Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : बाजरीची खमंग खिचडी (खिचडा)
    फूड काॅर्नर

    Recipe : बाजरीची खमंग खिचडी (खिचडा)

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 13, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, बाजरीची खिचडी, संक्रांत स्पेशल, बाजरीचा खिचडा, भरडा भात, बाजरीचा भरडा भात, भरडा खिचडी, खमंग भरडा खिचडी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    यशःश्री जोशी

    साहित्य

    • बाजरी – 1 वाटी
    • तांदूळ – अर्धी वाटी
    • पिवळी मूगडाळ – अर्धी वाटी
    • मीठ – चवीनुसार
    • जिरं – अर्धा टीस्पून
    • मोहरी – अर्धा टीस्पून
    • किसलेलं सुकं खोबरं – 3 टेबलस्पून
    • हळद – पाऊण टीस्पून
    • टोमॅटो – 1 मोठा
    • फ्लॉवरचे तुरे – अर्धा वाटी
    • गाजर – अर्धी वाटी
    • मटार – अर्धी वाटी
    • बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धी वाटी
    • कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या बारीक चिरून – एक टेबलस्पून
    • गोडा मसाला – पाऊण टेबलस्पून
    • तेल – 2 टेबलस्पून

    पुरवठा संख्या – 3 ते 4 व्यक्तींसाठी

    तयारीसाठी लागणार वेळ

    • डाळ, तांदूळ भिजवायला – 1 तास
    • बाजरी भिजवायला – 6 ते 8 तास
    • बाजरी वाळवून त्याचा भरडा काढायला – 3 तास
    • पाककृती करण्यासाठी – अर्धा तास

    कृती

    1. प्रथम बाजरी स्वच्छ धुवून 6 ते 8 तास भिजवून ठेवा.
    2. 6 ते 8 तासांनी सगळे पाणी निथळून जाईल अशी उपसून थोड्यावेळाने एखाद्या सुती कापडावर वाळविण्यासाठी पसरवून ठेवा.
    3. बाजरी वाळली की, मिक्सरवर पल्स मोडवर थोडा थोडावेळ फिरवून घ्या की बाजरीचा भरडा तयार होईल.
    4. दुसरीकडे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून वेगवेगळे तासाभरासाठी भिजवून ठेवा.
    5. तासाभराने भिजवलेली डाळ आणि तांदूळ उपसून त्यातले पाणी निथळायला ठेवा.
    6. आता सगळ्या भाज्या निवडून, धुवून, चिरून घ्या.
    7. मिक्सरच्या छोट्या भांड्यात जिरं, कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या आणि सुकं खोबरं हे सगळं पाणी न घालता वाटून घ्या.
    8. आता कुकरमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, त्यात हळद, चिरलेला टोमॅटो घाला.
    9. टोमॅटो थोडा मऊ झाला की, मग त्यात गाजराचे तुकडे, मटार आणि फ्लॉवरचे तुरे घालून छान मिक्स करून घ्या.
    10. मग त्यात धुवून, निथळून घेतलेली डाळ, तांदूळ आणि शेवटी बाजरीचा भरडा घालून सगळं छान ढवळून घ्या. मग त्यात डाळ, तांदूळ आणि बाजरी यांच्या एकूण प्रमाणाच्या अडीच पट गरम पाणी घाला.
    11. पाणी घालून झाले की, मग तिखट, गोडा मसाला, मिक्सरमधून फिरवून घेतलेलं जिरं खोबऱ्याचं वाटण, थोडासा गूळ आणि चवीनुसार मीठ घालून परत एकदा मिक्स करा.
    12. मग कुकरचे झाकण लावून मोठ्या गॅसवर एक शिट्टी करून मग गॅस बारीक करून साधारणपणे 10 मिनिटे ठेवावा. नंतर पुन्हा गॅस मोठा करून एक शिट्टी करावी. बाजरी शिजायला तुलनेत थोडा जास्त वेळ लागतो.
    13. वाफ जिरली की, कुकरचे झाकण उघडून खिचडी व्यवस्थित झाली आहे का, बघावे.
    14. मग वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तूप घालून खायला घ्यावी. सोबत पापड आणि लोणचं असेल तर भोगीचा परफेक्ट मेन्यू तयार झाला.

    टिप्स

    • बाजरीची खिचडी करताना बाजरी किमान 6 तास भिजवून ठेवणे आवश्यक आहे.
    • या खिचडीवर लसणाची फोडणी खूप छान लागते. आवडत असेल तर 20-25 लसूण पाकळ्या सोलून ठेचून घ्या. एका छोट्या कढईत जरा जास्त तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की लगेच त्यात लसूण पाकळ्या घाला. त्या थोड्या लालसर झाल्या की, गॅस बंद करून थोडीशी कोथिंबीर आणि लाल तिखट घालावे. साजूक तुपाऐवजी  ही फोडणी बाजरीच्या खिचडीवर घालावी.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn