Author: Team Avaantar

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आज 26 जानेवारी. आपला 77 वा प्रजासत्ताक दिन. आमच्या कॉम्प्लेक्समधील रहिवाशी मोठ्या प्रमाणावर आणि बहुसंख्येने उपस्थित राहून साजरा केला. प्रथम झेंडावंदन… तालासुरात जन गण मन… देशाचा जयघोष… वंदे मातरम्… अगदी दणाणून सोडला कॉम्प्लेक्स… मग देशभक्तीपर गाणी झाली… लहानग्यांचे कार्यक्रम… नाच, गाणी, भाषणं झाली. साधारण अडीच वर्षांच्या एका मुलीने पुन्हा एकदा जन गण मन म्हणायला सुरुवात केली. वयाच्या मानाने आत्मविश्वास खूप छान होता… भाषा, शब्द स्वच्छ आणि खणखणीत होते. न चुकता, न लाजता, न घाबरता छान गायली चिमुरडी जन गण मन… आणि मला या आठवड्याचा विषय सापडला! खरंतर भाषेतली, शब्दांची चूक काढणे…

Read More

माधवी जोशी माहुलकर मला आठवत त्याप्रमाणे 1980-90च्या काळात लग्न समारंभात जिलेबी हा पदार्थ नव्याने रुजू झाला होता. नव्याने मी याकरता म्हणते आहे, कारण 1960 ते 70मध्ये जिलेबी हा पदार्थ बहुतेक लग्नकार्यांमध्ये प्रमुख पाहुणा असेलही, परंतु क्वचितच! त्या काळात जी लग्नकार्य व्हायची त्यामध्ये बुंदीचा लाडू, रवा-बेसनाचे लाडू हे गोडाचे पदार्थ म्हणून पंगतीमध्ये दिसायचे. नुसतेच दिसायचे नाहीत तर, पाहुण्यांमध्ये स्पर्धा लावून हे लाडू खाल्ले जायचे. त्या काळात डायबेटीसचे एवढे प्रस्थ कदाचित नव्हते. एकेका वेळेस वीस-वीस लाडू खाणारे लोक होते. ही स्पर्धा जिंकणाऱ्याला बक्षीसही दिलं जायचं! आश्चर्य वाटलं ना ऐकून? असो, मूळ विषय हा आहे की, लग्न समारंभात जेव्हापासून जिलेबीने आपले ठाण मांडायला…

Read More

डॉ. किशोर महाबळ माहिती संकलन हा ज्ञानप्राप्तीमधील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कोणत्याही विषयाचे अध्ययन उत्तम होण्यासाठी त्या विषयाबद्दल माहिती मिळविणे अतिशय गरजेचे असते. याच माहितीचे नंतर वर्गीकरण, विश्लेषण करून निष्कर्ष काढले जातात. याच असंख्य निष्कर्षांमधून त्या विषयाचा विकास होत जातो. माहिती जेवढी अचूक तेवढी ती उपयुक्त ठरते. म्हणून, अचूक माहिती गोळा करणे अत्यावश्यक ठरते. माहिती कशी गोळा करायची, ती कशी नोंदवायची, याचे शास्त्र विकसित झाले आहे. माहिती संकलन शास्त्राचे काही प्राथमिक धडे शालेय स्तरावरच सर्व विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात. कोणत्याही विषयाची अचूक माहिती ही त्या विषयाचे विविध भाग-उपविभाग समजून घेण्यास उपयुक्त ठरते. माहिती जितकी जास्त मिळेल आणि अचूकतेने नोंदविली…

Read More

यश:श्री हत्ती या प्राण्याबद्दलचे कुतूहल कायमच अबालवृद्धांना असते. त्यामुळेच सर्कस असो वा (हत्ती असलेला) चित्रपट सर्वांचे लक्ष हत्तीवरच असते आणि चर्चाही हत्तीचीच होते. दिसायला जरी अजस्त्र असला तरी, त्याला माणसाळवले जातं. जंगली हत्ती माणसाळवता येतो आणि त्याला पाळीव बनविण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो. त्यांना माणसाळवताना हुशार आणि तज्ज्ञ माहुतांना बरेच प्रयत्न करावे लागतात. हे हत्ती एकदा माणसाळले की, ते त्या माहुताच्या सर्व आज्ञा पाळतात. हळूहळू माहुतही त्याला पोटच्या पोराप्रमाणे जपतो. अनेक वर्षे पालनपोषण केलेला, प्रेमाने खाऊ घातलेला हत्ती हरवला किंवा मृत झाला, तर त्याच्या माहुताला खूप दुःख होते. हत्तीला जिथे बांधून ठेवले जाते, ती जागा तसेच दोरखंड पाहून त्याला अतिव…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी, खुसखुशीत कटलेट अन् पडवळाची कोशिंबीर करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड… तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. किशोर महाबळ सध्याच्या प्रचलित शिक्षणपद्धतीतून आधुनिक शास्त्रे आणि विज्ञानाचे शिक्षण न घेतलेल्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील निरक्षर मुलामुलींना ते मागासलेले आहेत, असे म्हटले जाते. आधुनिक शिक्षण घेतल्याशिवाय या आदिवासी आणि ग्रामीण भागातील निरक्षर मुलामुलींना काहीच भविष्य नाही, असेही बोलले जाते. आधुनिक शिक्षणाचे महत्त्व कोणीच नाकारणार नाही, पण याचा अर्थ असा नव्हे की, आदिवासी तसेच ग्रामीण भागातील या निरक्षर मुलामुलींना काहीच येत नाही! काही वर्षांपूर्वी त्सुनामीमुळे अंदमान निकोबारमध्ये असंख्य व्यक्ती मृत्युमुखी पडल्या, पण आधुनिक समाजाच्या दृष्टीने निरक्षर असलेले आदिवासी वाचले, कारण ते त्सुनामी येण्यापूर्वीच उंच पहाडावर जाउन थांबले होते! गेली शेकडो वर्षे निसर्गाच्या सतत सान्निध्यात राहून साधी कंदमुळे, फळे खाऊन…

Read More

कामिनी व्यवहारे उंधियूचे साहित्य मेथी मुठियाचे साहित्य वाटण मसाला साहित्य मेथी मुठियांची कृती वाटण मसाला कृती उंधियूची कृती एकूण कालावधी – एक तास टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

स्वयंपाक बनवताना गृहिणी आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टिप्स देत आहोत. पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना… हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… ‘माणूस एक माती’ नावाच्या एका मराठी सिनेमात मी काम केलं. त्यात सिद्धार्थ जाधवने माझ्या मुलाची भूमिका केली होती. गणेश यादव, स्वप्निल राजशेखर, रुचिता जाधव आणि बरेच मातब्बर कलाकार होते. साधीच कथा होती. सिनेमा खूप छान झाला होता. फार चालला नाही, पण ज्यांनी ज्यांनी बघितला त्या प्रत्येकाचं मत होतं की, सिनेमा छान झालाय. माझं काम पण मस्त झालंय. ऐकून एकदम खूश व्हायला होत होतं. सिनेमा कौटुंबिक होता. सिनेमागृहात रडारड होतच होती… सिनेमाचा प्रीमियर होता. सगळी टीम, पाहुणे, मोठ-मोठे कलाकार हजर होते. त्यात एक नुकताच प्रसिद्ध झालेला पब्लिकचा लाडका ॲक्टर सपत्नीक हजर होता.…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये कारल्याची भाजी, मसालेदार भाज्या, कोशिंबीर, मिरचीचा ठेचा करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना… हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More