Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 06 मार्च 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 06 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 6, 2026Updated:March 17, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 06 मार्च 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 15 फाल्गुन शके 1947; तिथि : तृतीया 17:53; नक्षत्र : हस्त 09:29
    • योग : गंड 07:05, वृद्धि 30:51; करण : बव 30:31
    • सूर्य : कुंभ; चंद्र : कन्या 22:18; सूर्योदय : 06:56; सूर्यास्त : 18:44
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 09:19)

    छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    नोबेल विजेत्या अमेरिकन कादंबरीकार पर्ल बक

    टीम अवांतर

    नोबेल पुरस्कारप्राप्त अमेरिकन कादंबरीकार पर्ल बक यांचा  जन्म 26 जून 1892 रोजी पश्चिम व्हर्जिनियातील हिल्सबोरो येथे सायडेनस्ट्रिकर या धर्मप्रचारक कुटुंबात झाला. 1900 साली झालेल्या बॉक्सर उठावात पर्लच्या आईने मुलांना घेऊन शांघायमध्ये आश्रय घेतला. चिनी संस्कृतीबद्दलचे पर्ल यांचे आकर्षण आणि प्रेम त्यांच्या लिखाणातून व्यक्त होते. पुढे 1935 मध्ये पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतरही पर्ल यांनी ‘बक’ हे आडनाव व्यावसायिक क्षेत्रात वापरले.

    1922 पासून पर्ल यांनी मासिकांत लघुकथा आणि लेख लिहिण्यास सुरुवात केली. 1930 मध्ये ईस्ट विंड, वेस्ट विंड ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. 1931 मध्ये द गुड अर्थ ही पर्ल यांची पुलित्झर पुरस्कृत कादंबरी प्रकाशित झाली. 1932 मध्ये सन्स आणि  1935 मध्ये अ हाऊस डिव्हाइडेड या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या.. या लेखनाबद्दल आणि स्वतःच्या आई, वडिलांच्या चरित्र लेखनाबद्दल पर्ल यांना 1938 मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. अमेरिकन साहित्यात नोबेल पुरस्कार मिळवणारी पर्ल या पहिल्या महिला ठरल्या.

    हेही वाचा – स्वप्नं आणि प्रवास

    1973 पर्यंत पर्ल यांची जवळपास 70 पुस्तके प्रकाशित झाली. यामध्ये ड्रॅगन सीड, इंपिरियल वूमन या कादंबऱ्या, लघुकथासंग्रह, द वॉटर बफेलो चिल्ड्रेल आणि द ख्रिसमस घोस्ट ही लहान मुलांची पुस्तके, जॉन सेजेस या टोपणनावाखाली 5 कादंबऱ्या, नाटकं व मरणोत्तर प्रकाशित झालेली कादंबरी द इटर्नल वंडर, या व्यतिरिक्त वास्तववादी लेखनामध्ये आपल्या आईचे द एक्झाइल आणि वडिलांचे द फायटिंग एंजेल ही चरित्रे आहेत. मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या कॅरल या स्वतःच्या मुलीबद्दल द चाईल्ड हू नेव्हर ग्रू आणि माय सेव्हरल वर्ल्ड्स हे आत्मचरित्र, चायना ॲज आय सी इट हे चीन आणि अमेरिकेबद्दलचे भाष्य तसेच आशियायी पाकशास्त्राबद्दल असलेले पर्ल एस. बक्स ओरिएंटल कूकबूक यांचाही या साहित्यात समावेश होतो.

    1949 मध्ये चीनमध्ये साम्यवादी राजवट लागू झाली आणि पर्ल यांच्या पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. ही बंदी 1994 पर्यंत कायम होती. सध्या पर्ल यांच्या साहित्यावर चीनमध्ये जरी बंदी नसली तरी अजूनही पूर्णपणे त्यास स्वीकृतीही मिळालेली नाही. 6 मार्च 1973 रोजी फुफ्फुसाच्या कर्करोगाने ऐंशीव्या वर्षी पर्ल यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज तुम्हाला शांत राहण्याची आवश्यकता आहे, कारण तुमच्या मनात राग किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते. ध्यान किंवा मेडिटेशन करा, त्यामुळे या नकरात्मकतेतून बाहेर येऊ शकता. स्वतःला कामात व्यग्र ठेवा. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणूक काळजीपूर्वक करा, जोखीम घेऊ नका. शारीरिक आरोग्य चांगले राहील, परंतु रासायनिक रंग असलेले पदार्थ आणि मिठाया खाणे टाळा.

    वृषभ – नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण असेल, पण सहकाऱ्यांकडून पूर्ण मदत मिळेल. व्यवसायात नवीन करार किंवा सौदे करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. महागड्या वस्तू खरेदी करण्याची घाई करू नका, थोडी माहिती घेतल्यास खूप पैसे वाचतील. बाहेरचे अन्न खाणे टाळा. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात गोडवा येईल.

    मिथुन – एखाद्या गोष्टीबद्दल काही शंका असतील तर त्याबद्दल थेट संबंधित व्यक्तीला विचारा. खुल्या संवादामुळे चांगले संबंध निर्माण होतात. कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका, कारण यामुळे भांडणे होऊ शकतात. दिवसाची सुरुवात योगाभ्यासाने करा. तेलकट पदार्थ टाळा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल नाही. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा.

    कर्क – कार्यालयातील वादविवाद आणि भा़ंडणांपासून दूर राहा. ज्या गोष्टींशी तुमचा संबंध नाही अशा गोष्टींमध्ये अडकू नका. आंतरिक शांतीवर लक्ष केंद्रित केल्याने दिवस चांगला जाईल. व्यवसायात मोठे बदल करणे टाळा. सध्या तरी ‘जैसे थे’ स्थिती राखणे चांगले. खर्च वाढू शकतो. त्यामुळे बजेट सांभाळा. काही दुःखद बातम्यांमुळे तुम्हाला नैराश्य येऊ शकते. थकवा जाणवू शकतो, त्यामुळे भरपूर विश्रांती घ्या, झोप पूर्ण करा.

    सिंह – सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. प्रत्येक गोष्टीसाठी इतरांशी स्पर्धा करण्याची गरज नाही. टीम म्हणून काम केले तर कामे जलद पूर्ण होण्यास मदत होईल. इतरांना मदत केल्याने तुमच्यातील नेतृत्वगुण दिसून येतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. धार्मिक कार्यांसाठी खर्च केला जाईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य सुधारेल आणि उत्साही वाटेल.

    हेही वाचा – अवघ्या पंधरा दिवसांत 5 रुपयांचे झाले 500 रुपये!

    कन्या – काम परिपूर्ण पद्धतीने करण्यापेक्षा वेळेवर काम पूर्ण करणे जास्त महत्त्वाचे आहे, हे जाणून घ्या. छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त वेळ वाया घालवू नका. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. त्यामुळे आपापसातील समजूतदारपणा वाढेल. आरोग्य चांगले राहील. प्रवास आनंददायी होईल.

    तुळ – न्याय किंवा समान संधी हवी असेल तर, त्याबद्दल थेट बोला. तुम्ही काय विचार करत आहात, हे लोक स्वतःहून समजून घेऊ शकत नाहीत. पण आपले विचार स्पष्टपणे, सभ्यपणे व्यक्त करा. पैसे हुशारीने गुंतवा. अनपेक्षित खर्च येऊ शकतात. कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संयम बाळगा. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता कायम राहू शकते.

    वृश्चिक – तुमच्या योजना आणि कल्पना खूप लोकांसोबत शेअर करू नका. योग्य वेळ असेल तेव्हाच कृती करा. सावधगिरीने नियोजन करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमच्याबाबत सहकाऱ्यांना असणारा आदर कमी होऊ शकतो. मोसमी आजारांपासून सावध रहा. तुमच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा.

    धनु – वेळेचे नियोजन करा, त्यामुळे कुठेही समस्या येणार नाही. एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून मोठी आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा. जेवढा मोकळा वेळ मिळेल, तेवढा कुटुंबासोबत घालवा. जुने मतभेद दूर होतील. घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

    मकर – कितीही अडचणी आल्या तरी दिनचर्येत बदल करू नका. तुमची शिस्तच तुम्हाला कामे पूर्ण करण्यास मदत करेल. गरज पडल्यास कुटुंबाची मदत घ्या. संध्याकाळपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. कुटुंबात शुभ घटना घडतील. नातेसंबंध मजबूत होतील.

    कुंभ – जुन्या समस्येबाबत एक नवीन आणि वेगळा दृष्टिकोन वापरून पाहा. सर्जनशील विचारसरणी तुम्हाला चांगला उपाय शोधण्यास मदत करू शकते. संगीत आणि लेखन यासारख्या सर्जनशील गोष्टीमुळे व्यग्र रहाल. वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींचे काळजीपूर्वक नियोजन करा.  आरोग्याची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या. जोडीदारासोबत मतभेद वाढू शकतात, त्यामुळे संयमाने घ्या.

    मीन – आज थोडा वेळ एकट्याने घालवा किंवा फिरायला जा. यामुळे मन शांत होईल आणि काम चांगले करण्यास लक्ष केंद्रीत करण्यासाठी मदत होईल. प्रवास करावा लागेल आणि तो खर्चिक असेल, पण भविष्यासाठी ती गुंतवणूक असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील, पदोन्नतीची शक्यता आहे.


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn