Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अध्यात्म»Dnyaneshwari : परिमळु निघालिया पवनापाठीं, मागें वोस फूल राहे देठीं…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : परिमळु निघालिया पवनापाठीं, मागें वोस फूल राहे देठीं…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 5, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Nine, नववा अध्याय, अध्याय नववा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय नववा

    समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय: । ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥29॥

    तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा । जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥407॥ जे ऐसिया मातें जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि । जे जीवें कर्मे करूनि । भजती मातें ॥408॥ ते वर्तत दिसती देहीं । परि ते देहीं ना माझां ठायीं । आणि मी तयांचा हृदयीं । समग्र असें ॥409॥ सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे । आणि बीजकणु वसे । वटीं जेवीं ॥410॥ तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें । वांचूनि आंतुवट वस्तुविचारें । मी तेचि ते ॥411॥ आतां जायांचें लेणें । जैसें आंगावरी आहाचवाणें । तैसें देह धरणें । उदास तयाचें ॥412॥ परिमळु निघालिया पवनापाठीं । मागें वोस फूल राहे देठीं । तैसें आयुष्याचिये मुठी । केवळ देह ॥413॥ येर अवष्टंभु जो आघवा । तो आरूढोनि मद्भावा । मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥414॥

    अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् । साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥30॥

    ऐसे भजतेनि प्रेमभावें । जयां शरीरही पाठीं न पवे । तेणें भलतया व्हावें । जातीचिया ॥415॥ आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा । परि जीवित वेचिलें चोहटां । भक्तीचिया कीं ॥416॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : कर्पूर चंदन अगरु, ऐसेया सुगंधाचा महामेरु…

    अर्थ

    मी सर्व भूतांच्या ठिकाणी सम आहे; मला आपला आणि परका कोणी नाही. पण जे मला भक्तीपूर्वक भजतात, ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे. ॥29॥

    (भक्त ज्याचे स्वरूप बनतो) तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर, (सांगतो ऐक.) जो मी सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलेलो आहे आणि जेथे आपला आणि परका असा भेद नाही, ॥407॥ अशा प्रकारे सर्व समान असणारा जो मी, त्या मला जाणून जे कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात आणि मनोभावाने कर्मे करून तद्वारा माझे भजन करतात, ॥408॥ ते देहांत वावरताना दिसतात, परंतु त्यांच्या ठिकाणी देहतादात्म्य नसते, ते माझ्या ठिकाणी रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंत:करणात संपूर्ण आहे. ॥409॥ आपल्या विस्तारासह वटत्व ज्याप्रमाणे वडाच्या लहानशा बीमध्ये असते आणि त्याप्रमाणे ते लहानसे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते ॥410॥ तसे आमच्यात आणि भक्तात, परस्परांमध्ये बाह्यनामरूपात्मक देहदृष्टीने भेद आहे. वास्तविक विचार केला तर, अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत. ॥411॥ आता उसने मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी, त्या दागिन्यांविषयी घालणार्‍याच्या मनात जशी उदासीनता असते, तसे ते भक्तही देहाविषयी उदासीन असतात. ॥412॥ [जर ते देहावर उदासीन आहेत, तर त्यांनी देह ठेवलाच का? तर त्यांनी ठेवलाच नाही. परंतु केवळ त्यांच्या (उरलेल्या) आयुष्याने धरून ठेवला आहे. हीच गोष्ट येथे उदाहरणाने स्पष्ट करतात.] वायूने आपल्याबरोबर फुलांतील सर्व सुगंध नेल्यास, मग केवळ देठाला जसे सुगंधशून्य फूल राहते, त्याप्रमाणे भक्ताचा देह (केवळ अवशेष प्रारब्धाच्या भोगार्थ) आयुष्य धरून ठेवते. ॥413॥ अर्जुना, एरवी त्यांचा सर्व देहाहंकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला. ॥414॥

    (पूर्वी) अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्यभक्त (होऊन) माझी भक्ती करील, तर तो साधूच मानला पाहिजे. कारण त्याची वागणूक आता चांगली झाली आहे. ॥30॥

    अशा प्रकारे प्रेमभावाने भजत असता त्याला पुन्हा शरीरही मिळत नाही, तो मग कोणत्या का जातीचा असेना? ॥415॥ आणि अर्जुना त्याच्या वागणुकीचा विचार केला तर, वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे; परंतु ज्यांनी आपले (उरलेले) आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे ॥416॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : तें उगाणिलें मज कर्म, तेव्हाचि पुसिलें मरण जन्म…

    क्रमश:

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    By Team AvaantarMarch 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें…

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn