Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
जी. भालचंद्र आज-काल आपल्यापैकी प्रत्येकाचा बँकेतील व्यवहारांशी संबंध येतो. आपल्यापैकी अनेकजण नेट बँकिंग, Appवर आधारित बँकिंग सेवा, यूपीआय पेमेंट इत्यादी सुविधांचा वापर करीत आहेत. तरीपण काही ना काही कारणासाठी आपल्याला बँकेच्या जवळील शाखेत जाण्याचा प्रसंग येतो. अशावेळी मला आलेल्या अनुभवाचे मजेदार किस्से मी सांगणार आहे. अनुभव एक हा अनुभव मला एका खासगी बँकेतील मुदत ठेव व्यवहाराबद्दल आलेला आहे. या बँकेत मी आणि माझ्या बायकोच्या नावाने मुदत ठेव करताना, अखेरच्या दिवसानंतर मुदत ठेव पुढील काही दिवसांसाठी परत रिन्यू करावी असा पर्याय दिला होता. जसा मुदत ठेवीचा अखेरचा दिवस जवळ येत होता तसं माझ्या लक्षात आलं की, ज्या कालावधीसाठी मुदत ठेव मी ठेवली आहे, त्या कालावधीकरिता व्याजाचा…
दिप्ती चौधरी जवळ-जवळ चोवीस तास प्रवास करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बंगलोरला पोहोचलो. पिंजऱ्यातून काढल्यावर लगेच आम्ही पळत बाहेर आलो. दूर उभे राहून आम्हाला आमच्या जागा पकडू दिल्या. कोणीही आमच्या जवळ यायचा प्रयत्न केला नाही. आम्ही थोडे सावरल्यावर थोडे खाणे, पाणी ठेवले. लिटर बॉक्स आधीच कोपऱ्यात होता. थोडावेळ आम्हाला एकटे सोडल्यावर आम्ही थोडे शांत झालो. थोड्या वेळाने आमची भीती कमी झाली आणि अर्धवट उघड्या दरवाजातून आम्ही बाहेर पडलो. एका खोलीत कपाटाचा जमिनीलगतचा खण रिकामा करून अर्धवट उघडा ठेवला होता. दनूने लगेच आत बस्तान बसवले. त्याला लपायला जागा मिळाल्याने सुरक्षित वाटत होते. तो गेला आत म्हणून मी पण थोडा वेळ बसून…
स्नेहल अ. गोखले भूतकाळातील काही अनुभव लिहून ठेवण्याचा विचार मनात तरळला. ‘आठवणी दाटतात धुके जसे पसरावे’ अशी अवस्था झाली आणि असंख्य आठवणींची रीघच लागली. पण काय काय म्हणून लिहायचं? मागे वळून पाहताना, आयुष्याच्या पटाचे बालपण, तारुण्य आणि आताचे वार्धक्य.. असे तीन भाग केले. आम्ही नारायण पेठेत श्री मोदी गणपतीपासून आत, भानुविलास आणि विजय टॉकीजच्या मधे, कॉमनवेल्थ कॉलनीत राहात होतो. शहरात असूनही नारळाची झाडे, नीरव शांतता, सात बंगले होते. आम्ही भाडेकरू होतो, पण शेजारी असणारी माणसे खूपच प्रेमळ आणि साधी होती. खास उल्लेख म्हणजे श्रुती मंगल कार्यालयाचे आपटे, गुप्ते, साळवेकर यांनी आमच्यावर खूप माया केली. कदाचित आई नसल्यामुळे अधिकच. मैत्रिणी आसपासच…
सुनील पानसरे भाग – 2 माझे पूर्वाश्रमीचे सहकारी सरदेसाई यांच्या विनंतीनुसार मी श्री. स्वामी (सरदेसाई यांचा वृद्ध मित्र) यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सरदेसाई यांनी सांगितल्याप्रमाणे स्वामी ज्या परिसरात राहात होते, त्या भागात मी आधी अनेक वेळा गेलो होतो, पण आज परिस्थिती थोडी वेगळी होती. मी जर एका वयोवृद्ध व्यक्तीबद्दल चौकशी करू लागलो तर, इथल्या लोकांना ते पचनी पडेल की नाही, याची मला कल्पना नव्हती. यात एक अशी भीती होती की, कोणाला तरी भलताच संशय यायचा! पण माझ्या या शोधाला यश आले. एका किराणा दुकानदारामुळे ते कुठे राहतात हे समजले. पण त्यांना मागील तीन-चार दिवसांत स्वामी दिसले नव्हते… काहीतरी वाईट घडलं…
मंदार अनंत पाटील 18 जुले 2024…. अखेर तो दिवस उजाडलाच… 18 वर्षांची प्रतीक्षा आज संपणार होती. हिथरो एअरपोर्टला पोहोचलो आणि विमान लँड झाले असे समजले. साधारणत: इमिग्रेशन आणि बाकी प्रोसेसला एक-दीड तास लागायची शक्यता होती, म्हणून तिथेच बाहेर बसकण मारली…आणि शांत पावलं टाकीत, अगदी विलेपार्ले मार्केटमध्ये फेरफटका मारून घरी परत येत असल्याच्या अविर्भावात आई आली! तिच्या चेहऱ्यावर तेच हसू… मी पाया पडल्यावर नेहेमीप्रमाणे हात जोडून आशीर्वाद दिला. पहिले काही क्षण तर आई खरंच आली आहे, यावर विश्वासच बसत नव्हता. पण हळूहळू ती पण रिलॅक्स झाली. आज लंडनमधली पहिली सकाळ झाली. आई. सवयीप्रमाणे लवकरच उठली. मी पण लवकरच जागा झालो. सकाळचा…
मनोज जोशी कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकीजा’ चित्रपट हा हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड म्हटले तर, ते गैर ठरणार नाही. हा चित्रपट कमाल अमरोही यांच्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. त्यामुळे त्यांनी जे जे उत्तम (त्या काळी) होते, ते उभे केले होते. या चित्रपटाच्या सेटपासून संगीतापर्यंत सर्वच भव्यदिव्य होते. अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट बनला. ‘पाकीजा’ चित्रपट बनायला तब्बल 15 वर्षं लागली. 17 जानेवारी 1957 रोजी या गाणी रेकॉर्ड करून कमाल अमरोही यांनी या चित्रपटाची सुरुवात केली होती. तर, प्रत्यक्षात हा चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित व्हायला 4 फेब्रुवारी 1972 ही तारीख उजाडली. तत्पूर्वी, 3 फेब्रुवारी 1972 रोजी प्रसिद्ध मराठा मंदिरमध्ये याचा भव्य प्रीमियर…
नमस्कार मी हर्षा गुप्ते. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेय. 3 मार्च 2000. रविवार होता. आज त्याला 25 वर्षं झाली. घरात कामाची लगबग सुरू होती. दुपारची वेळ आमची पाणी भरायची, जेवणाची. त्यात टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुरू होती. माझी मुलगी लक्ष्मी तीन वर्षांची आणि मुलगा अद्वैत 10 वर्षांचा. त्याच्या मित्राचा वाढदिवस होता. त्याला लवकर आवरून तिथे जायचं होतं… आणि लेकीला कार्टून बघायचं होतं. बाप-लेकीमध्ये भांडण सुरू होतं. बाबाला मॅच बघायची होती आणि हिला कार्टून. तेव्हा माझं म्हाडाचं घर होतं. छप्पर म्हणून सिमेंटचा पत्रा (asbestos) होता. एसीचे कूलिंग जाणवत नसल्याने आम्ही सिमेंटच्या पत्र्यावर लाल कौलं घातली होती. माझ्या शेजारी रीकन्स्ट्रक्टचं काम सुरू होतं.…
जयश्री महाबळ – ताम्हनकर 8 मार्च, जागतिक महिला दिन. महिलांसाठी विशेष दिवस. नुकताच तो सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या विशेष दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित केले गेले. तसे हे दरवर्षीचेच आहे. महिलांचा सन्मान, प्रेरणा, नेतृत्व – असे सकारात्मक शब्द वर्तमानपत्रात प्रकर्षाने झळकत असतात. त्याचबरोबर हिंसाचार, अत्याचार आणि महिलांची सुरक्षा असेही शब्द तितक्याच ताकदीने पुढे सरसावत असतात. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे कर्तृत्व आणि योगदानाला सलाम केला जातो, पण समाजातील काही विकृत आणि पाशवी वृत्तीमुळे महिलांची अवहेलना तसेच छळ आजही थांबलेला नाही. अशा परिस्थितीत दोन प्रश्न मनात नक्कीच डोकावतात. ते म्हणजे – महिलांचे सबलीकरण खरंच झाले आहे का? आणि महिला खरंच सुरक्षित आहेत…
मंदार अनंत पाटील साधारण 2006च्या सुमारास उच्च शिक्षणाकरीता लंडनला जायचा योग आला आणि साधारण 2007पर्यंत शिक्षण, नोकरी आणि यूकेमधील जीवन यामुळे फारसा वेळ मिळाला नाही, परत प्राणी सांभाळायला. पण 2008च्या सुमारास लंडनमध्ये बॅटरसी डॉग होम नावाची सेवाभावी संस्थेबाबत माहिती समजली. ही संस्था अनाथ आणी दुर्लक्षित प्राणी-पक्षी यांना सहारा देते आणि पुनर्वसन करते. तिथली उत्तम व्यवस्था, प्रत्येक प्राणी-पक्षीकरिता नेमलेले स्वयंसेवक, अतिशय कमालीची स्वच्छता आणि कामाचे नियोजन पाहता, आपणही काही हातभार लावावा, असे वाटले. मासिक डोनेशन भरून सुरुवात केली. मनाला एका मुक्या जिवाला मदत केल्याचे समाधान मिळत होते. नंतर यथावकाश 2019मध्ये प्रथमच पक्षी आणले गेले आणि हे माझे परदेशातले पहिले सखेसोबती झाले.…
आराधना जोशी माझी लेक आता मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला आहे. परीक्षा आटोपल्या आहेत आणि कॉलेजच्या मैत्रिणींसोबत ती उत्तर भारतात ट्रिपला गेली आहे. वर्षं कशी सरसर गेली हे कळलंच नाही. आता घरात गप्पा मारताना तिचे काही किस्से आठवले… प्रसंग पहिला टीव्हीवर डान्स रिअॅलिटी शो बघणं सुरू होतं. ब्रेकमध्ये कामं आटोपायच्या मागे मी होते. तेवढ्यात आमच्या कन्यका धुसफुसत स्वयंपाकघरात आल्या. मिनीटभरापूर्वी व्यवस्थित असणाऱ्या तिला अचानक काय झालं, ते मलाच कळेना. आधी वाटलं मोबाइलवर कोणत्या तरी मैत्रिणीशी चॅटिंग करताना काहीतरी वाद झाला असेल. पण तरी चौकशी केली की, नक्की झालं काय? कन्यका फणकारून म्हणाली, “या जाहिरातवाल्यांना आणि त्यातल्या कलाकारांना काही कॉमन सेन्सच नाहीये. काहीही…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
