Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»‘डालडा’चा फॉर्म्युला दिला नाही म्हणून आली बेकारी
    ललित

    ‘डालडा’चा फॉर्म्युला दिला नाही म्हणून आली बेकारी

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 27, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, दुर्गाभागवत, नारायणभागवत, कपिलरामवकील, डालडा, टाटा, ऑइल मिल
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    यश:श्री

    थोर विदुषी दुर्गा भागवत यांचे वडील, नारायण भागवत तसेच त्यांचे सहकारी कपिलराम वकील यांच्या ‘डालडा’वरील संशोधनाबद्दलची एक कथा अतिशय रोचक आहे.

    नारायण भागवत 1920च्या सुमारास टाटांच्या ऑइल कंपनीत मॅनेजर होते. तर, कपिलराम वकील हे डायरेक्टर होते. (कपिलराम वकिलांनी पुढे ‘ओखा सॉल्ट वर्क’ सुरू केले आणि नंतर टाटांनी ते विकत घेतले. त्याला आता मिठापूर असे नाव पडले आहे.) या ऑइल कंपनीचे मालक सर दोराबजी टाटा होते. त्यावेळेला या दोघांनी मिळून एक नवा प्रयोग चालविला होता; जगात तोपर्यंत तो सिद्ध झालेला नव्हता. तो प्रयोग म्हणजे म्हणजे ‘डालडा’ तुपाचा. नारायण भागवत आणि कपिलराम शर्मा यांच्या खालोखाल जपानला यात थोडंफार यश मिळालं होतं. अमेरिका वगैरे इतर प्रगत राष्ट्रांना ते जमलं नव्हतं.

    टाटांच्या सर्व कंपन्या त्यावेळी कर्जबाजारी होत्या. तर, ऑइल कंपनी ‘ना नफा ना तोटा’ अशी असल्यानं तगून होती. नारायण भागवत आणि कपिलराम वकील यांनी तयार केलेलं तूप हे हिरव्या रंगाचं होतं. कणीदार नव्हतं. तसंच, त्याला एक प्रकारचा चमत्कारिक वास यायचा. जशा स्थितीत असेल, तसं तूप घरी आणून नारायण भागवत आपल्या कुटुंबीयांच्या पानात वाढत असत. त्यावेळी दुर्गाबाईंच्या आईचे नुकतेच निधन झाले होते. दुर्गाबाईंचा लहान भाऊ अडीच वर्षांचा होता. त्यामुळे घरी आणलेले तूप पाहून आसपासच्या घरांमध्ये कुजबूज व्हायची. लोक म्हणायची – ‘असं भयंकर तूप खायला घालून, हे आपल्या मुलांना मारणार आहेत.’ यावर भागवत म्हणायचे – ‘दुसऱ्यांना देण्याआधी हे तूप मी माझ्या मुलांना खायला देत आहे.’

    त्यावेळी पीटरसन नावाचे एक इंग्रज गृहस्थ होते; ते टाटांचे सर्वेसर्वा होते. कारण टाटांच्या कंपन्यांना त्यांनी कर्ज दिलं होतं. अमेरिकेच्या तज्ज्ञांनी पीटरसन यांना सांगितलं की, ‘आम्ही सर्व पैसे देतो, पण हे सिक्रेट आम्हाला द्या.’  त्यानुसार पीटरसनने कपिलराम आणि भागवत यांच्याकडे तूप बनविण्याच्या सिक्रेटची मागणी केली. मात्र, त्याला त्या दोघांनी नकार दिला. भागवत यांनी सांगितलं – ‘जेव्हा आमचे लोक परदेशात जातात, तेव्हा तेथील लोक आम्हाला त्यांची गुपिते सांगतात का? मग आम्ही पण तुम्हाला नाही सांगणार!’

    हे ऐकून पीटरसन भडकले. ते म्हणाले – ‘‘टाटा कंपन्यांना वर काढण्यासाठी तुम्ही मला सिक्रेट सांगा. नाहीतर, मला ही ऑइल कंपनी बंद करावी लागेल आणि तुमच्यासकट पाचशे कामगार बेकार होतील.’ तरीही कपिलराम आणि भागवत हे दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले. म्हणून दुर्गाबाईंचे वडील नारायण भागवत यांना सात वर्षे बेकारी सोसावी लागली.

    यादरम्यान, नारायण भागवत यांनी साबण बनविण्याचा स्वत:चा कारखाना सुरू केला. त्यावेळी त्यांचे भाऊ एम. एस्सी. गोल्ड मेडलिस्ट होते. त्याला नारायण भागवत यांनी सांगितलं – ‘तू टाटांकडे नोकरीला जा.’ त्याप्रमाणे त्यानं तिथे नोकरी केली. या नोकरीदरम्यान टाटा त्यांना परदेशात पाठवायचे. एकदा ते इंग्लंडला गेले होते. तिथं त्यांची पीटरसनशी ओळख झाली. पीटरसन म्हणाले – ‘तुझा भाऊ खरोखरच ‘नोबेल’ पुरस्कार मिळविण्याच्या लायकीचा माणूस आहे. जेव्हापासून मी त्याला बेकार बनवलं, तेव्हापासून मला निद्रानाश जडला आहे. तेव्हा त्याला सांग की मला क्षमा कर.’

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn