Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»योगाभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
    आरोग्य

    योगाभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेFebruary 7, 2026Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, निरामय आरोग्य, निरामय मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, व्यावसायिक आरोग्य, सखोल योगाभ्यास, पतंजली अष्टांग योग, अष्टांग योग,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आरोग्य सदरातील विविध लेखांद्वारे आपण मनाचे आरोग्य आणि मानसिक ताणतणाव याबाबत जाणून घेतले. आपल्याला निरामय शारीरिक आणि मानसिक आरोग्य हवे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या मानसिकतेत आमूलाग्र बदल करायला हवेत, हे वास्तव देखील आपण जाणून घेतले. या लेखात तथा पुढील काही लेखांमधून आपण निरामय मानसिक आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी विविध उपाययोजनांबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

    वास्तविक पाहता, आपण निरामय आरोग्याच्या वाटचालीची सुरुवात निसर्गसुसंगत दिनचर्येबद्दल मागील लेखांमधून सविस्तर माहिती घेऊन अगोदरच केलेली आहे. आता आपण योगाभ्यासातून निरामय आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी सविस्तर माहिती घेऊयात.

    योगाचा अर्थ

    • शरीर आणि मन – एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे योग होय.
    • योग ही एक जीवनशैली असून त्यामध्ये शरीराबरोबर मनाचाही विचार केला आहे.
    • शरीर आणि मनाची अत्यंत शुद्ध अवस्था योगाने साधता येते.
    • मनावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण करण्याचा उपाय म्हणजे योग होय.

    हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास

    योगाचा उद्देश

    अतिचंचल मनाला नियंत्रणाने एकाग्र करणे आणि व्याधीग्रस्त शरीराला व्याधीमुक्त करणे हा योगाचा ऊद्देश आहे.

    योगाची व्याप्ती

    योगाची विशाल व्याप्ती योगशास्त्राचे आद्य प्रणेते महामुनी पतंजली यांनी निरामय जीवनासाठी सूत्रबद्ध केलेल्या पुढील अष्टांग योगावरून लक्षात येते :

    1. यम
    2. नियम
    3. आसन
    4. प्राणायाम
    5. प्रत्याहार
    6. धारणा
    7. ध्यान
    8. समाधी

    योगाभ्यास म्हणजे काय?

    सोप्या भाषेत योगाभ्यास म्हणजे योगाचा अभ्यास. योगाभ्यास म्हणजे योग साधना होय.

    योगाभ्यासात प्रामुख्याने पुढील विषयांचा समावेश होतो :

    1. ओंकार जप
    2. प्रार्थना : गुरुवंदना
    3. श्वसन अभ्यास
    4. कपालभाती अभ्यास
    5. प्राणायाम अभ्यास
    6. सूर्यनमस्कार अभ्यास
    7. योगासने अभ्यास
    8. योगनिद्रा अभ्यास
    9. ध्यान अभ्यास
    10. आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यास

    हेही वाचा – निरामय मानसिक आरोग्य

    नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ

    नियमित योगाभ्यास केल्यास साधकास यथायोग्य शारीरिक तथा मानसिक आरोग्य लाभ अनुभवास येतात.

    ‘योगाभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य’ हा लेखाचा विषय लक्षात घेता, नियमित योगाभ्यासाचे मुख्यत्वेकरून मानसिक आरोग्य लाभ पुढील प्रमाणे नमूद करता येतील :

    • मानसिक ताणतणावांशी सामना करण्याचे सामर्थ्य
    • मानसिक शांती आणि आनंद
    • मानसिक संतुलन आणि समाधान
    • मानसिक विकारांपासून मुक्ती

    तात्पर्य – आपले शारीरिक व मानसिक आरोग्य निरामय ठेवण्याचा योगाभ्यास हा एकमेव सर्वोत्कृष्ट प्रभावी राजमार्ग आहे.

    या संदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय मानसिक आरोग्य’ आणि ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वांगीण सर्वसमावेशक सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे. संकल्पनेनुसार पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी मला वैयक्तिक संपर्क करता येईल.

    योगाभ्यासातील समाविष्ट विषयांच्या अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्याबाबत आपण पुढील लेखांत टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत.


    Author

    • रविंद्र परांजपे
      रविंद्र परांजपे
    रविंद्र परांजपे

    Related Posts

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    By रविंद्र परांजपेMarch 14, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले.…

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn