Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»आराध्या गुरूंची शिष्या बनणार! हाच सल निशाच्या मनात…
    ललित

    आराध्या गुरूंची शिष्या बनणार! हाच सल निशाच्या मनात…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 20, 2026Updated:March 17, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्या, आराध्या शिवा, आराध्याचे आईवडील, आराध्याचा लढा, आराध्याचे रूप, आराध्या तन्वी, तन्वीचा उर्मटपणा, आराध्याचा साधेपणा, दादा गुरूंचे दर्शन, दादा गुरुंचा आशीर्वाद, आराध्याचा नवा अध्याय, आराध्याचा नवा प्रवास,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रणाली वैद्य

    भाग – 13

    निशा पुन्हा म्हणाली… “कोणी विचारलं की म्हणायचं, माझे क्लास आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, मी जाऊ शकत नाही. आणि हो… त्या आराध्यासारखा गोंधळ घालायचा नाही. तिनं किती गुण मिळवलेत ते कौतुकाचं नाही…”

    “तिचं मार्क मिळवणं तेवढंच सगळ्यांना दिसतंय. पण काही दिवस थांब… तू काय आहेस, हे सगळ्यांना दाखवून दे!”

    अन्वी शांत होती, पण तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती. तिच्या मनात एक कट तयार होत होता… आराध्या जणू तिच्या आयुष्यावर सावलीसारखी पसरलीय, आणि आता ती सावली पुसून टाकण्याची वेळ आली होती… त्या रात्री, खोलीच्या चार भिंतींमध्ये एक बिघडलेली विचारधारा खोलवर रूजत होती… आणि भविष्यात एक वादळ नक्कीच काहीतरी बदलून टाकणार होतं…

    सुमित्रा आजींच्या येण्याने जणू घराला नवा श्वासच लाभला होता. त्यांच्या बोलण्याने, गोड सल्ल्यांनी आणि सहज हास्याने सगळं घर भारलेलं होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत घरभर एक वेगळंच चैतन्य फिरत होतं —म्हणजे अगदी देवळातल्या शांततेसारखं, पण तरीही गप्पागोष्टींनी, हसण्या-खिदळण्याने भरलेलं.

    स्वयंपाकघरात प्राजक्ता अगदी मनापासून काही ना काही खास बनवत होती, कारण तिला वाटायचं की, सुमित्रा मावशींसाठी जे करावं ते थेट मनापासूनच… आजी तर त्यांच्या जुन्या आठवणी सांगण्यात रमलेल्या आणि त्यांच्या मैत्रिणीच्या प्रसन्न उपस्थितीमुळे अगदी टवटवीत भासत होत्या.

    हेही वाचा – आराध्याच्या घरात एकीकडे अध्यात्म तर दुसरीकडे कटकारस्थान…

    सुशांतही हे सगळं पाहून सुखावला होता. नाहीतर त्याचं घर म्हणजे एक अघोषित रणांगणच होतं— एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून आपल्या वाहिनी निशाचं प्राजक्तावर कुरकुरणं, आपल्या मुलीला सतत बोल  लावणं आणि घरातल्या शांततेवर सतत पडणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या सावल्या…

    पण आता… सुमित्रा मावशींच्या बोलण्यामुळे, गप्पांमुळे, आणि त्यांच्या सहज असण्यानं एक सुसंस्कृत, समाधानी वातावरण तयार झालं होतं. सुशांतला वाटलं, “हेच खरं घर असतं बहुतेक… जिथे प्रत्येक सदस्याचा आवाज ऐकला जातो, कुणाचं अस्तित्व हरवत नाही, आणि जिथे प्रेमाला संवादाची जोड मिळते.”

    त्या रात्री तो शांतपणे गॅलरीत उभा होता, हातात चहा आणि मनात समाधान. काही क्षण त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि डोक्यात एक विचार — “जर असंच वातावरण टिकून राहिलं, तर या घरात खरंच एक नवा सूर उमटेल…”

    प्राजक्ताने गॅलरीच्या दरवाजातून सुशांतकडे नजर टाकली. त्याच्या चेहऱ्यावर असलेली शांतता, डोळ्यांत असलेली समाधानाची झलक तिचं मन हेलावून गेली. इतक्या वर्षांनी ती त्याला इतकं निश्चिंत, निवांत पाहत होती. ना कसला ताण, ना चिंता… जणू आयुष्याचा एक भार उतरून गेलेला! तिने हवेवर फडफडणाऱ्या  आपल्या केसांनां मागे घेतलं आणि शांत मनाने एक प्रार्थना केली —

    “देवा, असंच राहू दे सगळं… हे घर, ही माणसं, आणि हे समाधान! सुशांतच्या चेहऱ्यावरचं हे हसू टिकवून ठेव. किती दिवसांनी तो असा दिसतोय… किती दिवसांनी मलाही असं काहीतरी भरून येतंय…”

    तिने तिथूनच त्याच्याकडे पाहून हळूच एक मंद स्मित केलं. सुशांतनेही तिच्या नजरेचा अर्थ ओळखून डोळ्यांनीच प्रतिसाद दिला. काही शब्द न बोलता त्यांच्या नजरा संवाद साधून गेल्या. क्षणभर घराच्या पाठीमागे उगवणाऱ्या चंद्रप्रकाशात त्या दोघांच्या नात्यात एक नवं तेज चमकलं… जणू नव्याने काही सुरू व्हायचं होतं.

    घराच्या त्या कोपऱ्यातल्या खोलीत निशा हातात मोबाइल घेऊन चिडचिड करत फिरत होती. तिच्या कपाळावर आठ्या… ओठ आवळलेले… ती आपल्याच विचारात बुडालेली होती. कधी समोरच्या आरशात स्वतःकडे कटाक्ष टाकत, कधी खिडकीबाहेर डोकावत होती, पण विचारांनी ती खवळत होती…

    “चार दिवस राहायला आली आहे म्हटली आणि बघता बघता घरातले सगळेच तिच्या बाजूला वळले. ही म्हातारी म्हणजे चालती-बोलती जादू आहे बहुतेक… हिने सगळ्यांवर एवढी काय जादू केली?”

    निशाची नजर आता आराध्याकडे रोखली  गेली होती… “हिचं तर वेगळंच चाललेय… गप्प बसून ती सगळ्यांचं मन जिंकतेय… आईबाप, आजी, अगदी  आजूबाजूचे  इतर लोक सुद्धा! हे सगळे तिच्याच बाजूला आणि माझी अन्वी? ती तर नुसती  दुर्लक्षित!  ना कोणी तिच्याकडे पाहात, ना कोणी  तिला विचारत…”

    “बिचारी एकटीच  दिवसभर त्या फोनवरच काही तरी करत बसते… एकदा तरी कुणी मला विचारलं का की, कसं काय चाललंय? काय हवं, काय नको, ते पाहायला आले का?”

    तिने जोरात दरवाजा लावला आणि बिछान्यावर आपलं अंग सोडून दिलं.

    “ही म्हातारी आणि ही काळी आराध्या दोघींचं संग होतंय आता. पण मी काही गप्प बसणार नाही. मी काही माझं अस्तित्व गमावणार नाही… एक दिवस ही म्हातारी जाईल आणि  सगळंच पुन्हा माझ्या हातात येणारच!”

    त्या खोलीतली हवा जड झाली होती — जशी एखाद्या वादळापूर्वीची शांतता असते, तशीच… निशाच्या डोळ्यांत एक तीव्रते संतापाची झलक होती… राग, असूया आणि धगधगणारी आकांक्षा… तिचं मन एक निर्णय घेऊन उठलं होतं. निशा दार उघडून एकदम बाहेर आली. तिच्या चालण्यात एक उद्धटपणा होता… टोकदार नजरेनं ती सरळ बैठक खोलीत आली, जिथं सुमित्रा मावशी, लक्ष्मी आजी, प्राजक्ता आणि बाकी सगळे निवांत गप्पा मारत बसले होते. वातावरणात आल्हाददायक गोडी होती, पण निशाच्या येण्याने त्या गोड हवेत एक तिरकस वळण आलं.

    सुमित्रा मावशींनी तिला पाहिलं आणि चेहऱ्यावर अजिबात खवळलेपणा न आणता सौम्यपणे बोलल्या…

    “काय गं, आता येतेस? मी रोज तुझी वाट पाहात होते. म्हटलं, येईल बोलायला… कधी बसूया जरा, जुन्या आठवणी काढू, मन मोकळं करू… पण तू काहीच आली नाहीस… लक्ष्मीला विचारलं तर तिचं एक नाही की, दोन नाही… मी उद्या निघायचं म्हणतेय… आणि तू बघ आता आलीस!”

    सुमित्रा मावशींचा सूर प्रेमळ होता, पण त्या शब्दांमागे सौम्य चिमटे होते. निशाच्या चेहऱ्यावरचे भाव कठोर होते. डोळे क्षणभर गोंधळले, पण ती लगेच सावरली! “माफ करा मावशी, थोडं बिझी होते. काय आहे ना, हल्ली वेळच मिळत नाही आणि तुम्ही इतकं भरभरून बोलत होतात म्हणे, कुठं मधे मधे यावं?”

    सुमित्रा मावशी ओळखून होत्या तिच्या बोलण्यामागचा उपरोध, पण तरीही त्यांनी केवळ हसून… “बरंय, बरंय… उशिरा का होईना, आलीस तरी! ये, बस. दोन शब्द बोलूया. आपण दोघी इतक्या वर्षांनी भेटलोय!.”

    पण निशा मात्र थेट बसली नाही, तिचं मन अजूनही कुठल्याशा खवळलेल्या लाटांमध्ये अडकलेलं होतं… आराध्या काहीशी दूर उभी होती. सुमित्रा मावशींच्या शेजारी आणि निशाच्या डोळ्यातून त्या क्षणी कडवटपणाच ठसठसून झळकत होता

    सुमित्रा मावशी आणि निशा समोरासमोर बसल्या असल्या तरी, दोघींमध्ये शब्दांशिवाय एक भावनिक कुरघोडी सुरू झाली होती. निशा बाहेरून शांत असली तरी आतून भडका उडाला होता. तिने नजर आराध्याकडे वळवली, तिच्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव, डोळ्यांतील आत्मविश्वास, आणि सुमित्रा मावशींच्या डावीकडे मिळालेलं स्थान… हे सगळं निशाच्या मनात खलत होतं.

    हेही वाचा – समोर माधव होता, आराध्याच्या मनात डेंजर अलार्म वाजायला लागला…

    तितक्यात सुमित्रा मावशी हळूच प्राजक्ताकडे वळल्या… “तुझी ही लेक आराध्या फार विशेष आहे गं… डोळ्यांत काहीतरी वेगळं तेज आहे हिच्या. शांत असली तरी खूप खोल विचार करते, असं जाणवतं मला…”

    प्राजक्ताला भरून आलं…

    “तुम्ही ओळखलंत मावशी. माझ्या आराध्यात काहीतरी आहे, जे शब्दांत सांगता येत नाही… पण आहे. फार आहे…”

    हे निशाला अजूनच खटकलं. तिच्या कपाळावरच्या आठ्यांचं जाळं आणखी वाढलं… ती अजून काही बोलणार, इतक्यात आराध्या उठली आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेत म्हणाली…

    “मावशी, तुम्ही उद्या निघताय ना? मी पण तुमच्यासोबत येतेय काही दिवस… काही वेगळं शिकायला मिळेल. आणि मनही शांत होईल थोडं…”

    सगळे स्तब्ध झाले. प्राजक्ताला आश्चर्याचा धक्का बसला! आराध्या पण लगेच जायला निघाली… तिने लगेच मूक संमती दिली. सुमित्रा मावशींच्या चेहऱ्यावर मात्र  आनंद स्पष्ट दिसत होता… जणू काही त्यांनाही काही गवसलं होतं…

    निशा मात्र आणखी संतप्त झाली होती… “ही काळी आराध्या… आता गुरूंची शिष्या बनणार?” तिच्या मनात कुजलेल्या विषासारखे विचार सळसळू लागले…

    क्रमशः

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn