Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 12 फेब्रुवारी 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 12 फेब्रुवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 12, 2026Updated:March 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 12 फेब्रुवारी 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 23 माघ शके 1947; तिथि : दशमी 12:21; नक्षत्र : ज्येष्ठा 13:41
    • योग : हर्षण 27:04; करण : बव 25:26
    • सूर्य : मकर; चंद्र : वृश्चिक 13:41; सूर्योदय : 07:09; सूर्यास्त : 18:36
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – नोकरदारांना कामाचा ताण फारसा जाणवणार नाही. सहकारी आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आज दुपारनंतर कामाला गती मिळेल. मार्केटिंगमध्ये सहभागी असलेल्यांना मोठा फायदा होऊ शकतो. महत्त्वाच्या करारांविषयीची चर्चा तूर्तास पुढे ढकलणे फायदेशीर ठरेल. आज आरोग्यात सुधारणा होईल. पालकांशी होणारे  संभाषण सकारात्मक असेल.

    वृषभ – आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य द्या. भावनिक संबंधांवर अवलंबून राहणे कमी करा, त्याचा  तुम्हालाच फायदा होईल. भागीदारी व्यवसायातील संवाद सकारात्मक असतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, नव्या ओळखी होतील. समाजात तुमचा  प्रभाव वाढू शकतो. फक्त रागावर नियंत्रण ठेवा.

    मिथुन – वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी, तुम्हाला तुमची कार्यक्षमता वाढवावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीत बदल करा, जास्तीत जास्त काम उरकण्यावर भर द्या. आज निराशेला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा.

    कर्क – नवीन प्रशासकीय जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. तुमच्यावर होणारी टीका सकारात्मकतेने स्वीकारा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. व्यवसायात नवीन भागीदारी विकसित होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात रस वाढेल. आज प्रेमसंबंध दृढ होतील.

    सिंह – मित्रांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल. कामाच्या यशाने तुम्ही उत्साहित बनाल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन इतरांना प्रेरणा देईल. कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्च कमी करा. हितचिंतक असल्याचे दर्शवणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांना ओळखा, सावध राहा.

    कन्या – आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक आघाडीवर घेतलेला धाडसी निर्णय नफा वाढवू शकतात. तथापि, गुंतवणूक करताना अतिउत्साहात मोठी जोखीम घेऊ नका. कुटुंबातील सर्वांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. त्यामुळे सर्वांशी सुसंवाद ठेवा. कुटुंबीयांचाही पाठिंबा मिळेल.

    हेही वाचा – फेरे नशिबाचे… तिचे भरडणे!

    तुळ – कला आणि साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्यांचे त्यांच्या कलाकृती आणि प्रयत्नांबद्दल समाजात कौतुक होईल. आर्थिक लाभही मिळतील. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचे दीर्घकालीन परिणाम बघायला मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवा, अनावश्यक खरेदी टाळा.

    वृश्चिक – कामाच्या ठिकाणी मेहनतीची दखल घेतली जाईल. नवे पद अथवा नवी जबाबदारी सोपविली जाऊ शकते. कायमस्वरूपी प्रॉपर्टी उभारण्याबाबत ठोस निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. आपल्याच प्रियजनांवर शंका घेणे आज त्रासदायक ठरू शकते. संततीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज मोठा खर्च केला जाण्याची शक्यता आहे.

    धनु – संतुलित आणि नियोजित कृतींना प्राधान्य देऊन सावधगिरीने पुढे जा. विरोधक तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. वाद घालण्याऐवजी, चांगल्या कृतीद्वारे विरोधकांना प्रत्युत्तर द्या. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवा. नवे तंत्रज्ञान जाणून घ्या, व्यवसायात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो.

    मकर – आज तुमच्या कामात सातत्य ठेवा. चर्चेत वेळ घालवण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रीत करा. वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. शारीरिक श्रम करणाऱ्यांना आर्थिक लाभ होईल. अनावश्यक खर्चामुळे बजेट कोसळणार नाही, याची काळजी घ्या. आज जोडीदाराबरोबरचा तणाव कमी होईल. तब्येत सांभाळा.

    कुंभ – पूर्वी केलेल्या कामाचे मोठे फायदे आता तुम्हाला मिळतील, त्यामुळे तुम्ही उत्साहित रहाल. नवीन प्रयत्नांसाठी कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. स्पर्धात्मक यश मिळण्याची आज मोठी शक्यता आहे. नोकरी बदलण्याचे किंवा मुलाखती देऊन त्याद्वारे नोकरी मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

    मीन – मानसिक ताण कमी होईल. प्रभावशाली व्यक्तींना भेटल्याने तुमच्या कामाची दिशा बदलू शकते. जोडीदार एकमेकांच्या करिअरमध्ये मदत करतील. आर्थिक मदत देखील वाढेल. मात्र कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे चांगले असेल. तसेच, वादाची शक्यता दिसल्यास त्यापासून लांब राहा.


    दिनविशेष

    मराठीतील फुलराणी भक्ती बर्वे इनामदार

    टीम अवांतर

    मराठीतील फुलराणी असणाऱ्या भक्ती बर्वे यांचा जन्म 10 सप्टेंबर 1948 रोजी मुंबईत झाला. भक्ती बर्वे यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकला करण्यापासून त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली. त्यांचे पाठांतर उत्तम असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्या दूरदर्शनवर निवेदनही करायला लागल्या. दूरदर्शनवर रविवारी सकाळी सादर केली जाणारी साप्ताहिकी केवळ त्यांच्या निवेदनासाठी बघितली जायची. याशिवाय दूरदर्शनवरील काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. बहिणाबाईंच्या गाण्यांवर आधारित असलेल्या ‘बहिणाबाई’ या सांगीतिक कार्यक्रमात त्या झळकल्या होत्या.

    पुढे त्या मराठी नाटकांमध्ये काम करायला लागल्या. त्यांची भूमिका असलेली जवळपास सर्वच नाटके सुपर हिट ठरली. ‘नाटक आणि भक्ती बर्वे’ हे समीकरणच त्यावेळी तयार झाले. त्यामुळेच मराठी रंगभूमीवर भक्ती बर्वे या एकमेव स्त्री स्टार तयार झाली. ‘ती फुलराणी’ हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या कारकीर्दीचा अत्युच्च टप्पा होता. या नाटकाचे 1111 हून अधिक प्रयोग झाले. ‘आई रिटायर होतेय’ या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण 950 प्रयोग झाले. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना 1990 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

    हेही वाचा – Poetry : अपूर्ण अन् रातराणी…

    भक्ती यांनी केवळ मराठी नाटकेच नव्हे तर गुजराती आणि हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले. भक्ती बर्वे यांनी केलेल्या नाटकांमध्ये अखेरचा सवाल, अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा (बालनाट्य), अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होतेय, (मराठी आणि गुजरातीत-बा रिटायर थाय छे) आधे अधुरे, (हिंदी आणि मराठी) आले देवाजीच्या मना, कळलाव्या कांद्याची कहाणी (बालनाट्य), गांधी आणि आंबेडकर, घरकुल, चिनी बदाम (बालनाट्य), जादूची वेल (बालनाट्य), टिळक आणि आगरकर, ती फुलराणी, दंबद्वीपचा मुकाबला, पपा सांगा कुणाचे, पळा पळा कोण पुढे पळे तो, पुरुष, बाई खुळाबाई, बूटपॉलिश, माणसाला डंख मातीचा, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी (मराठी, हिंदी आणि गुजराती) वयं मोठं खोटम्, (बालनाट्य) शॉर्टकट, सखी प्रिय सखी, हँड्स अप सारख्या नाटकांचा समावेश होतो. “नाटक हा माझा प्राण आहे,” हे वाक्य त्या अक्षरशः जगल्या आणि मराठी रंगभूमी आपल्या लक्षवेधी अभिनयाने या चतुरस्र अभिनेत्रीने गाजवली.

    भक्ती बर्वे यांनी या संपूर्ण कारर्कीदीमध्ये फक्त दोनच चित्रपट केले. एक म्हणजे 1983 साली ‘जाने भी दो यारों’ तर 1998 साली ‘चौरसिया की माँ’. शूटींग संपवून वाईहून मुंबईला परत येत असताना भक्ती बर्वे यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 12 फेब्रुवारी 2001 रोजी मराठी रंगभूमीची ही कसदार अभिनेत्री कायमची आपल्यातून निघून गेली.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn