Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»अक्षता… अतिशय डोळस निर्णय!
    ललित

    अक्षता… अतिशय डोळस निर्णय!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 2, 2026Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, लग्नसोहळे, लग्नसराई, वधूवरांवर अक्षतांचा वर्षावर, तांदळाची नासाडी, वधूवरांचा अनोखा निर्णय, माप ओलांडण्याची प्रथा, मापातील तांदूळ, मापातील तांदळाचा अपव्यय,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पराग गोडबोले

    एका लग्नाला जायचा नुकताच योग आला. कार्यालयात रंगीबेरंगी वातावरण. वेगवेगळे वेष परिधान केलेले असंख्य परिचित, अपरिचित चेहरे आणि त्यात अलगद सामावलेले आम्ही… वातानुकूलनाचा हवाहवासा गारवा, बऱ्याच जणांची आणि जणींची चाललेली निर्हेतूक लगबग लगबग… अगदी सगळ्याच लग्नांमध्ये असतं तसं मंगल आणि मोहक वातावरण… समोर आलेला लिंबू सरबताचा, उन्हातून आल्यानंतर हवाहवासा वाटणारा घोट… नवे कोरे कपडे आणि त्यांचा तो विवक्षित गंध. पोरांची पळापळ आणि हे सगळं बघणारा तटस्थ मी… बसून बसून कंटाळा आल्यानंतर, एक चक्कर रुखवतापाशी… संसारोपयोगी विविध वस्तू बघताना, आमच्या लग्नाच्या वेळच्या रुखवताची पण आठवण येत गेली. जवळपास तसाच जामानिमा आणि त्याच भावना!

    असा टंगळमंगळ करण्यात तासभर गेल्यानंतर, घटिका समीप आली. मंचावरून खणखणीत आवाजात गुरुजींची जाहीर सूचना – “मंगलाष्टकं सुरू होत आहेत, सगळ्यांनी ती शांत चित्ताने ऐकावीत.” गुरुजींच्या भसाड्या आवाजातली ती अष्टकं ऐकण्यात कोणालाही फारसं स्वारस्य असावं, असं वाटत नव्हतं.

    लोकांची चुळबुळ… सर्वांना अक्षता वाटप करणाऱ्या स्वयंसेवकांची प्रतीक्षा होती, पण ते कुठेच दृष्टीपथात नाहीत! लग्न लागताना वधूवरांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या, हा समाजमान्य संकेत, पण अक्षता टाकल्यावर, वधूवरांच्या ऐवजी इतर लोकांच्या डोक्यावरच त्या पडणार, हे अगदी अटळ सत्य… त्याच वेळी आणखी एक सूचना आली –

    “वधूवरांच्या डोक्यावर टाकण्यासाठी फक्त व्यासपीठावर उपस्थित मोजक्या लोकांनाच अक्षता देण्यात आल्या आहेत, शास्त्र म्हणून. अमूल्य अशा तांदूळरूपी अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी, सभागृहातील इतर अभ्यागतांना अक्षता देण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.”

    उपस्थितांमध्ये थोडीशी चुळबुळ… माझ्या शेजारी उपस्थित असणाऱ्या एक आजी म्हणाल्या, “काय हे, अक्षत टाकल्याशिवाय का लग्न होतं? काहीतरी आपली नवीन फ्याड!!”

    हेही वाचा – कुणीतरी आहे तिथे!

    मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं, पण पटली मला ही अभिनव संकल्पना! अक्षता म्हणून दोन-चार किलो तांदळाचा अपव्यय. पुन्हा याच मंगल अक्षता पायदळी तुडवल्या जातात आणि त्यांचं पावित्र्य भंगतं ही आणखी एक दुःखद आणि शोचनीय बाब.

    मध्यंतरी कुठेतरी प्लास्टिकच्या अक्षतांची टूम निघाली होती म्हणे. खरं खोटं ठाऊक नाही, पण हे तर रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार! एकवेळ तांदळाचा अपव्यय परवडला, पण या प्लास्टिकरूपी अक्षता नको… फार गाजावाजा झाला नसावा या प्रकाराचा, कारण हे फार कुठे ऐकण्यात आलं नाही.

    हे अक्षताविरहित लग्न भावलं मला. लग्न लागल्यावर वधूवरांना भेटायला लागलेल्या लांबच लांब रांगेत उभं राहिल्यावर, या पद्धतीवर सुद्धा काहीतरी उपाय हवा, असं वाटून गेलं!

    आमचा क्रमांक आल्यावर, नमस्कार चमत्कार झाल्यावर मी वधूवरांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या अक्षताविरहित लग्नाचं मनापासून कौतुक केलं. भावलं ते कौतुक त्या दोघांना. आमचा दोघांचा हा निर्णय होता, असं ती दोघं म्हणाली आणि मी अगदी भरून पावलो…

    स्टेजवरून निघायच्या आधी वधू म्हणाली, “मी माप ओलांडणार आहे गृहप्रवेश करताना, पण ते रिकामं असेल. त्यात तांदूळ भरलेले नसतील. नाही आवडत मला अशी अन्नाची नासाडी! मी शास्त्र म्हणून, लक्ष्मीचं प्रतीक म्हणून चार दाणे उडवेन माझ्या होणाऱ्या घराच्या समृद्धीसाठी, पण शिगोशिग तांदूळ भरलेलं माप नाही ओलांडणार मी! कोणीतरी म्हणालं मला, की ओलांडलेले तांदूळ धुऊन वापरता येतात म्हणून… तसं खरंच होणार असेल तर माझी ना नाही, पण माझ्या मैत्रिणींचे अनुभव आहेत की, हे तांदूळ वापरले जात नाहीत आणि वाया जातात.”

    हेही वाचा – दूरदर्शन… कृष्ण-धवल आठवणींना उजाळा!

    जेवणावळीमध्ये होणाऱ्या अन्नाच्या नासाडीपुढे ही नासाडी अगदी किरकोळ आणि क्षुल्लक, पण तो वेगळा विषय. त्यावरही व्यापक चर्चा हवीच.

    हा आणखी एक स्तुत्य निर्णय. तटस्थ विचार केल्यावर हा निर्णय सुद्धा मला भावला. अर्थात, आपल्या रुढीप्रिय समाजात या अशा निर्णयांना विरोध होण्याची, त्यांची हेटाळणी होण्याची, कुत्सित टोमण्यांची शक्यता गृहीत धरूनही, का कोणास ठाऊक, पण मला त्यांचं परत अभिनंदन करावंसं वाटलं आणि मी ते केलं!

    नव्या पिढीचे हे नवे विचार, मला विचारात पाडून गेले आणि त्यांच्या धाडसाचं कौतुकही वाटलं. काही प्रथा, काही रूढी थांबणं आणि त्याऐवजी नवं काहीतरी स्वीकारणं, ही खरोखर काळाची गरज आहे. आज हे विचार फार धाडसी वगैरे वाटतील, त्यांना ‘फुरोगामी’ वगैरे शेलकी विशेषणं बहाल केली जातील, हे ठाऊक आहे मला, पण हे असं प्रवाहाच्या विरोधात काहीतरी करणं, ही काळाची गरज आहे, हे माझं तरी वैयक्तिक मत आहे. याचा प्रत्येकाने अंगीकार करावा, हा आग्रह अनुचित, पण तरीही, नव्या पिढीला शिक्षणाने बहाल केलेली ही व्यापक दृष्टी आणि हे नवे विचार खरोखरच अनुकरणीय!

    अन्न हे पूर्णब्रह्म म्हणताना, त्याची नासाडी टाळण्याचे हे दोन्ही निर्णय खरोखर डोळस.


    मोबाइल – 9323277620

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn