Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अवांतर»केवायसीच्या घोळात लॉकर सील
    अवांतर

    केवायसीच्या घोळात लॉकर सील

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 23, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, बँकलॉकर, बँककेवायसी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    जी. भालचंद्र

    जवळपास सर्वांचाच बँकेशी संबंध येतो. कितीही ऑनलाइन व्यवहार झाले तरी, कुठे ना कुठे तरी बँक कर्मचाऱ्यांशी डोकं लावावंच लागतो. बँकांधील काही अनागोंदी कारभाराशी संबंधित ‘बँक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या करामती’ या सदरातील माझा दुसरा अनुभव आता कथन करीत आहे.

    हा अनुभव महाराष्ट्रीयन कुटुंबांना एकेकाळी जवळची वाटणाऱ्या एका राष्ट्रीयीकृत बँकेबाबतचा आहे.

    काही वर्षांपूर्वी माझी पत्नी आणि मी, आम्ही दोघांनी या बँकेच्या आमच्या घराजवळील शाखेत लॉकर उघडण्याचा निर्णय घेतला. लॉकर उघडण्यासाठी करावयाचे सर्व सोपास्कार आम्ही बँकेत पूर्ण केले. त्याचवेळी आम्ही बँकेला असे निर्देश दिले होते की, आमच्या लॉकरचे वर्षाचे भाडे आमच्या जॉइंट अकाऊंटमधून वळते करण्यात यावे. पहिली चार-पाच वर्षं लॉकर भाडे आमच्या खात्यातून नियमितपणे वळते करण्यात येत होते.

    सप्टेंबर 2024मध्ये मी लॉकर उघडण्यासाठी बँकेत गेलो असताना माझे लॉकर सील केलेले आढळले आणि त्यावर “लॉकर रेंट इन अरिअर्स” असा स्टिकर लावलेला होता. याबाबत मी जेव्हा बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी त्यांच्यासमोर असलेल्या कॉम्प्युटरवर याबाबतची माहिती घेतली आणि लॉकरचे भाडे थकलेले नाही, याची खातजमा करून घेतली. नंतर त्या लॉकरचे सील काढण्यात आले आणि मला लॉकर उघडण्याची परवानगी दिली.

    मी घरी आल्यानंतर मला चैन पडेना की, हे असे का झाले? म्हणून मी माझ्या पासबुकमधील नोंदणीचा आढावा घेतला. तेव्हा मला असे आढळले की, आर्थिक वर्ष 2023-24 तसेच 2024-25 या दोन वर्षांचे लॉकरचे भाडे माझ्या खात्यातून वळते करण्यात आले नव्हते. म्हणून मी बँकेत पुन्हा चौकशीसाठी गेलो. चौकशी खिडकीवरील व्यक्तीस याबाबत सांगितले असता, त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले की, असे शक्यच नाही. एकदा तुम्ही बँकेला निर्देश दिले असताना बँक न चुकता त्या निर्देशाचे पालन करते. म्हणून मी बँकेच्या मॅनेजरला भेटलो. त्या मॅनेजरने त्यांच्या क्लार्कला परत चेक करण्यासाठी सांगितले. त्या क्लार्कने कॉम्प्युटरवरती काहीतरी चेक करून मला सांगितले की, माझे केवायसी अपडेट नसल्यामुळे बँकेने पैसे कापलेले नाहीत. मला हे समजेना की, बँकेला माझ्याकडून पैसे घ्यायचे होते तर, त्यासाठी केवायसीची काय गरज होती?

    सुदैवाने त्यावेळी माझ्या मोबाइलमध्ये त्या बँकेचे App होते. त्या बँकेच्या Appमध्ये असलेल्या केवायसीबद्दलची माहिती मी बघितली आणि माझ्या लक्षात आले की, माझे केवायसी अजून चार वर्षांनी अपडेट करायचे आहे. ही गोष्ट मी त्या क्लार्कच्या नजरेस आणून दिली. तेव्हा त्या क्लार्कने इतर काही सबबी सांगून मला टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु मी जेव्हा त्याच्या डोक्यावर बसून मला आजच याबद्दल खुलासा हवा, असे सांगितल्यानंतर त्याने मला दोन-तीन दिवसांनंतर परत येण्यासाठी विनंती केली.

    दोन-तीन दिवसानंतर मी जेव्हा त्या क्लार्कला भेटण्यास गेलो तेव्हा, त्याच्या कपाळावरती खूपच आठ्या होत्या. पण मी त्याचा पिच्छा सोडला नाही. त्याचवेळी मी बँकेच्या कस्टमर केअरवरती एक ईमेल पाठवून माझ्या तक्रारीचा पाठपुरावा करणे चालू केले. बँकेच्या मॅनेजरला दर दोन-तीन दिवसांनी भेटण्याचा सपाटा सुरूच ठेवला.

    शेवटी तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर बँकेने माझ्या लॉकरच्या दोन वर्षाच्या भाड्याची रक्कम माझ्या खात्यातून वळती केली. पण हे करत असताना त्यांनी जवळजवळ 1500 रुपये ज्यादा वळते करून घेतले. याबाबत विचारणा करण्यासाठी बँकेत गेलो असताना बँक मॅनेजरने याबाबत पूर्णपणे अनभिज्ञता दर्शवली आणि मला संबंधित ‘बॅक ऑफिस’कडे चौकशी करण्याचा सल्ला दिला.

    शेवटी वैतागून मी बँकेच्या कस्टमर केअरवर ई-मेल करून ज्यादा कापलेल्या पैशांबद्दल  खुलासा करण्यास विनंती केली. पहिले दोन ते तीन आठवडे त्यांच्याकडूनं कोणताच खुलासा करण्यात आला नाही. शेवटी मी बँकेला भारत सरकारच्या सीपीजीआरएएमएसकडे (CPGRAMS) जाण्याचा इशारा दिल्यानंतर बँकेने ते कापलेले जादा पैसे माझ्या खात्यात जमा केले.

    दुर्दैवाची बाब अशी की, मी त्यांना पाठवलेल्या ई-मेलबद्दल बँकेकडून आजपर्यंत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आर्थिक वर्ष 2025-26साठी लॉकरचे आगाऊ भाडे एप्रिल 2025मध्ये अकाऊंटमधून वळते करून घेणार आहोत, असा एसएमएस मला मार्च 2025मध्येच मिळालेला आहे.

    …तेव्हा बँक ग्राहकांनो सावधान!

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026 अवांतर

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर…

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026

    अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn