Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अवांतर»अबोला… जास्त किंवा कमी दोन्ही घातकच!
    अवांतर

    अबोला… जास्त किंवा कमी दोन्ही घातकच!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 13, 2026Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, क्षणिक अबोला, लटका अबोला, मीठासारखा अबोला, अबोल्यातील गोडवा, अबोल्यातून संवाद, नात्यातील अबोला, नात्यातील जवळीक, मनातील वादळे, दृश्य अबोला अदृश्य संवाद,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रणाली मंगेश महाशब्दे

    खरंतर, अबोला या शब्दाचा अर्थ रुसवा किंवा द्वेष या कारणांमुळे एकमेकांशी न बोलणे असा होतो. काही वेळेस हा अबोला क्षणिक किंवा लटका असतो तर, काही वेळेस मात्र हा अबोला खूप दिवस चालणारा असतो. नातं कोणतेही असो प्रत्येकानेच अबोला हा अनुभवलेला असतो. नातं जितकं जवळचं तितका अबोला हा नेहमीचाच ठरलेला असतो. प्रत्येक नात्यामधील अबोल्याचा काळ हा त्या नात्यातील जवळीकीवर अवलंबून असतो!

    रुसणे, अबोला धरणे आणि नंतर त्या व्यक्तीला मनवणे यावर तर किती छान-छान गाणी पण आहेत – जसे ‘हा रुसवा सोड सखे… सोड ना अबोला’; ‘का रे दुरावा का रे अबोला… ‘, ‘सजणा कशासी अबोला…’, ‘अबोल प्रीत बहरली…’ ही आणि अशी अनेक.

    अबोल्यामध्ये संवाद नसतो, असे म्हणतात. परंतु खरंतर, आपण त्याच व्यक्तीबरोबर संवाद जास्त करतो, त्याचाच विचार जास्त करतो, पण मनात! हो ना? म्हणजेच दृश्य स्वरुपातील अबोला हा अदृश्य स्वरुपात जास्त संवाद साधणारा असतो… मग हा अबोला पूर्ण कसा होईल? अबोल्यामध्ये उलट विचार, आठवणी जास्त येतात. मग जिंकतं कोण, अबोला की त्या व्यक्तींमधील नाते?

    हेही वाचा – गोफ… सुखद आठवणींचा!

    अबोला हा मीठासारखा असावा. पदार्थाची चव व्यवस्थित ठेवणारा. जास्त किंवा कमी दोन्हीपण घातकच! अबोल्यामुळे शरीराचे आणि मनाचे दोन्हीचे आरोग्य बिघडते. यावर उपाय माहीत असून मन मानायला तयार होत नाही. मनाचे युद्ध सुरूच रहाते… अबोला वाढला तर संवादाला सुरुवात कोणी करायची? माघार कोणी घ्यायची? माझी जर चूकच नाही तर मी का बोलायचे? अशी मनातील वादळे अबोल्याबरोबर वाढत जातात…

    हेही वाचा – थिंक पॉझिटिव्ह

    मग काय करायचे तर शरीर आणि मन दोन्ही व्यवस्थित राहण्यासाठी अबोला क्षणिक ठेवून मनातील संवाद समोरासमोर बसून करायचा. बोलून मोकळे व्हायचे. मनात अढी ठेवण्यापेक्षा नात्यात संवादाची गोडी ठेवायची.

    संतांनी सुद्धा म्हटले आहे, “ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा.”

    मग काय मनाचे ऐकायचे आणि अबोल्यापेक्षा बोलते व्हायचे. चालेल ना!


    मोबाइल – 9730020494


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avantar.creativemarketix.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026 अवांतर

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर…

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026

    अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn