Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 16 जानेवारी 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 16 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 16, 2026Updated:March 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 16 जानेवारी 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 26 पौष शके 1947; तिथि : त्रयोदशी 22:21; नक्षत्र : मूळ अहोरात्र
    • योग : ध्रुव 21:05; करण : गरज 09:21
    • सूर्य : मकर; चंद्र : धनु; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:20
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    प्रदोष

    शिवरात्री

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – करिअरसंदर्भात महत्त्वाचा बदल करण्याचा काही काळापासून सुरू असलेला विचार आज अंमलात आणावयास हरकत नाही. पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. व्यापाऱ्यांना आज नुकसान होऊ शकते. व्यवसाय उत्तम चालावा यासाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. मुलांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

    वृषभ – अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, त्यामुळे डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. आज काळजीपूर्वक वाहन चालवा, अन्यथा दुर्घटना होऊ शकते. मानसिक तणावामुळे, कोणतेही कारण नसताना जोडीदाराशी कदाचित वाद होतील.

    मिथुन – व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आजारपणामुळे काळजी वाटेल. कलात्मक क्षेत्रातील जातकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून वाट पाहात असलेली कीर्ती आणि सन्मान त्यांना मिळेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे.

    कर्क – जे जातक आपल्या नातेवाईकांसोबत बिझनेस करत आहे, त्यांनी आज खूप विचार करून पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. खरोखरचे  हितचिंतक आणि तसा आव आणणारे  यांच्यातील फरक ओळखायला शिका. कामाबाबत तसेच दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपला दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.

    सिंह – बिघडलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत आज आनंदाची बातमी मिळेल. यासोबतच तुम्ही आज कर्जमुक्त होऊ शकतात. आज नोकरीच्या ठिकाणी अचानक तुमचे काम तपासले जाऊ शकते. काहीजण आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याबाबतीत विचार करू शकतात. जोडीदारासोबत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, ही गोष्ट  दीर्घकालीन नात्यासाठी चांगली ठरणार नाही.

    कन्या –  ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होणार नाही.  दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. आज वेळ काढून जोडीदारासोबत कुठेतरी  फिरायला जाऊ शकता. मात्र त्यावेळी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या.

    तुळ – प्रगतीवर असलेल्या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. आज संततीची विशेष काळजी घ्या.  या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात समस्या येऊ शकतात. आजचा किमती वेळ मित्रांच्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे.

    हेही वाचा – श्वास तुझा मालकंस…

    वृश्चिक – आज तुम्हाला प्रसिद्धी मिळेल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. कोणातरी गरजूला अप्रत्यक्ष मदत करता येईल, त्यामुळे समाधान मिळेल. पैशांची कमतरता घरात कलहाचे कारण बनू शकते. घरातील इतरांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

    धनु – शारीरिक वजन नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता आहे. जे जातक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धन लाभ होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी संवेदनशील परिस्थिती सहनशीलपणे हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे, एवढेच तुम्ही करू शकता. तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडत नाहीत, त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका.

    मकर – आपले मत मांडण्यास घाबरू नका. आत्मविश्वास कायम ठेवा, अन्यथा आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. हसतमुखाने अडचणींचा सामना करा. अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्यांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस आहे.

    कुंभ – आयुष्याबद्दल व्यापक दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल, जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यापेक्षा जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा, अपेक्षा यावर लक्ष केंद्रित करा. वडिलधाऱ्यांचा सल्ला आज कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकतो. व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते भविष्याची दिशा दाखवतील.

    मीन – आज लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. आरोग्य चांगले राखल्यामुळे अतिशय व्यग्र असूनही थकवा येणार नाही. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.


    दिनविशेष

    भारतीय आयव्हीएफचे जनक डॉ. सुभाष मुखर्जी

    टीम अवांतर

    भारतात आयव्हीएफ किंवा टेस्ट ट्यूब बेबीचे (Test Tube Baby) जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सुभाष मुखर्जी यांचा जन्म 16 जानेवारी 1931 रोजी बिहारमधील हजारीबाग येथे झाला. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून फिजियोलॉजीची पदवी प्राप्त केली‌. याशिवाय कलकत्ता नॅशनल मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसही पूर्ण केले. त्यानंतर मुखर्जी यांनी कलकत्ता विद्यापीठातूनच ‘रिप्रॉडक्टिव्ह फिजिओलॉजी’ या विषयात पीएचडी प्राप्त केली.

    1967 मध्ये एडिनबर्ग विद्यापीठातून ‘रिप्रोडक्टिव्ह एंडोक्राइनोलॉजी’ या विषयात मुखर्जी यांनी दुसरी पीएचडी पूर्ण केली. पुढे 1968 ते 1975 या काळात कलकत्त्यातील (आताचे कोलकाता) एनआरएस मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओलॉजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

    हेही वाचा – Kitchen Tips : फ्रोजन मटार, टोमॅटोचे सार, वांग्याचे काप बनविताना हे करू पाहा

    जागतिक स्तरावर ब्रिटिश डॉक्टर पॅट्रिक स्टेप्टो आणि रॉबर्ट एडवर्ड्स यांच्यानंतर, भारतात IVF करणारे मुखर्जी हे भारतातील पहिले आणि जगातील दुसरे डॉक्टर ठरले. त्यांच्यामुळे ‘दुर्गा’ (कनुप्रिया अग्रवाल) या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. आजही सुभाष मुखर्जी यांची ही IVF पद्धत बहुतेक पेशंटसाठी वापरली जाते. मात्र या यशानंतर मुखर्जींना तत्कालीन पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून सामाजिक बहिष्कार आणि अपमानाचा सामना करावा लागला. भारत सरकारने त्यांना आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेण्यास नकार दिला.

    हा अपमान मुखर्जींना सहन झाला नाही आणि 19 जून 1981 रोजी त्यांनी कलकत्ता येथील राहत्या घरी आत्महत्या केली. मुखर्जींच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी, भारतातील पुनरुत्पादक जीवशास्त्रज्ञ टीसी आनंद कुमार यांनी टेस्ट ट्यूब बेबींबद्दल एक वैज्ञानिक दस्तऐवज प्रकाशित केला. त्यासाठी त्यांनी डॉ. मुखर्जी यांच्या संशोधनाची मदत घेतली. त्यानंतर यावर अधिक काम करताना डॉ. आनंद कुमार यांना डॉ. मुखर्जींच्या यशाची माहिती उलगडत गेली. अखेर 8 फेब्रुवारी 1997 रोजी कलकत्ता येथे आयोजित एका संमेलनात डॉ. आनंद यांनी सुभाष मुखर्जी मेमोरियल ऑरेशन दिले आणि “भारताच्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी” बद्दल बोलले. “आर्किटेक्ट : डॉ. सुभाष मुखर्जी” या शीर्षकाचा लेखही प्रकाशित केला. डॉ. आनंद यांच्या प्रयत्नांमुळे अखेरीस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मुखर्जी यांच्या कार्याला मान्यता दिली आणि टेस्ट ट्यूब बेबीचे जनकत्व डॉ. मुखर्जी यांना मिळाले.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn