाळा किंवा मार्गदर्शक हे एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच मदत करू शकतात. त्यानंतरचा विकास मात्र पूर्णतः स्वतःचे प्रयत्न, स्वयंप्रेरणा आणि तपश्चर्येवर अवलंबून असतो, हे सर्व विद्यार्थ्याना समजावून सांगणे आणि पटवून देणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे आपल्या प्रगतीसाठी सतत…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे बनविण्याच्या टिप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : आज साऊथ इंडियन डिशचा बेत आहे तर… हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर ओपीडीत एक महाशय स्वत:हूनच ‘मद्यपान बंद करण्याचं औषध’ घ्यायला आले होते. 99 टक्के ते सोडतीलही! पूर्वी हे इतकं सहजसोपं नव्हतं, कारण एक काळ होता जेव्हा मद्यपानाला जगभरात केवळ ‘नैतिक पतन’ किंवा ‘शाही शौक’ या दोनच दृष्टिकोनातून बघितलं जायचं. 19व्या शतकात स्वीडनच्या एका गावातल्या व्यक्तीने वैद्यकीय जगताला हादरवून टाकणारी संकल्पना मांडली, ती म्हणजे ‘अल्कोहोलिझम’ (Alcoholism)! हा शब्द आज आपल्या सर्वांना चिरपरिचित असला तरी, तो रुजवायला त्याचं अख्खं आयुष्य गेलं.. त्याचा जन्म 1807 साली स्वीडनच्या मेडेलपॅड प्रांतातील तोर्प नामक एका छोट्याशा गावात झाला; त्याचे बाबा योहान धर्मगुरू होते तर, आई कॅथरिना मॅग्डालेना ही एक विदुषी होती. ग्रामीण भागात लहानाचं…

Read More

सायली कान्हेरे साहित्य भज्यांसाठी साहित्य पुरवठा संख्या – 8 ते 10 व्यक्तींसाठी तयारीसाठी लागणार वेळ –  सगळ्या शेंगा सोलणे; वांग्याच्या फोडी करणे; कंद, बटाटे चौकोनी तुकडे करणे; कांदा बारीक चिरून घेणे; नारळ खोवून घेणे; लसूण पात, मेथी निवडणे; मेथी बारीक चिरून घेणे – दीड ते दोन तास पाककृती करण्यासाठी – 30 मिनिटे एकूण वेळ – दोन ते अडीच तास हेही वाचा – Recipe : एकदम टेस्टी कुळीथ सूप मेथी भजीची कृती भाजीची कृती हेही वाचा – Recipe : लज्जतदार टोमॅटो सूप विशेष टीप तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883…

Read More

पराग गोडबोले ‘धुरंधर’ चित्रपटाची खूप प्रशंसा ऐकून, नाताळच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी सव्वानऊच्या खेळाला पोहोचलो… डोळे चोळत. सुट्टीचा दिवस आहे… घरापासून मोजून पाच मिनिटांवर असलेल्या चित्रपटगृहाच्या खिडकीवर तिकीट मिळणार नाही, या आशंकेने ग्रासलेल्या बायकोने, तब्बल साठ रुपये जास्त मोजून ‘बुक माय शो’वरून तिकीटं काढायला लावली. गेल्यावर बघितलं तर, तिकीट खिडकीवर कोणीही नव्हतं आणि आत तर अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या! माझ्या मोजूनमापून कोकणस्थ मनाला साठ रुपये हकनाक गेल्याचं दु:ख झालं, पण खूप सुंदर चित्रपट बघायला आलेलो मी, ते गिळलं. नशीब आम्ही दोघेच गेलो होतो. लेक असती तर, अडीच-तीनशे रुपयांचा, मक्याच्या लाह्यांचा आणखी भुर्दंड बसला असता, तो टळला! जाहिराती, नव्या येऊ घातलेल्या…

Read More

कोबी डोलमासाठी साहित्य कृती हेही वाचा – Recipe : कोकमाचे सार आणि वाफाळता भात… टीप संत्र्याच्या भातासाठी साहित्य हेही वाचा – Recipe : खमंग कोबी, मटार वडी (पानगा) कृती (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

अजित गोगटे भारतात प्रवासी आणि मालाची रेल्वेने वाहतूक करण्याचे मक्तेदारी अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. सरकारनेच 1989 मध्ये केलेल्या रेल्वे कायद्यात प्रवासी आणि मालाची सुरक्षित वाहतूक कशी केली जाईल, याची कायदेशीर चौकट ठरवून सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी स्वत: स्वीकारली आहे. मात्र, भारतात धावणारी प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडी या चौकटीचे उल्लंघन करून चालविली जात असल्याने भारतीय रेल्वे हा सरकारमान्य मृत्यूचा सापळा आहे, असेच म्हणावे लागेल. रेल्वे कायद्यानुसार प्रत्येक प्रवासी गाडीच्या प्रत्येक डब्याची कमाल प्रवासी क्षमता किती असेल आणि मालगाडीच्या प्रत्येक वाघिणीची माल भरण्याची कमाल क्षमता किती असेल हे ठरविण्याचे बंधन आहे. रेल्वे प्रशासनाला ही कमाल क्षमता केंद्र सरकारकडून मंजूर करून घ्यावी लागते. प्रवाशांची आणि…

Read More

आराधना जोशी कोकमाच्या सारासाठी साहित्य भातासाठी साहित्य पुरवठा संख्या – दोन व्यक्तींसाठी हेही वाचा – Recipe : हिरवे टोमॅटो आणि दाण्याची भाजी तयारीसाठी लागणार वेळ – साधारणपणे 20 मिनिटे पाककृती करण्यासाठी – 40 मिनिटे एकूण वेळ – एक तास कृती भाताची पेज आणि वाफाळता भात कोकमाचे सार हेही वाचा – Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More