Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फिल्मी»‘पाकीजा’च्या अजरामर गीतांना वादाची किनार
    फिल्मी

    ‘पाकीजा’च्या अजरामर गीतांना वादाची किनार

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 13, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, पाकीजा, पाकीजा संगीत, पाकीजा नौशाद, गुलाम महंमद
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मनोज जोशी

    कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकीजा’ चित्रपट हा हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड म्हटले तर, ते गैर ठरणार नाही. हा चित्रपट कमाल अमरोही यांच्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. त्यामुळे त्यांनी जे जे उत्तम (त्या काळी) होते, ते उभे केले होते. या चित्रपटाच्या सेटपासून संगीतापर्यंत सर्वच भव्यदिव्य होते. अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट बनला. ‘पाकीजा’ चित्रपट बनायला तब्बल 15 वर्षं  लागली. 17 जानेवारी 1957 रोजी या गाणी रेकॉर्ड करून कमाल अमरोही यांनी या चित्रपटाची सुरुवात केली होती. तर, प्रत्यक्षात हा चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित व्हायला 4 फेब्रुवारी 1972 ही तारीख उजाडली.  तत्पूर्वी, 3 फेब्रुवारी 1972 रोजी प्रसिद्ध मराठा मंदिरमध्ये याचा भव्य प्रीमियर सुद्धा झाला. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, याची सुरुवात ब्लॅक अँड व्हाइटपासून झाली आणि प्रत्यक्षात चित्रपट पूर्ण झाला तो सिनेमास्कोपमध्ये.

    या मधल्या काळात हा चित्रपट चर्चेत होता आणि नंतर झळकल्यावरही तो सर्वत्र चर्चेतच राहिला. सुरुवातीला धर्मेद्रला घेऊन या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली. पण नंतर वैयक्तिक कारणावरून त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि त्याच्या जागी राजकुमारला संधी देण्यात आली. त्याचबरोबर कमाल अमरोही आणि मीना कुमारी या दाम्पत्यात झालेला बेबनाव. यामुळे हा चित्रपट रखडला आणि चर्चेतही राहिला. त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा तो चर्चेत आला तो ‘पाकीजा’च्या संगीतावरून!

    पाकीजा चित्रपटातील गीते अजरामर ठरली. इन्हीं लोगों ने…, ठाडे रहियो…, चलते चलते…, मौसम हैं आशिकाना…, तीर-ए-नजर देखेंगे…, चलो दिलदार चलो… ही गाणी आजही कानावर पडली की, मन प्रसन्न होते. पण अलीकडच्या काळात संगीतावरून चित्रपटाला वादाची किनारही जोडली गेली होती. या गीतांना संगीत देणारे गुलाम महंमद यांचे पुत्र मुमताज महंमद यांनी प्रसिद्ध संगीतकार नौशाद यांचे संगीतकार म्हणून नाव देण्यास आक्षेप घेतला होता. ‘पाकीजा’मधील गीतांच्या संगीताचे श्रेय नौशाद घेत असून त्यांनी आम्हाला रॉयल्टीही दिली नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. यातील अजरामर गाण्यांना संगीत गुलाम महंमद यांनी दिले आहे. मात्र चित्रपट पूर्ण होण्यास खूप कालावधी लागला आणि त्यादरम्यान त्यांचे निधन झाल्याने पार्श्वसंगीताची जबाबदारी कमाल अमरोही यांनी नौशाद यांच्याकडे सोपविली होती. नेमका त्यावरूनच वाद निर्माण झाला होता.

    नौशाद यांना उस्ताद झंडे खाँ यांच्याकडे पहिली संधी माझे वडील गुलाम महंमद यांनी दिली. त्या वेळी गुरखा त्यांना आतही येऊ देत नव्हता. पण माझे वडील नौशाद यांच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठे होते. त्यांना घेऊन ते उस्ताद झंडे खाँ यांच्याकडे घेऊन गेले आणि आपला भाऊ इब्राहिम यांच्या जागी त्यांना ठेवण्याची विनंती केली, असा दावा मुमताज महंमद यांनी केला होता.

    ‘मिर्झा गालिब’ चित्रपटाचे संगीत ऐकून कमाल अमरोही यांनी गुलाम महंमद यांच्याशी संपर्क साधला, असे मुमताज महंमद सांगतात. या उलट नौशाद यांचा असा दावा आहे की, अमरोही यांना आपण गुलाम महंमद यांचे नाव सुचविले. गुलाम महंमद यांनी सहाय्यक म्हणून आपल्याकडे 20 वर्षे काम केले.

    चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नौशाद यांनी पाकीजाची लाँग प्ले रेकॉर्ड बनविली. त्यात राजकुमारी यांचे ‘नजरीया की मारी’, वाणी जयराम यांच्या आवाजातील ‘मोरा साजन’ आणि परवीन सुलताना यांचे ‘कौन गली’ ही बॅकग्राऊंड गीते आहेत. पण त्यांनी ‘ये धुवाँ सा कहाँ उठता है…’ ही बॅकग्राऊंडला असलेली गझल का नाही टाकली? असा सवाल मुमताज यांनी उपस्थित केला होता. वस्तुतः ही गझल मेहंदी हसन यांची आहे आणि जशीच्या तशी वापरली आहे. म्हणून ती या लाँग प्लेमध्ये वापरली नाही, असा दावाही त्यांनी केला होता.

    तथापि, नौशाद यांनी त्याचवेळी हे सर्व आरोप आणि दावे फेटाळून लावले. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत संगीतकार म्हणून गुलाम महंमद यांचे, तर पार्श्वसंगीत म्हणून माझे आहे. तसेच पार्श्वसंगीताबाबत कमाल अमरोही यांच्यासमवेत करार करताना रॉयल्टीची अट आपण ठेवली होती. त्यानुसार ती आपल्याला मिळाली, असे त्यांनी स्पष्ट करून या वादावर पडदा टाकला होता.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026 फिल्मी

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026 फिल्मी

    एक अकेला इस शहर में…

    February 27, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    By Team AvaantarMarch 16, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आज माझ्या खूप लाडक्या अभिनेत्रीबद्दल सांगणार…

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026

    एक अकेला इस शहर में…

    February 27, 2026

    Flirting… काही असेही अनुभव!

    February 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn