Author: Team Avaantar

रेवती निलेश पांडे अगदी मागच्याच आठवड्यातली गोष्ट. माझी जवळची मैत्रीण स्नेहा दुसऱ्यांदा आत्या झाली. हॉस्पिटल माझ्या घराच्या अगदी जवळच असल्यामुळे, त्या इवल्याशा परीला बघण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी तडक तिथे पोहोचले… मी रूममध्ये शिरले, तेव्हा स्नेहा अगदी कौतुकाने आपल्या भाचीला मांडीवर घेऊन बसली होती. मला बघताच ती आनंदाने ओरडली, “अग बघ बघ, ‘डिट्टो’ माझ्यावर गेली आहे! डोळे, नाक… अगदी माझ्यासारखेच आहेत ना गं?” मी हसून म्हटलं, “अगं, आत्ता कुठे दोन-तीन दिवसांचं बाळ आहे हे, आणि तुला इतक्यात कळलंही, ही कोणासारखी दिसते ते?” तितक्यात बाळाची आजी मागून उत्साहाने म्हणाली, “अगं, तिची आई सुद्धा लहानपणी हुबेहूब अशीच दिसायची!” आणि मग…

Read More

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी आहे त्याच सामुग्रीद्वारे काही नवनवीन प्रयोग केले जातात… याच टिप्स इतर महिलांनाही उपयोगी पडतात. ‘फूड कॉर्नर’मध्ये दह्याची कोशिंबीर, वांग्याचे भरीत आणि टोमॅटो प्युरी करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना… हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर डोकं दुखतं म्हणून सकाळपासून पाच गोळ्या खाल्लेला पेशंट आता इंजेक्शन घ्यायला ओपीडीत आला होता. कुलूपाला पन्नास चाव्या लावून उपयोग नसतो, ते त्याच्या एकाच चावीनं उघडतं, तद्वतच, दुखण्याच्या कारणावर उपचार केले की, दुखणं आपोआप थांबतं. आजच्या काळात लोक इतके घोळ घालतात, जेव्हा औषधशास्रच पाळण्यात होतं तेव्हा किती, कशी औषधं खात असतील लोक? मला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेत टॉक्सिकॉलॉजीच्या प्रॅक्टिकलला पाच गुणांना विचारल्या जाणाऱ्या ‘त्याची’ आठवण झाली… पंधराव्या शतकात तर वैद्यकशास्रात अद्यापही उजाडायचं बाकी होतं; रोगांचं मूळ दैवी कोपात आहे असं सगळे मानायचे… जादूगार, भूतबाधा, देवाचा कोप या त्रिसूत्रीनं वैद्यकशास्त्र वेढलेलं होतं… अशातच एका रात्री स्विस आल्प्सच्या पर्वतरांगांमध्ये एका लहानश्या…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना । पंचप्राणा मना । पाढाऊ घेऊनी ॥212॥ बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली । वरी प्राणायामांची मांडिलीं । वाहातीं यंत्रें ॥213॥ तेथ उल्हाटशक्तीचेनि उजिवडे । मनपवनाचेनि सुरवाडें । सतरावियेचे पाणियांडे । बळियाविलें ॥214॥ तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली । विकारांची संपिली बोहली । इंद्रियें बांधोनि आणिलीं । हृदयाआंतु ॥215॥ तंव धारणावारू दाटिले । महाभूतांतें एकवटिलें । मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥216॥ तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचें निशाण वाजत । दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥217॥ पाठीं समाधिश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा । पट्टाभिषेकु…

Read More

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… ‘फूड कॉर्नर’मध्ये पालक किंवा मेथी पराठे तसेच कोबी, नवलकोल, दुधी भोपळ्याची थालिपीठ भाजी करण्यासंदर्भात दिलेल्या या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : कोबीची भाजी, मसालेभात, पालक-पनीर बनवताना हे करून पाहा… हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. किशोर महाबळ घराघरातील पालकांनी, मोठ्या माणसांनी मनावर घेतले तर लहान मुला-मुलींना वाचनाची आवड लावणे अगदी सोपे आहे. हे कसे साध्य करायचे याचा आता विचार करू… सर्वप्रथम घरातील सर्व पुस्तके, ग्रंथ, पाठ्यपुस्तके, शब्दकोश, वर्तमानपत्रांचे अंक यासारखे वाचनीय साहित्य घरात एका विशिष्ट ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवण्यास सुरुवात करावी. शोभेच्या वस्तू ठेवण्यासाठी घरात, भरपूर खर्च करून जशी सोय केली जाते, तशीच आणि शक्य असल्यास त्यापेक्षाही उत्तम सोय, वाचनीय साहित्य ठेवण्यासाठी केली जावी. यामुळे वाचनीय साहित्य हे शोभेच्या वस्तूंपेक्षाही जास्त मौल्यवान आणि महत्त्वाचे आहे, या बाबीचा मुलांवर संस्कार होईल. खाण्यापिण्यावर, चैनीच्या वस्तूंवर आपण जेवढा खर्च करतो, त्याच्या कमीतकमी एक टक्का खर्च हा वाचनीय पुस्तकांवर,…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा ऐसे माझेनि नामघोषें । नाहीं करिती विश्वाचीं दुःखें । अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥200॥ ते पाहांटेवीण पाहावित । अमृतेंवीण जीववित । योगेंवीण दावित । कैवल्य डोळां ॥201॥ परी राया रंका पाड धरूं । नेणती सानेया थोरां कडसणी करूं । एकसरें आंनदाचें आवारु । होत जगा ॥202॥ कहीं एकाधेनि वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें । ऐसें नामघोषगौरवें । धवळलें विश्व ॥203॥ तेजें सूर्य तैसे सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ । चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ।।204॥ मेघ उदार परी वोसरे । म्हणऊनि उपमेसी न पुरे । हे…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आपण कधी कधी खूप महत्त्वाचं काहीतरी करत असतो आणि त्यात काही ना काही कॉमेडी घडून जाते. नकळतपणे घडणाऱ्या अशा घटनांवर रडावं की हसावं, हेच कळत नाही. असाच एक किस्सा आहे. मी एक ऐतिहासिक सिनेमा करत होते. महाराज आणि दिवस गेलेली महाराणी यांना त्यांचं राज्य वाचवण्याकरिता विभक्त व्हावं लागतंय. राजाचा जीव राणी आणि होणाऱ्या बाळात गुंतलाय. राणी नवऱ्यापासून किती काळ दूर रहावं लागेल म्हणून कष्टी… हा खूप मोठा, अतिशय महत्त्वाचा सीन होता. त्या सीनमध्ये कलाकार मंडळी पण भरपूर होती. टेक्निकली कठीण होता सीन… अतिशय भावनिक, गंभीर अशा या सीनमधील राणीची वाक्य संपत…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता: । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥13॥ तरी जयांचिये चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जयां निजेलियांतें उपासी । वैराग्य गा ॥188॥ जयांचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्मु करी राणिवा । जयांचें मन ओलावा । विवेकासी ॥189॥ जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले । जे शांतीसि आले । पालव नवे ॥190॥ जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आंनदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले ॥191॥ जयां भक्तीची येतुली प्राप्ती । जे केवल्यातें परौतें सर म्हणती । जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ॥192॥ जे आघवांचि करणीं । लेइले…

Read More

संगीता भिडे पाणी म्हणजे जीवन, केवढा सार्थ आहे ना हा शब्द! पाण्याविना जीवन जगणे व्यर्थ आहे. ‘पाणी’ हा शब्द वाचताच डोळ्यासमोर उभं राहिलं ते माझं माहेरचं गाव – भुसावळ. अत्यंत कडक उन्हाळा आणि पाण्याचं दुर्भिक्ष. पोटापाण्याच्या व्यवसायामुळे वडिलांना भुसावळशिवाय पर्याय नव्हता. त्यात आम्ही पाठोपाठची तीन भावंडं. वास्तव्य आमचं एका चाळीत. चाळीच्या मागच्या भागात विहिरीत उन्हाळ्याखेरीज उदंड पाणी असायचं. पण ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ अशी अवस्था त्या विहिरीच्या पाण्याची. सबब पिण्याच्या पाण्याचा शोध सुरू झाला. फर्लांग- दीड फर्लांग अंतरावर एक गोड्या पाण्याची विहीर आढळली. मग ‘घट डोईवर, घट कमरेवर’ अशा आईच्या पाण्याच्या खेपा दररोज सुरू झाल्या. आम्ही अजाण वयाची…

Read More