Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»संसाराच्या आईस्क्रीमचे तीन फ्लेवर्स!
    ललित

    संसाराच्या आईस्क्रीमचे तीन फ्लेवर्स!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 16, 2026Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, संसाराचे आईस्क्रीम, त्यांची प्रेमकथा, सहजीवनाचा पाया, परस्पर प्रेम, परस्पर विश्वास, परस्पर आदर, आईस्क्रीम पार्लर,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सतीश बर्वे

    मला घेऊन गाडी निघाली पुण्याला आणि मी मागच्या सीटवर बसून जुने दिवस आठवत राहिलो… कॉलेजपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये ते दोघे मला पहिल्यांदा भेटले होते. कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत ते दोघे शिकत होते. ते नुसतेच मित्र नव्हते, हे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सहज समजत होते. कॉलेज सुटल्यावर घरी जाताना आठवड्यातून दोन-तीन दिवस तरी आईस्क्रीम खायला येत असत. काही दिवसांतच त्या दोघांची आणि माझी ओळख झाली… आणि पुढे पुढे ती कधी इतकी वाढली ते आमचं आम्हालाच कळलं नाही.

    जेवढा जीव त्यांचा एकमेकांवर होता, तेवढीच लुटुपुटीची भांडणं देखील व्हायची त्यांच्यात आणि ती शेवटी सोडविण्यासाठी माझ्याकडे यायचे दोघे. बघता बघता ते पदवीधर झाले आणि आमच्यातला रोजचा संवाद संपुष्टात आला. तो पुण्याला गेला पदव्युत्तर शिक्षण घ्यायला आणि ती मुंबईमध्येच नोकरीला लागली. तिनेच हट्टाने आमचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आणि आमच्यातला संवाद पुन्हा सुरू झाला…

    एक दिवस तो मुंबईत आला होता, कामाच्या निमित्ताने आणि आम्ही तिघे जवळपास तीन-चार वर्षांनी भेटलो. गप्पांच्या ओघात ते दोघेही मॅच्युअर झाल्याचे जाणवले. पुढच्या एक-दोन वर्षांत त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला होता. ते होणारच होते, पण अधिकृतपणे त्यांनी मला सांगितले.

    हेही वाचा – मुलाचं परदेशी शिक्षण अन् मातृत्वाची परीक्षा!

    सहजीवन म्हणजे काय, हे त्यांना छानपैकी समजावून सांगितले. परस्पर प्रेम, विश्वास आणि आदर हे सहजीवनाचे महत्त्वाचे खांब आहेत, ज्यावर संसाराचा गाडा सुरळीत चालू रहातो. यातला एक खांब जरी डळमळीत झाला तरी, परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागत नाही. आजवर तुमची लुटुपुटीची कैक भांडणं मी सोडवली. पण आता ते कदाचित शक्य होणार नाही मला… परस्पर प्रेम, विश्वास आणि आदर या फ्लेवर्सचे आईस्क्रीम संसाराच्या कपात पूर्णपणे विरघळेल याची खात्री तुम्हा दोघांना कायमच बाळगावी लागेल, जेणेकरून त्या तिन्ही आईस्कीमची एकत्रित चव म्हणजेच – ‘तुमचा संसार एक आदर्श संसार’ म्हणून संबंध जगात आदराने बघितला जाईल.

    हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!

    नंतर इतर अनेक विषयांवर आमची चर्चा रंगली आणि त्यांचा संसार सुखाचा होईल याची मला खात्री पटली. आज त्या दोघांचे लग्न होते, ज्यासाठी दोघांनी हट्टाने मला गाडी पाठवली होती पुण्याला यायला. एव्हाना कर्वे रोडवरील एका मंगल कार्यालयाजवळ माझी गाडी थांबली. मी उत्सुकतेने खाली उतरून पायऱ्यांच्या दिशेने चालायला सुरुवात केली…


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avantar.creativemarketix.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn