Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अवांतर»देवानं पृथ्वीला औषधांनी सजवलंय…
    अवांतर

    देवानं पृथ्वीला औषधांनी सजवलंय…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 18, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, पॅरासेल्सस, विष अमृत, पृथ्वीवर औषधांचा खजिना, प्रत्येक वस्तू विषारी, विषातून औषध, धातूंपासून औषध, अल्केमी रासायनिक औषध,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    डोकं दुखतं म्हणून सकाळपासून पाच गोळ्या खाल्लेला पेशंट आता इंजेक्शन घ्यायला ओपीडीत आला होता. कुलूपाला पन्नास चाव्या लावून उपयोग नसतो, ते त्याच्या एकाच चावीनं उघडतं, तद्वतच, दुखण्याच्या कारणावर उपचार केले की, दुखणं आपोआप थांबतं. आजच्या काळात लोक इतके घोळ घालतात, जेव्हा औषधशास्रच पाळण्यात होतं तेव्हा किती, कशी औषधं खात असतील लोक? मला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेत टॉक्सिकॉलॉजीच्या प्रॅक्टिकलला पाच गुणांना विचारल्या जाणाऱ्या ‘त्याची’ आठवण झाली…

    पंधराव्या शतकात तर वैद्यकशास्रात अद्यापही उजाडायचं बाकी होतं; रोगांचं मूळ दैवी कोपात आहे असं सगळे मानायचे… जादूगार, भूतबाधा, देवाचा कोप या त्रिसूत्रीनं वैद्यकशास्त्र वेढलेलं होतं… अशातच एका रात्री स्विस आल्प्सच्या पर्वतरांगांमध्ये एका लहानश्या खेड्यात त्याचा जन्म झाला…

    थिओफ्रॅस्टस फिलिपस ऑरिओलस बॉम्बस्टस वॉन होहेनहेम इतकं सहजसोपं त्याचं नाव, ज्याला जगानं पुढं ‘पॅरासेल्सस’ म्हणून ओळखलं… हा पठ्ठ्या लहानपणापासून धातूंना, दगडांना आणि जडीबुटींनाही बोलता येतं असं समजायचा! त्याचा विश्वास होता की, निसर्गात प्रत्येक आजाराचं औषध आधीच आहे, फक्त आपल्याला ते शोधायचं आहे!!

    हेही वाचा – कर्तव्य, करुणा आणि बलिदानाचं प्रतीक… डॉ. कार्लो उर्बानी

    पुढं तो ‘अल्केमी’ शिकला; म्हणजेच धातूंच्या रूपांतरणाचं गूढशास्त्र. लोक सोनं बनवण्याचे एक ना अनेक वेडेवाकडे प्रयत्न करत होते, पण पॅरासेल्सस म्हणाला, ”मला सोनं नकोय, मला त्याहून उत्तम काहीतरी हवंय… ते म्हणजे माणसांचं आरोग्य!”

    तो अल्केमीचा वापर करून रासायनिक औषधं तयार करू लागला… त्यानं पहिल्यांदा पारा-गंधक आणि मीठ या तत्वांचा वापर औषधनिर्मितीत केला. त्याच्या प्रयोगशाळेतून येणारा धूर, विचित्र वास आणि चमकणाऱ्या पदार्थांमुळं लोक त्याला ‘चेटूक करणारा’ म्हणू लागले.

    “डोसचं प्रमाण ठरवतं की, औषध विष होईल की, अमृत!”

    हे वाक्य आज आधुनिक फार्माकोलॉजीचा पाया आहे, पण त्या काळात ते चक्क वेडसरपणा मानलं जायचं… पॅरासेल्सस म्हणायचा, ”जगातील प्रत्येक गोष्ट विषारी आहे; फक्त त्याचं प्रमाण ठरवतं की, ती औषध ठरेल की विष!”

    ही कल्पना चक्क त्याने प्रत्यक्षात आणली. त्यानं पार्‍याचं, शिस्याचं आणि इतर विषारी धातूंचं सूक्ष्म प्रमाणात औषधांमध्ये वापर करून अनेक आजार बरे केले; विशेषतः, सिफिलिस अर्थात, त्या काळातील भयंकर लैंगिक रोग! लोक अचंबित झाले… ”विषातूनच औषध?”

    हेही वाचा – विलोजब्रुकमधील वेदनांचे हुंकार

    त्या काळातील चर्च आणि वैद्यक संस्था संतप्त झाल्या. त्यानं जुन्या वैद्यक ग्रंथांना उघडपणं जाळलं आणि जाहीरपणं म्हटलं, ”हिप्पोक्रेटिस आणि गॅलेन माझ्यासाठी देव नाहीत, मी त्यांना मानत नाही.” पॅरासेल्ससला प्रत्येक शहरातून हाकलून देण्यात आलं. कधी झुरिक, कधी साल्झबर्ग तर, कधी बासेल… तो सतत भ्रमंती करत राहिला. त्याचं व्याख्यान म्हणजे अर्धं विज्ञान, अर्धं तत्वज्ञान आणि थोडं रहस्य, रोचक-रंजक आणि प्रचंड रोमांचक… तो विद्यार्थ्यांना सांगायचा, ”औषध बनवताना फक्त पदार्थ पाहू नका; त्याचं आत्मतत्त्व ओळखा!”

    कधी तो पर्वतांमध्ये औषधी झाडं शोधत असे तर, कधी रात्रभर धातू वितळवत प्रयोग करत असे… तो म्हणायचा, ”देवानं पृथ्वीला औषधांनी सजवलंय; फक्त माणसानं ती ओळखायचीयत.”

    1541 मध्ये तो अकाली मरण पावला. काहींचं म्हणणं, त्याला विषबाधा झाली… तर काही म्हणतात, त्यानं स्वतःच्या प्रयोगात मृत्यू पत्करला… पण त्याच्या मृत्यूनंतर मात्र जग बदललं. पुढच्या पिढ्यांसाठी तो “Father of Toxicology” ठरला!

    त्याच्या विचारांनी पुढं रसायनशास्त्र, औषधशास्त्र आणि मानसशास्त्र या तिन्ही क्षेत्रांना एक नवीन आणि ठोस दिशा दिली.., “विज्ञानाचं काम केवळ रोगावर उपचार करणं नाही, तर त्या मागच्या निसर्गाला समजून घेणं आहे.” हे त्याचं अजरामर वाक्य आजही प्रत्येक डॉक्टरांना मार्गदर्शक ठरतं!

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026 अवांतर

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर…

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026

    अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn