Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»साप्ताहिक राशीभविष्य : 25 ते 31 जानेवारी 2026
    वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 25 ते 31 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 25, 2026Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    या आठवड्यात बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. कोणते काम आधी करावे, असा प्रश्न पडू शकतो; वरिष्ठांची मदत घ्या. व्यावसायिक वर्गाने ठरलेले कार्यक्रम पुढे ढकलू नयेत. नवीन प्रकल्प मिळतील. तथापि, कायदेशीर बाबी नीट समजून घ्या. महिलांनी कामात चालढकल करू नये; चांगल्या कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांनी वाहने जपून चालवावीत. स्वतःचे वाहन मित्र-मैत्रिणींना वापरायला देऊ नका.


    वृषभ

    या आठवड्यात बहीण-भावांसोबत मजा कराल. नोकरदारांना कामाची फारशी काळजी वाटणार नाही; सहकारी मदत करतील. कामानिमित्त प्रवास घडेल. व्यावसायिक वर्गाला परदेशी व्यवसाय करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे; त्या दृष्टीने प्रयत्न करा. महिलांना प्रवासाचा आनंद मिळेल; त्याचबरोबर तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जायचे असल्यास या आठवड्यात प्रयत्न करा; यश मिळण्याची शक्यता आहे.


    मिथुन

    या आठवड्यात स्वतःसाठी वेळ काढू शकाल. प्रवास कराल; आनंदी राहाल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल, पण वरिष्ठ आणि सहकारी मदत करतील. कामात बदल म्हणून इतरांना मदत करू शकाल. व्यावसायिक वर्गाने प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहावे. व्यावसायिक गुपिते कोणालाही सांगू नका; विश्वासू व्यक्तीलाही नाही. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता असल्याने महिलांनी जपून बोलावे. विद्यार्थ्यांनी कोणाचे भांडण मिटवायला जाऊ नये; मनस्ताप होऊ शकतो.


    कर्क

    हा आठवडा खूप धावपळीचा जाणार आहे. नोकरदारांकडील कामाचा ओघ वाढेल; नियोजन आणि मेहनतीने कामे पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाचे जोडीदाराबरोबर (पार्टनर) वाद होण्याची शक्यता आहे; शांत राहून निर्णय घ्या. महिलांच्या बाबतीत घरातील कामे वाढतील; पाहुणे येतील. महिलांचे जोडीदाराबरोबर वाद होतील. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्यास यश मिळण्याची शक्यता आहे.


    सिंह

    हा आठवडा फिरण्यात आणि मजेत जाईल. नोकरदारांना सहकाऱ्यांसोबत सहलीला जाता येईल; वरिष्ठ खूश राहतील. जुन्या आठवणीत रमाल. व्यावसायिक वर्गाला कामाचा ताण राहील; कनिष्ठांच्या चुका दुरुस्त कराव्या लागतील; चिडचिड होऊ शकते. महिलांना भिशी लागण्याची शक्यता आहे; मैत्रिणींना पार्टी द्याल. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम नोकरी मिळण्याची शक्यता आहे; पॉकेटमनी वाढेल.

    हेही वाचा – फोनवर पुणेरी उत्तरे…


    कन्या

    हा आठवडा आरामात जाईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवणार नाही; सगळी कामे सुरळीत होतील. सहकारी आणि वरिष्ठांची मदत मिळेल. व्यावसायिक वर्गाला जाहिरात केल्यामुळे फायदा होईल; चांगल्या कामाचे कौतुक होईल. राजकीय पक्षांपासून लांब राहावे. महिलांना मुलांकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा क्षेत्रात चमक दाखवता येईल; मेहनतीचे चीज होईल.


    तुळ

    हा आठवडा खूप धावपळीचा असेल. नोकरदारांना काम वेळेत पूर्ण करण्याचा ताण राहील; मनाप्रमाणे साथ मिळेल, पण इतरांवर अवलंबून राहू नका; स्वतः लक्ष द्या. व्यावसायिक वर्गाला नवीन संधी मिळतील; आईच्या ओळखीमुळे कामे होतील. महिलांना माहेरची माणसे भेटतील; आनंदी राहाल. विद्यार्थ्यांना नवीन वाहन खरेदीचा योग आहे; आजोळी जाण्याची शक्यता आहे.


    वृश्चिक

    हा आठवडा शांततेत जाईल. नोकरदारांची कामे मनाप्रमाणे होतील. कामासाठी बाहेरगावी जावे लागण्याची शक्यता आहे. तुमच्यामुळे कंपनीला नवीन कामे मिळू शकतात. व्यावसायिक वर्गाला लहान भाऊ किंवा बहिणीमुळे लाभ होण्याची शक्यता आहे; जुनी येणी वसूल होतील. महिलांना प्रवास घडेल; नवीन ओळखी होतील; देवदर्शनाचा योग आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल; सामाजिक क्षेत्रात काम करता येईल.


    धनु

    हा आठवडा लाभदायक ठरेल. मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरदारांना मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल; नवीन कल्पना राबवू शकाल; वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाची जुनी येणी वसूल होतील. नवीन गुंतवणूक करता येईल; मात्र तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. महिलांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे; कोणालाही दुखवू नका. मित्रांना उसने दिलेले पैसे विद्यार्थ्यांना परत मिळतील; नवीन ओळखी होतील.


    मकर

    या आठवड्याच्या सुरुवातीला आराम असेल; आठवड्याच्या मध्यावर कामाचा ताण वाढेल. सर्वांना खूश करता येणार नाही, हे लक्षात ठेवा; जेवढे शक्य आहे तेवढा प्रामाणिक प्रयत्न करा. व्यावसायिक वर्गावर जबाबदारी जास्त राहील; सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्या. घर आणि ऑफिस सांभाळताना महिलांची तारांबळ उडेल; कशाला प्राधान्य द्यायचे हे अनुभवावरून ठरवा. विद्यार्थ्यांना स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करता येईल; आनंदी राहाल.


    कुंभ

    या आठवड्यात मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, याची तयारी ठेवा. नोकरदारांना दुसऱ्याच्या चुकांमुळे बोलणी खावी लागतील; शांत राहा, लगेच बोलू नका. वातावरण शांत झाल्यावर वास्तव समजावून सांगा. व्यावसायिक वर्गाला नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे; नवीन गुंतवणूक करू नका. महिलांच्या बाबतीत घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आजारपण उद्भवू शकते; काळजी घ्या. विद्यार्थ्यांना प्रवासाचा योग आहे; नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

    हेही वाचा – सारं काही मराठीसाठी!


    मीन

    या आठवड्यात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांवर वरिष्ठ खूश होतील; केलेल्या कामाचे कौतुक होईल; कर्तृत्व सिद्ध करू शकाल. व्यावसायिक वर्गाला व्यापारात फायदा होईल; व्यापारात वाढ होईल; नवीन खरेदी करू शकाल. महिलांच्या कामाचे कौतुक होईल; नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल; वक्तृत्व स्पर्धा जिंकू शकाल.


    prajaktakathe3970@gmail.com

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn