Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अवांतर»हत्ती पकडण्याची कला
    अवांतर

    हत्ती पकडण्याची कला

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 30, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, हत्तींचा कळप, हत्ती पकडणे, हत्ती पकडण्याची कला, युद्धातील हत्ती, सैन्यातील हत्तीदळ, बहुउपयोगी हत्ती, दुर्गाबाईंचा लेख, दुर्गाबाई हत्तींचा अभ्यास,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    यश:श्री

    जंगली हत्ती माणसाळवण्याचे काम हुशार आणि तज्ज्ञ माहुतांवर सोपविले जाते. कळप सुटलेल्या हत्तीला प्रथम शांतं करावे लागते. यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. हे हत्ती एकदा माणसाळले की, ते त्या माहुताच्या सर्व आज्ञा पाळतात. हळूहळू माहुतही त्याला पोटच्या पोराप्रमाणे जपतो. अनेक वर्षे पालनपोषण केलेला, प्रेमाने खाऊ घातलेला हत्ती हरवला किंवा मृत झाला, तर त्याच्या माहुताला खूप दुःख होते. पण याउलट, अनेकदा माहुताला वाचविणारा हत्तीच त्याच्यासाठी यम बनून येतो आणि त्याचा जीव घेतो.

    वास्तविक, हत्तीला प्रशिक्षित करण्याची जशी कला आहे, तशीच त्याला पकडण्याचीही एक कलाच आहे. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखात याचा उल्लेख केला आहे. यासाठी त्यांनी ‘एलिफन्ट इन दि तामिल लॅण्ड (अन्नामलाई विद्यापीठ – 1945) या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. यात हत्ती पकडण्याची पद्धत विशद केली आहे. याशिवाय, भारतीय ज्ञानकोशात (एनसायक्लोपेडिया इंडिया) हत्तीला कशा प्रकारे पकडले जाते, याबद्दल माहिती देण्यात आली आहे. फनेलच्या आकाराचे कुंपण केले जाते. जेव्हा हत्तीचा कळप फनेलच्या आकाराच्या कुंपणातून जात असतो, तेव्हा पाळीव हत्ती तसेच माहुताच्या आज्ञा पाळणाऱ्या हत्तींद्वारे त्या कळपातील एका हत्तीला बाजूला काढले जाते आणि नंतर त्याला लहान कुंपणामध्ये पकडले जाते.

    हेही वाचा – हत्ती आणि युद्ध…

    तर, ‘इंडियन अॅन्टिक्वेरि’मध्ये यासंदर्भात असा उल्लेख आहे की, हत्तीला पकडण्यासाठी एखादी रखरखीत जमीन निवडतात आणि तिथे एक मोठा खड्डा खणतात. माती आणि भरपूर पेंढा पसरवून त्याला आच्छादन केले जाते. नंतर त्याच्या दोन्ही बाजूला छोट्या टेकडीसारखे उंचवटे तयार करतात आणि त्याचा भिंतीसारखा वापर केला जातो. नंतर त्या टेकडीवजा भिंतीच्या बाहेरच्या बाजूला खणून त्यात स्वत:पुरती जागा तयार केली जाते. उजेड येण्यासाठी तसेच बाहेरच्या हालचाली पाहण्यासाठी त्याला लहान-लहान भोकं तयार केली जातात. त्या खड्ड्याच्या आसपास तीन किंवा चार उत्तम प्रशिक्षित अशा हत्तीणी उभ्या केल्या जातात. जेणेकरून, या हत्तीणींचे ओरडणे एकून कळपातील एखादा हत्ती बेसावधपणे त्या कमकुवत पुलावरून जातील आणि त्या खड्ड्यात पडतील. हत्ती खड्ड्यात पकडल्यावर त्याला जेरबंद केले जाते. अनेकदा त्यांना बिथरवून त्या खड्ड्याजवळ आणण्यासाठी ढोल आणि झोजा वाजविले जातात. अशा रीतीने हत्तींना पकडले जात असल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे.

    माणसळवलेला हत्ती हा बहुउपयोगी असतो. प्रामुख्याने अवजड वस्तू वाहून नेण्यासाठी या हत्तींचा वापर केला जात होता. तमिळ भूमिवरील युद्धामध्ये हत्तींना खूपच महत्त्व असे. बुरुज तसेच किल्ल्याच्या दरवाजांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यासाठी तसेच, आवश्यक असलेली वजनदार आयुधे वाहून नेण्यासाठी हत्तींचा उपयोग करण्यात येत असे, असे दुर्गाबाई भागवत यांनी म्हटले आहे.

    हेही वाचा – संवेदनशील हत्ती अन् इंग्रजी साहित्य…

    प्राचीन काळी सैन्याचे हत्तीदळ, घोडदळ, रथदळ आणि पायदळ असे चार स्तर होते. सर्वात पुढे पायदळ असे. पायदळातील सैनिक ‘जिंका किंवा मरा’ या त्वेषाने लढत असे. त्यांच्या मागे हत्तीदळ असे. कारण त्यांचे माजलेलेपण आणि त्वेषाचा त्या युद्धात वापर करता येतो. तथापि, हे गुण घोडदळामध्ये कमी असल्याने हत्तीदळाच्या मागे ते असत. तर, रथ वजनाने भारी असल्यामुळे त्यांची शीघ्रगतीने हालचाल होत नाही. त्यामुळे ते सर्वात मागे ठेवण्यात येत असे. अशाप्रकारचा उल्लेख ‘पुराणनुरू’ मधील अनेक श्लोकात तसेच, तत्कालीन साहित्यात आढळतो.

    केवळ दाक्षिणात्य राज्यांतच नव्हे तर, उत्तर भारतातही मुघल काळातही युद्धात हत्तींचा वापर करण्यात आला. त्याकाळी हत्तींना युद्धात महत्त्वपूर्ण स्थान असे. युद्धात अद्वितीय कामगिरी बजावणाऱ्या हत्तींचा उल्लेखही अनेक तत्कालीन कवींनी आवर्जून केल्याचे आढळते.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026 अवांतर

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर…

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026

    अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn