Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…
    ललित

    रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 8, 2026Updated:March 17, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, पुण्याचे रस्ता क्रॉसिंग, पुण्याचे ट्रॅफिक, रस्ता क्रॉसिंगसाठी म्हशीचा वापर, म्हशीच्या आडोशाने रस्ता क्रॉसिंग, तरुणीच्या मदतीने रस्ता क्रॉसिंग, तरुणीच्या आडोशाने रस्ता क्रॉसिंग, वयस्कर व्यक्तीच्या मदतीने रस्ता क्रॉसिंग, तरुणीचे रस्ता क्रॉसिंग,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुधीर करंदीकर

    उत्तम तब्येतीकरता भरपूर फिरा, असे सगळेच तज्ज्ञ सांगतात… आता घराच्या बाहेर पडलो की, छोटे – मोठे रस्ते क्रॉस करणे हे ओघाने आलेच. आपल्याकडे कुठलाही मोठा आणि खूप रहदारीचा रस्ता क्रॉस करायचा म्हणजे सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा रहातो आणि याला कारण म्हणजे आपल्या इथली  बेशिस्त (आपणच  तयार केलेली) रहदारी!

    रस्ता क्रॉस करताना पण काही मज्जा येऊ शकते, यावर खरंतर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होऊ शकतात, हे सांगणारा माझा अनुभव आता सांगणार आहे. तो ऐकून आपल्याला पण असा अनुभव  एकदातरी  यावाच, असे  सगळ्यांना नक्कीच वाटेल…                  

    नेहमीप्रमाणे आज सकाळी मुलीकडे बावधनला गेलो होतो. दुपारी ऋता (बायको) स्कूटर घेऊन तिच्या क्लासला गेल्यामुळे संध्याकाळी मला बसने कर्वेनगरला घरी जायचे होते. म्हणजे घरापासून चालत मेनरोडपर्यंत जायचं, आणि तिथून बसने गुजरात कॉलनीपर्यंत जायचं… तिथून चालत मार्केट क्रॉस करायचं, ऑटो पकडायची आणि घरी पोहोचायचं. संध्याकाळी पाच वाजताच इथून निघालो. आज बर्‍याच दिवसांनी म्हशीबरोबर बावधनचा रस्ता क्रॉस करायला मिळणार, म्हणून मनातून खूश होतो. चालत चालत मेन रोड पर्यंत पोहोचलो आणि नेमकी आज म्हशींनी सुट्टी घेतलेली दिसत होती. म्हणजे आज जीव मुठीत धरूनच रस्ता क्रॉस करावा लागणार होता. तेवढ्यात मला, गेल्या भेटीत गणेशने (म्हशीबरोबरच्या मुलाने) दिलेला सल्ला आठवला आणि मी भूतकाळात गेलो…

    हेही वाचा – अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!

    गणेश :  काका, कधी मी नसलो तर रस्ता एकट्याने क्रॉस करू नका. रस्ता क्रॉस करणारे बरेच जण असतात. जेव्हा कुणी क्रॉस करत असेल, तेव्हा त्याच्या बाजूने चालत रस्ता क्रॉस करायचा आणि बाजूने चालणारी व्यक्ती ही तरुणीच पाहिजे, हे लक्षात ठेवायचे. 

    मी : तरुणीचं  का?

    गणेश : काका,  इथलं ट्रॅफिक किती बेशिस्त आहे, जीवघेणं आहे,  हे तुम्हाला सांगायला नकोच. माझा इथला रोजचा अनुभव सांगतो – आपल्या इथले गाड्या चालवणारे (अजून तरी) समोर तरुणी दिसली तर गाडी थोडी स्लो करतात आणि  आपण  त्याचाच  फायदा  घ्यायचा.    

    मला गणेशचे हे म्हणणे पटले…

    मी वर्तमानकाळात आलो. झेब्रा क्रॉसिंगजवळ जाऊन उभा राहिलो. ट्रॅफिक नेहेमीप्रमाणेच सुसाट होतं. कुणी तरुणी रास्ता क्रॉस करायला आली की, तिच्याबरोबर रस्ता क्रॉस करायचे, असे मनात ठरवले. तेवढ्यात डावीकडून घाईघाईत येणारी एक तरुणी दिसली. माझ्या बाजूला येऊन ती थांबली. यालाच मी रस्ता क्रॉस करण्याचा ग्रीन सिग्नल समजलो. रहदारीत थोडी गॅप दिसली आणि आम्ही रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली, ती माझ्या बाजूबाजूने रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करत होती आणि माझ्या स्पीडप्रमाणे पावले टाकत होती आणि मी तिच्या आडोशाने राहण्याचा प्रयत्न करत होतो. ‘मेड फॉर इच अदर’ प्रमाणे एकमेकांकडे बघत बघत आम्ही व्यवस्थित पलीकडे पोहोचलो. मी मनात गणेशला आणि तरुणीला धन्यवाद दिले. 

    मी जाऊन बस स्टॉपच्या बाकावर बसची वाट बघत बसलो आणि थोड्याच वेळात माझी बस आली. माझ्याबरोबरची तरुणी पण याच बसमध्ये पुढच्या दारातून चढली, असे मला वाटले. बसमध्ये बरीच गर्दी होती. माझा पौंड रोडकडे जाण्याचा बसचा प्रवास सुरू झाला. आता किनारा हॉटेलला उतरायचे आणि रस्ता क्रॉस करून गुजरात कॉलनीतून पुढे जायचे… असा माझा पुढचा प्रवास होता.

    स्टॉपला उतरलो. चालत थोडा मागे रस्ता क्रॉस करण्याच्या स्पॉटला आलो. इथे मेट्रोचे काम सुरू होते, त्यामुळे ट्रॅफिक विस्कळीत होते आणि गाड्या पण स्पीडने जात – येत होत्या.  इथे रस्ता क्रॉस करायला म्हैस कधीच नसते. म्हणजे, आता जीव मुठीत धरणे आणि रस्ता क्रॉस करणे, हे ओघाने आलेच आणि एकदम लक्षात आले, ‘अरे, गणेशचा सल्ला इथे पण अमलात आणायलाच पाहिजे. सुरक्षिततेला पर्याय नसतो.’ मनाला एकदम  पटले.

    आता इथे रस्ता क्रॉस करायला कोण  तरुणी  भेटतेय, यासाठी आजूबाजूला बघत वाट पाहात होतो. इथे पण पब्लिक आपापल्या सवयीप्रमाणे धावत – पळत रस्ता क्रॉस करत होते. मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होतो… तरुणीची वाट बघत होतो. काही वेळा आपल्याला आश्चर्याचा धक्का कसा बसतो, तो असा – बावधनला जी तरुणी माझ्याबरोबर रस्ता क्रॉस करायला होती, तीच घाईघाईने आली आणि माझ्या बाजूला उभी राहिली. रस्ता क्रॉस करायला ग्रीन सिग्नल मिळाला असे समजून, रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली. मी त्या तरुणीला गाईड समजत होतो आणि ती बहुदा मला गाईड समजत होती. कारण आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो आणि चालण्याचा स्पीड ऍडजेस्ट करत होतो. पलीकडे आरामात पोहोचलो…

    पलीकडे पोहोचलो आणि…

    बरोबरची तरुणी : काका, थँक्स!

    मी : कशाबद्दल?

    तरुणी :  दोन्ही ठिकाणी रस्ता  क्रॉस करायला मदत केल्याबद्दल. 

    मी (मनात) :  खरंतर, हे वाक्य मी तिला म्हणायला पाहिजे. 

     मी तिला थँक्स म्हणणार एवढ्यात —

    तरुणी :  काका, गावात बसने येण्याची आणि रस्ता क्रॉस करण्याची पाळी फारच कमी वेळा येते. मी राहते बावधनला. तिथे मात्र बऱ्याच वेळा रस्ता क्रॉस करावा लागतो. पण तिथे म्हैस घेऊन एक मुलगा उभा असतो. म्हशीच्या आडोशाने रस्ता क्रॉस करण्याचे टेन्शन नसते. आधी तिथे म्हैस नसायची, तेव्हा मात्र रस्ता क्रॉस करतांना भीतीच वाटायची… काका, तिथल्या ट्रॅफिकमध्ये म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणं, यासारखं सुख नाही. तुम्ही एकदा हा अनुभव घेऊन बघा. मला ही कल्पनाच भन्नाट वाटते.

    आज निघताना आईने बजावलं होतं, तुला पौंड रोडला रस्ता क्रॉस करावा लागेल. तिथे म्हैस नसेल. एकटीने रस्ता क्रॉस करायचा नाही. एखादा तरुण दिसणारा सीनियर सिटिझन बघून त्याच्या बाजूबाजूने रस्ता क्रॉस करायचा. आपल्या इथले गाड्या चालवणारे, अजूनतरी, समोर तरुण सीनियर सिटीझन असेल, तर गाडी थोडी स्लो करतात आणि  आपण  त्याचाच  फायदा  घ्यायचा.  थोडा वेळ वाट बघावी लागली, तरी हरकत नाही. 

    हेही वाचा – अवघ्या पंधरा दिवसांत 5 रुपयांचे झाले 500 रुपये!

    बावधनला आज नेमकी म्हैस नव्हती. म्हणजे इथे पण आईची सूचना पाळायलाच पाहिजे. रस्ता क्रॉस करणारे तिथे दिसत होते, क्रॉस करणारे सीनियर सिटिझन पण दिसत होते, पण आईने दिलेल्या स्पेसिफिकेशनमध्ये बसेल, असे कुणीच रस्ता क्रॉस करायला येत नव्हते. म्हणून, मी बाजूच्या झाडाखाली वाट बघत उभी होते. तुम्हाला येतांना बघितलं आणि क्लिक झालं, “यस, धिस इज  ‘द’  पर्सन” आणि मी लगेच पुढे आले… आणि माझं लक असं, की इथे पौंड रोडला पण मला तुमची साथ मिळाली. म्हणून डबल थँक्स. 

    मी :  माय प्लेझर, तुम्हाला पण थँक्स!

    एकमेकांना बाय बाय झाले, ‘पुन्हा भेटू’ झाले आणि आम्ही आपापल्या मार्गाला लागलो.

    छान आणि जरा रोमँटिक सल्ला दिल्याबद्दल मी मनातून गणेशचे आभार मानले. तरुणीच्या आईचे पण मी मनातून आभार मानले, कारण त्यांनी रस्ता क्रॉस करणाऱ्या माणसाची अशी स्पेसिफिकेशन्स मुलीला दिल्याबद्दल. 

    दुसऱ्याचे ऐकल्यामुळे, ‘रस्ता क्रॉस करणे’ अशा रुक्ष वाटणाऱ्या  गोष्टीतही अशी मज्जा येऊ शकते, हा आजचा नवीन अनुभव… आणि या अनुभवामुळे माझ्या ज्ञानात पडलेली महत्वाची भर म्हणजे, आपल्या हितचिंतकांचे नेहेमी ऐकावे, आपण स्वतःला कितीही हुशार समजत असलो तरीही! हितचिंतक आपला नवरा असू शकतो, बायको असू शकते, नातेवाईक असू शकतात, ओळखीचे असू शकतात, अनोळखी पण असू शकतात….  

    आता म्हैस नसताना बावधनचा रस्ता क्रॉस करण्याची संधी पुन्हा कधी मिळते, आणि ती पण याच बावधानच्या  तरुणीबरोबर, याच्या प्रतीक्षेत  मी आहे… तुम्ही पण एकदा बावधनला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याचा सुखद अनुभव जरूर घ्या आणि इतर ठिकाणी रस्ता क्रॉस करताना मात्र गणेशने सांगितलेल्या सूचना आणि नव्याने झालेल्या मैत्रिणीच्या आईने सांगितलेल्या सूचना, जरूर लक्षात ठेवा आणि फिरणे मस्त एन्जॉय करा…

    मोबाइल – 9225631100


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn