Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आमलकी एकादशी मराठी भाषा गौरव दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस व्यावसायिकांसाठी शुभ असेल, एखादा महत्त्वाचा करार होऊ शकतो. नोकरीच्या क्षेत्रात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. घराच्या देखभालीसाठी किंवा दुरुस्तीसाठी मोठा खर्च होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आज सरकारकडून विशेष सन्मान मिळू शकेल. तुमच्या सामाजिक कार्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. वृषभ – कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होत आहे, ज्यामुळे सहजतेने काम करू शकाल. व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसून येतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासह धार्मिक सहलीला जाऊ शकता. न्यायालयीन प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी…
श्रीकृष्ण काळकर आजची तरुणाई करिअर आणि त्यातून मिळणारा पैसा, याच्या मागे लागली आहे, असे चित्र आहे. करिअर म्हणजे अनेक मोठया पदव्या आणि त्या ‘भाड्याने’ देऊन मिळणारा लठ्ठ पगार! तो पगार मिळवण्यासाठी अर्ध आयुष्य बिनालग्नाचे व्यतित होते! त्याचसंदर्भातील या कथा – बबड्या अजून लहान आहे! कोणत्याही महानगरातील मोठया शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती. त्रिकोणी कुटुंब. आई वडील या दोघांनाही लठ्ठ पगार. त्या दोघांच्या इच्छा-आकांक्षा केंद्रित झाल्यात बबड्यावर. त्यांच्याकडे दरमहा इंग्रजी दैनिके, पाक्षिके, मासिके आणि बबडयासाठी कॉमिक्स भरपूर येत असत. रद्दीवाला प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडून येऊन रद्दी गोळा करून जायचा. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा असायचा. बबड्याच्या वयाचा. तो पण वडिलांना रद्दीचा गठ्ठा उचलायला मदत करायचा.…
ओल्या हरभऱ्याची पोळी साहित्य कृती टिप हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी… मुळ्याची पोळी साहित्य हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो कृती टिप (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
मानसी देशपांडे आई-वडील होणं खरंच सोपं असतं का हो? तसं म्हटलं तर, स्त्री असो किंवा पुरुष, दोघांच्याही खांद्यावर जी महत्त्वाची जबाबदारी येते, ती म्हणजे बाळावर चांगले संस्कार करणं. आपण बघतो, आई-वडिलांना कधीच ताणविरहित झोप लागत नाही. कुठलं ना कुठलं टेन्शन हे त्यांना असतंच! प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात, “व्यथांची यादी ही न संपणारी असते…” खरं आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे नवरा-बायको दोघेही नोकरी करतात. राब राब राबतात. पण घरातल्या परिस्थितीची जाणीव ही सर्वच मुलांना असते, असं होत नाही. मला मान्य आहे, मुलांच्या सुद्धा काही आवडीनिवडी असतात… पण, जेव्हा तुमच्या घरात आर्थिक समस्या असते, त्यावेळी इच्छा नसली तरी, काही गोष्टींना मुरड…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा मज येता पैं सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा । स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥315॥ स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे । पापात्मकें पापें नरका जाइजे । मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥316॥ आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दूरी होय पांडुसुता । तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ॥317॥ परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरि ते दीक्षित । यजुनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥318॥ मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे । तेणें लाधलेनि सोरसें । स्वर्गा येती ॥319॥ जेथ अमरत्व हेंचि सिंहासन ।…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या कठोर परिश्रमामुळे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. नवीन काम मिळण्याचीही दाट शक्यता आहे. परदेशी दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे, जो फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःला हायड्रेट ठेवा. वृषभ – नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील. एखाद्या कामामुळे तुमची प्रशंसा होऊ शकते. व्यवसायात उत्पन्न वाढवण्यासाठी आणि नोकरीत आपले काम समर्पणाने पूर्ण केले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला असेल. उन्हात फिरल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. मिथुन -…
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर आपल्या देशात पालकांकडून पाल्यास धाक दाखवण्यासाठी जसा डॅाक्टरांचा वापर केला जातो तद्वतच आपल्या पार्टनरला एखादा मेसेज कन्वे करण्यासाठीही डॅाक्टरांचा वापर केला जातो… “यांना सांगा सिगारेट सोडा…” किंवा “तिला पालेभाज्यांव्यतिरिक्तही जीवनसत्वयुक्त पदार्थ असतात ते बनवा, असं सांगा…” अशी विनंती लोक अधूनमधून करत असतात. असाच एक दिवस ओपीडीत याच श्रेणीतलं एक जोडपं आलं होतं; आजार कमी आणि एकमेकांबद्दल आक्षेपच अधिक! बरं यातल्या बऱ्याच गोष्टी तर अवैद्यकीय होत्या… पण चालतंय, भारतीय माणूस बहुदा अघळपघळच असतो… तिला त्यानं वाढवलेली ‘मटनचॅाप्स बियर्ड’ अर्थात ‘दाढी’ आवडत नव्हती तर, तो ‘फॅशनंय’ म्हणून अडून बसला होता… आता मी त्याला दाढी काढायला सांगावं, असं तिचं म्हणणं…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां बहु बोलोनी सांगावें । तें एकिहेळा घे पां आघवें । सतासतही जाणावें । मीचि पैं गा ॥299॥ म्हणोनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे । परि प्राणियांचें दैव कैसें । जे न देखती मातें ॥300॥ तरंग पाणियेंवीण सुकती । रश्मि वातीविण न देखती । तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखे ॥301॥ हें आंतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें । कीं कैसें कर्म तयां आलें । जे मीचि नाहीं म्हणती ॥302॥ परि अमृतकुहां पडिजे । कां आपणयातें कडिये काढिजे । ऐसें आथी काय कीजे । अप्राप्तासि ॥303॥ ग्रासा एका अन्नासाठीं…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अधिक मेहनत करावी लागेल आणि तुमची दैनंदिन दिनचर्या थोडी गोंधळाची असू शकते. अनावश्यक रागामुळे नुकसान होऊ शकते, म्हणून शांत राहा. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यास एखाद्या मित्राची मदत मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कोणत्याही मुद्द्यावर घाईघाईने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. वृषभ – आत्मविश्वास आणि चिंता आज हातात हात घालून एकत्र राहतील. कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक ताण वाढू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक विचार टाळा. जुन्या मित्रांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या मुलाखतीत यश मिळेल. आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन – रागावर…
डॉ. किशोर महाबळ शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांना शिकण्यात मुळीच रस नसतो. शक्यतो शिकणे टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. अभ्यास न करण्यासाठी आणि होता होईतो वर्गातही न बसण्यासाठी विद्यार्थी काही ना काही कारणे शोधत असतात. तहान लागलेली असो की नसो, त्या निमित्ताने आणि अन्य कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्गाबाहेर जाण्याचा ते प्रयत्न करतात. वर्गात बसलेच तर, त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर कंटाळा आणि निरुत्साह दिसतो. अंगाला आळोखेपिळोखे देणे, कारण नसताना इकडे तिकडे बघणे, आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांशी बोलणे यासारख्या असंख्य अनावश्यक गोष्टी करण्यात मुले वेळ घालवतात आणि अनेकदा सुट्टीची वाट बघत बसतात, असे शिक्षकांचे म्हणणे असते. विद्यार्थ्यांचे हे वागणे, हा निरुत्साह शिक्षकांना फार त्रासदायक वाटतो. शिकण्याची…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
