Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»किर्र झुडपांच्या जंगलात शिरलो अन्…
    ललित

    किर्र झुडपांच्या जंगलात शिरलो अन्…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 16, 2025Updated:March 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, मांजर, बोका, डंपर, डिगर, दनू, पिदू
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिप्ती चौधरी

    जवळ-जवळ चोवीस तास प्रवास करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बंगलोरला पोहोचलो. पिंजऱ्यातून काढल्यावर लगेच आम्ही पळत बाहेर आलो. दूर उभे राहून आम्हाला आमच्या जागा पकडू दिल्या. कोणीही आमच्या जवळ यायचा प्रयत्न केला नाही. आम्ही थोडे सावरल्यावर थोडे खाणे, पाणी ठेवले. लिटर बॉक्स आधीच कोपऱ्यात होता. थोडावेळ आम्हाला एकटे सोडल्यावर आम्ही थोडे शांत झालो.


    थोड्या वेळाने आमची भीती कमी झाली आणि अर्धवट उघड्या दरवाजातून आम्ही बाहेर पडलो. एका खोलीत कपाटाचा जमिनीलगतचा खण रिकामा करून अर्धवट उघडा ठेवला होता. दनूने लगेच आत बस्तान बसवले. त्याला लपायला जागा मिळाल्याने सुरक्षित वाटत होते. तो गेला आत म्हणून मी पण थोडा वेळ बसून बघितलं, पण लवकरच कंटाळा आला. खोलीत कोणी नव्हते, पण बाहेरून सारेच ओळखीचे आवाज येत होते. मग काय घाबरायचे? मी निघालो… घरभर फिरून आलो… मस्त वाटले… इथे कुठे दुसऱ्या माऊचा वास, आवाज नाही म्हणजे आम्ही एकदम सुरक्षित ठिकाणी आहोत, ही खूणगाठ मी बांधली. आजूबाजूला सगळी मायेची माणसं, मग कशाला घाबरायचे?

    मी छान बिनधास्त झालो आणि दानूला पण जाऊन सांगितले, ‘ये बाहेर, काय घाबरतोस!’ त्यानेही बाहेर येऊन अंदाज घेतला सारे आलबेल आहे. पण तरीही काही दिवस तो थोडा बाहेर फिरून लगेच कपाटात लपायचा. मग त्याने लपायच्या अभिनव जागा शोधून काढल्या. बाथरूमच्या वर गीझरच्या खाली फॉल-सीलिंग होते. त्याची एक शीट मोकळी होती. गीझरच्या काही दुरुस्तीसाठी ती थोडी बाजूला केली होती. साहेब बेसिन वरच्या कपाटावरून वर उडी मारून त्या फटीतून वरच्या अंधारात गुडूप झाले! नशीब त्याचा हा स्टंट पप्पांनी बघितला होता, नाहीतर हा कुठे गायब झाला या विचाराने घरचे काळजीत पडले असते. आता याला खाली काढायचे कसे हा प्रश्न होता, कारण हा तर पार टोकाला जाऊन लपला होता. तिथे हातही पोहचत नव्हता. फक्त दोन डोळे मिट्ट अंधारात लुकलुकत होते! त्याला तसाच सोडला फक्त खाणे वर ठेवले आणि त्या बाथरूममध्ये एक litter box ठेवला. दिवसभर तिथे आरामात बसून होता आणि रात्री धाडकन उडी मारून उतरला… आणि सरळ आईच्या मांडीवर लोळायला धाव घेतली!

    मुंबईच्या सवयीमुळे असेल, पण तो नेहमी कपाट किंवा फ्रीज, फळ्या यांच्यावरच मुक्काम करायचा. त्याच्या काही जागा इतक्या अफलातून होत्या की, मीही तिथे चढू शकत नसे.

    बाथरूममधील कपाट सगळ्यात आवडती जागा. आईकडे कामाला येणाऱ्या नमिता आणि कलोंजी यांच्याशी त्याने तिथूनच दोस्ती केली. कलोंजीचं तमिळ काही आईला समजत नसे आणि तिला हिंदी! त्यामुळे संवाद नमितामार्फतच होई. पण दनू आणि कालोंजी यांच्या मात्र बऱ्याच गप्पा होत!

    दिवसभर थोडा दबलेला दनू आणि मी रात्री मात्र तुफान मस्ती करायचो. दमून झोपलो तरी, पुन्हा पहाटे मस्तीचा दुसरा प्रहर असायचा. त्यात दनूच्या गायनाचाही कार्यक्रम असायचा! पहाटे सगळ्यांच्या झोपेची पुरती वाट लागली की, मग आम्ही मस्त ताणून द्यायचो! आधी इतरांना उठवू नये म्हणून आई उठून यायची; पण त्याचा काही फायदा होत नसे. उलट, आम्हाला सवय होते आहे, हे बघून तिने ते सोडून दिले. रात्रीच थोडा खाऊ ठेऊन द्यायचा आणि सकाळी अंगावर उड्या मारल्या तरी, काहीही प्रतिसाद द्यायचा नाही, हे धोरण घरच्यांनी अवलंबले. कोणीच काही उठणार नाही, हे कळल्यावर आमचे आम्ही खेळून दमलो की, चुपचाप खाऊ खाऊन झोपून जायला लागलो. अर्थात, याला थोडा वेळ लागला, पण आता तर आम्ही रात्रभर झोपतो आणि अजिबात दंगा करत नाही. अजूनही कधी कधी दनू भसाड्या आवाजात तान घेतो, पण आई ओरडायच्या आधी मीच त्याला बदडून काढतो, कारण ते गायन म्हणजे त्याने मला दिलेले आव्हान आहे. आमचं आम्ही बघून घेतो!

    घराला सरावल्यानंतर थोड्या दिवसांनी लक्षात आले की, इथून कुठूनही मला जमीन दिसत नाही. पक्षी पण कधी-कधी खाली उडताना दिसतात! मग खाली जमिनीवर जायचे कसे?

    थोड्या निरीक्षणाने कळले की, सगळी माणसे मुख्य दरवाजातून निघतात आणि समोर असलेल्या दोन दरवाजांसमोर थांबतात. थोड्या वेळाने तो दरवाजा उघडतो आणि आत गेल्यावर बंद होतो! तिथूनच खाली जात असणार! मग पप्पा ऑफीसला निघाले की, त्यांच्याबरोबरच मी बाहेर निघायचो. पण ते मला चुकवून लिफ्ट का काय म्हणतात, त्यात गुडूप व्हायचे. मग मीपण लिफ्टसमोर वाट बघत बसायचो; पण दरवाजा काय उघडायचा नाही! आणि इतक्यात मला पकडून दिदी घरात आणायची. पण मला बाहेर जायचं आहे, हे बघून दिदीने मला सांगितलं की, पट्टा घालून फिरायची सवय केलीस तर, घेऊन जाईन.

    दनूला बाहेर जाण्यात अजिबात रस नव्हता म्हणून दिदीने मला पट्टा घालून घरात फिरवायचा सराव सुरू केला. थोडे दिवस मी शिस्तीत फिरतो, हे बघून एका संध्याकाळी खालची गडबड कमी झाल्यावर थोडे उशिरा मला पट्टा घालून लिफ्ट समोर उभे केले. लिफ्ट आल्यावर मी दबकत आत शिरलो. काय होते काही कळेना, धक्का बसला आणि ती छोटीशी खोली अचानक खाली जायला लागली. चारी बाजूने बंद त्यामुळे मी खूप घाबरलो. इतक्यात पुन्हा धक्का बसून ते प्रकरण एकदाचे थांबले आणि समोर दरवाजा उघडून बघतो तो काय… जमीन!

    बाहेर निघालो तर अनोळखी माणसे, आता मी पुरता बिथरलो… पण तरीही बाहेर निघालो… दरवाजातून बाहेर पाय ठेवताच, एक गाडी अचानक झुम्म गेली… झालं माझा पुरता धीर  सुटला… दरवाजासमोरील पायऱ्यांच्या बाजूला सुशोभित बाग होती. त्यात उंच झुडपांचे दाट जंगल होते… लपायला एकदम भारी जागा! कारण आतले काही दिसत नव्हते. मी त्या किर्र झुडपांच्या जंगलात शिरलो… माझा पट्टा आई आणि दिदी ओढत होत्या. त्यामुळे अजून एक फायदा झाला… पट्ट्याला ओढ असल्याने मी आधी डोक्याचा आणि नंतर पोटाचाही वेढा मस्तपैकी काढून टाकला… आणि त्या झुडपात अंतर्धान पावलो!

    बाहेर तो झुडपात शिरलेला पट्टा ओढणाऱ्या दिदीच्या हातात रिकामा पट्टा झुडपातून बाहेर आला… मला त्याक्षणी झुडपाबाहेर दोन माणसे जवळजवळ कोसळल्याचा भास झाला…

    क्रमशः

    (पिदू या मांजराची आत्मकथा)

    diptichaudhari12@gmail.com

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn